Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ शमुवेल 25:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

7 मी असे ऐकले की आपण लोकर कातरणारे लावले आहेत; आपले धनगर आमच्यामध्ये होते; आम्ही त्यांना काही उपद्रव दिला नाही, आणि ते कर्मेलात असताना त्यांची काहीएक हानी झाली नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 तुझ्याकडे कातरणारे आहेत असे मी आता ऐकले. आताच तुझे मेंढपाळ आम्हाजवळ होते त्यांना आम्ही उपद्रव केला नाही आणि जितके दिवस ते कर्मेलात होते तितके दिवस त्यांचे काही हरवले नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

7 “ ‘मी ऐकत आहे की, ही मेंढरे कातरण्याची वेळ आहे. जेव्हा तुझे मेंढपाळ आमच्याबरोबर होते, आम्ही त्यांच्याशी वाईट वागलो नाही आणि जितका काळ ते कर्मेल येथे होते त्यांचे काहीही हरवले नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ शमुवेल 25:7
9 Iomraidhean Croise  

पुरी दोन वर्षे गेल्यावर एफ्राइमानजीक बाल-हासोर गावी अबशालोमाने आपल्या मेंढरांची लोकर कातरवली; त्या वेळी सर्व राजकुमारांना आमंत्रण केले.


तो राजाकडे जाऊन म्हणाला, “माझी अशी विनंती आहे की आपल्या सेवकाच्या मेंढ्यांच्या लोकरीची कातरणी आहे म्हणून राजाने आपले चाकर घेऊन ह्या सेवकाबरोबर यावे.”


शिपायांनीही त्याला विचारले, “आम्ही काय करावे?” त्याने त्यांना सांगितले, “कोणावर जबरदस्ती करू नका व कुभांड आणू नका, तर आपल्या पगारात तृप्त असा.”


ह्यासाठी की, ह्या कुटिल व विपरीत पिढीत तुम्ही निर्दोष व निरुपद्रवी अशी देवाची निष्कलंक मुले असे व्हावे. त्या लोकांमध्ये तुम्ही जीवनाचे वचन पुढे करून दाखवताना ज्योतीसारखे जगात दिसता;


बंधूंनो, शेवटी इतके सांगतो की, जे काही सत्य, जे काही आदर णीय, जे काही न्याय्य, जे काही शुद्ध, जे काही प्रशंसनीय, जे काही श्रवणीय, जो काही सद्‍गुण, जी काही स्तुती, त्यांचे मनन करा.


विपन्न, कर्जबाजारी व जिवाला त्रासलेले असे सर्व लोक त्याच्याजवळ जमा झाले, तो त्यांचा नायक झाला; सुमारे चारशे पुरुष त्याच्याजवळ जमले.


दावीद म्हणाला होता की, “मी रानात ह्या मनुष्याच्या मालमत्तेचे रक्षण करून त्याची काहीएक हानी होऊ दिली नाही ते खरोखर व्यर्थ गेले; त्याने उपकाराबद्दल अपकार केला;


Lean sinn:

Sanasan


Sanasan