Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ शमुवेल 25:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 पुढे शमुवेल मृत्यू पावला; तेव्हा सर्व इस्राएल लोकांनी एकत्र जमून शोक केला आणि रामा येथील त्याच्या घरात त्याला मूठमाती दिली. इकडे दावीद निघून पारान नावाच्या अरण्यात गेला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 शमुवेल मरण पावला तेव्हा सर्व इस्राएल लोकांनी एकत्र जमून त्याच्यासाठी शोक केला आणि त्यांनी त्यास रामा येथे त्याच्या घरात पुरले. दावीद उठून खाली पारान नावाच्या रानात गेला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 शमुवेल मरण पावले तेव्हा सर्व इस्राएली लोक एकत्र जमले आणि त्यांच्यासाठी शोक केला; आणि त्यांनी त्यांना रामाह येथील त्यांच्या घरी पुरले. नंतर दावीद खाली पारानच्या वाळवंटात गेला.

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ शमुवेल 25:1
20 Iomraidhean Croise  

आणि होरी लोकांना त्यांच्या सेईर डोंगरात मार देऊन एल्-पारानाच्या जवळ रान होते तेथपर्यंत पिटाळून लावले.


तो पारानाच्या रानात वस्ती करून राहिला, आणि त्याच्या आईने त्याला मिसर देशातली बायको करून दिली.


सारा ही कनान देशातील किर्याथ-आर्बा म्हणजे हेब्रोन येथे मृत्यू पावली, आणि अब्राहाम तिच्यासाठी शोक व विलाप करायला आला.


देशातले रहिवासी कनानी ह्यांनी तो शोक पाहिला तेव्हा ते म्हणाले, ‘हा मिसरी लोकांचा भारी शोक आहे;’ त्यावरून त्या ठिकाणाचे नाव आबेल-मिस्राईम (मिसराचा शोक) पडले; ते यार्देनेपलीकडे आहे.


यहोयादाचा पुत्र बनाया ह्याने जाऊन यवाबावर हल्ला करून त्याला ठार मारले, आणि रानातील त्याच्या स्वतःच्या घरी त्याला मूठमाती दिली.


मनश्शे आपल्या पितरांजवळ जाऊन निजला; त्याच्या वाड्याच्या बागेत म्हणजे अर्थात उज्जाच्या बागेत त्याला मूठमाती देण्यात आली आणि त्याच्या जागी त्याचा पुत्र आमोन हा राजा झाला.


मनश्शे आपल्या पितरांजवळ जाऊन निजला, त्यांनी त्याला त्याच्याच घरात मूठमाती दिली; त्याच्या जागी त्याचा पुत्र आमोन राजा झाला.


हाय हाय! मी मेशेखात मुक्काम करतो, केदाराच्या डेर्‍यांजवळ राहतो.


राष्ट्रांचे राजे सगळे आपापल्या घरी गौरवाने निद्रिस्त आहेत;


तुमचे पूर्वज आता कोठे आहेत? संदेष्टे तरी सर्वकाळ जगतात काय?


तेव्हा इस्राएल लोकांनी सीनाय रानातून आपापल्या टप्प्याप्रमाणे कूच केले; नंतर मेघ पारानाच्या रानात स्थिर झाला.


ह्यानंतर हसेरोथ येथून कूच करून त्यांनी पारानाच्या रानात डेरे दिले.


ते हेर पारान रानातील कादेश येथे मोशे, अहरोन व इस्राएलाची सर्व मंडळी ह्यांच्याकडे आले आणि त्यांनी त्यांना व सर्व मंडळीला सर्व हकिकत सांगितली आणि त्या देशाची फळे दाखवली.


परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे मोशेने पारान रानातून त्यांना पाठवले; ते सगळे पुरुष इस्राएल लोकांचे प्रमुख होते.


अहरोन मरण पावल्याचे सर्व मंडळीला कळले तेव्हा सार्‍या इस्राएल घराण्याने अहरोनासाठी तीस दिवस शोक केला.


भक्तिमान माणसांनी स्तेफनाला नेऊन पुरले आणि त्याच्यासाठी फार शोक केला.


इस्राएल लोकांनी मवाबाच्या मैदानात मोशेसाठी तीस दिवस शोक केला; मग मोशेबद्दल सुतक धरून शोक करण्याचे दिवस संपले.


ती मंडळी अगदी पहाटेस उठून परमेश्वराला वंदन करून रामा येथे आपल्या घरी परत गेली; मग एलकानाने आपल्या स्त्रीला जाणले आणि परमेश्वराने तिची आठवण केली.


शमुवेल मृत्यू पावला होता; सर्व इस्राएल लोकांनी त्याच्यासाठी मोठा शोक करून त्याचे नगर रामा येथे त्याला मूठमाती दिली होती. शौलाने दैवज्ञ व मांत्रिक ह्यांना देशातून घालवून दिले होते.


तो रामा येथे परत येत असे; कारण तेथे त्याचे घर होते. तेथे तो इस्राएलाचा न्यायनिवाडा करी; तेथे त्याने देवाप्रीत्यर्थ एक वेदी बांधली.


Lean sinn:

Sanasan


Sanasan