Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ शमुवेल 25:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

10 नाबालाने दाविदाच्या सेवकांना म्हटले, “दावीद कोण? हा इशायाचा पुत्र कोण? आजकाल बहुत दास आपापल्या धन्याला सोडून पळून जातात.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 तेव्हा नाबालाने त्याच्या चाकरांना उत्तर देऊन म्हटले, “दावीद कोण आहे? इशायाचा मुलगा कोण? जे आपआपल्या धन्याला सोडून पळतात असे पुष्कळ चाकर या दिवसात आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

10 नाबालने दावीदाच्या सेवकांना उत्तर दिले, “कोण हा दावीद? कोण हा इशायाचा पुत्र? आजकाल पुष्कळ सेवक त्यांच्या मालकांपासून पळून जात आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ शमुवेल 25:10
14 Iomraidhean Croise  

बन्यामिनी बिक्रीचा पुत्र शबा हा एक अधम मनुष्य होता; त्याने रणशिंग फुंकून म्हटले, “दाविदाकडे आमचा काही विभाग नाही; इशायपुत्राकडे आमचा काही वतनभाग नाही; इस्राएलहो, आपापल्या डेर्‍यांची वाट धरा.”


राजा ऐकत नाही हे पाहून सगळ्या इस्राएल लोकांनी त्याला म्हटले, “दाविदाचे आम्ही काय लागतो? इशायाचा पुत्र आमचा वतनभाग नाही; हे इस्राएला, आपल्या डेर्‍याकडे चालता हो; दाविदा, आता तू आपले घर सांभाळ.” मग इस्राएल लोक आपल्या डेर्‍यांत चालते झाले.


तेव्हा फारो म्हणाला, “हा कोण परमेश्वर की ज्याचे ऐकून मी इस्राएलास जाऊ द्यावे? मी त्या परमेश्वराला जाणत नाही, आणि इस्राएलास काही जाऊ देणार नाही.”


मृदु उत्तराने कोपाचे निवारण होते; कठोर शब्दाने क्रोध उत्तेजित होतो.


“ह्या दिवसांपेक्षा पूर्वीचे दिवस बरे होते, हे का?” असे म्हणू नकोस; हे तुझे विचारणे शहाणपणाचे नव्हे.


मूर्खाला थोर व ठकास प्रतिष्ठित म्हणणार नाहीत.


ठकाची साधनेही दुष्टतेची असतात; दीन आपल्या वाजवी हक्काचे समर्थन करीत असता ठक खोट्या शब्दांनी दुर्बलांचा नाश करण्याच्या दुष्ट युक्ती योजतो.


तेव्हा एबेदाचा मुलगा गाल म्हणाला, “अबीमलेख कोण की आम्ही शखेमकरांनी त्याचे अंकित असावे? यरुब्बालाचा मुलगा व त्याचा कारभारी जबूल हे शखेमाचा बाप हमोर ह्याच्या कुळातील लोकांचे अंकित असतील! पण आम्ही अबीमलेखाचे अंकित का असावे?


तेव्हा शौलाचा कोप योनाथानावर भडकला आणि तो त्याला म्हणाला, “अरे दुष्ट, फितुरखोर बायकोच्या पोरा, तुझी व तुझ्या आईची बेअब्रू व्हावी म्हणून तुझे मन इशायपुत्रावर बसले आहे हे मला ठाऊक नाही काय?


विपन्न, कर्जबाजारी व जिवाला त्रासलेले असे सर्व लोक त्याच्याजवळ जमा झाले, तो त्यांचा नायक झाला; सुमारे चारशे पुरुष त्याच्याजवळ जमले.


दाविदाच्या तरुण पुरुषांनी जाऊन त्याच्या नावाने नाबालाला हे सर्व शब्द सांगितले व ते स्तब्ध राहिले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan