Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ शमुवेल 24:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 दावीद शौलाला म्हणाला, “लोक म्हणतात की, पाहा, दावीद आपला घात करू पाहत आहे, त्यांच्या बोलण्याकडे आपण का कान देता?

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 मग दावीदाने शौलाला म्हटले, “पाहा दावीद तुझे वाईट करायला पाहतो असे लोकांचे बोलणे ते तुम्ही कशाला ऐकता?

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 तो शौलाला म्हणाला, “तुम्ही लोकांचे का ऐकता, जेव्हा ते म्हणतात, ‘दावीद तुला इजा करण्यास पाहत आहे’?

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ शमुवेल 24:9
19 Iomraidhean Croise  

आपल्या शेजार्‍याची गुप्तपणे चहाडी करणार्‍याचा मी विध्वंस करीन; जो कुर्रेबाज व गर्विष्ठ मनाचा आहे त्याची मी गय करणार नाही.


त्यांच्या अधिपतींना कड्यावरून लोटून दिले आहे, आणि ते माझी वचने ऐकतील कारण ती मधुर आहेत.


कुटिल मनुष्य वैमनस्य पसरतो; कानास लागणारा मोठ्या स्नेह्यांत फूट पाडतो.


दुष्कर्मी मनुष्य दुष्ट वाणी लक्ष देऊन ऐकतो; लबाड मनुष्य उपद्रवी जिव्हेला कान देतो.


कानास लागणार्‍याचे शब्द स्वादिष्ट पक्‍वान्नासारखे आहेत, ते अगदी खोल पोटात शिरतात.


उत्तरेचा वारा पाऊस आणतो, त्याप्रमाणे चुगलखोर जीभ मुद्रा क्रोधाविष्ट करते.


लबाड जिव्हा आपण घायाळ केलेल्यांचा द्वेष करते, खुशामत करणारे तोंड नाशाला कारण होते.


अधिपती खोट्या गोष्टीला कान देणारा असला, तर त्याचे सर्व सेवक दुष्ट बनतात.


यिर्मया सिद्कीया राजाला आणखी म्हणाला, “मी आपल्याविरुद्ध, आपल्या सेवकांविरुद्ध किंवा ह्या लोकांविरुद्ध कोणते पाप केले की, तुम्ही मला तुरुंगात टाकले?


आपल्या लोकांमध्ये चहाड्या करीत इकडे तिकडे फिरू नकोस, आपल्या शेजार्‍याच्या जिवावर उठू नकोस; मी परमेश्वर आहे.


जीभ ही आग आहे; ती अनीतीचे भुवन आहे; आपल्या अवयवांत सर्व शरीर अमंगळ करणारा अवयव जीभ आहे; ती सृष्टीचे चक्र पेटवणारी आणि नरकाने पेटवलेली अशी आहे.


मग दावीद रामातील नायोथ येथून पळून गेला आणि योनाथानाकडे जाऊन म्हणू लागला, “मी काय केले? माझ्याकडून काय अपराध घडला? तुझ्या बापाचा मी असा काय गुन्हा केला आहे की तो माझा जीव घ्यायला पाहत आहे?”


तो पोरगा निघून जाताच दावीद दक्षिणेकडील एका ठिकाणाकडून उठून आला व त्याने भूमीवर उपडे पडून तीनदा नमन केले; मग एकमेकांचे चुंबन घेऊन ते रडू लागले; दावीद तर मनस्वी रडला.


पाहा, आज आपण आपल्या डोळ्यांनी पाहिले आहे की परमेश्वराने आज गुहेत आपणाला माझ्या हाती दिले होते; आपणाला मारून टाकावे असे कोणी म्हटले, पण मी आपली गय केली; मी म्हटले की मी आपल्या स्वामीवर हात टाकू नये कारण तो परमेश्वराचा अभिषिक्त आहे.


नंतर दावीदही उठून गुहेतून बाहेर पडला आणि त्याने मागून शौलाला हाक मारली, “माझे स्वामीराज!” शौलाने मागे वळून पाहिले तेव्हा दाविदाने खाली लवून त्याला मुजरा केला.


तो आणखी म्हणाला, “माझे स्वामी आपल्या दासाच्या पाठीस का लागले आहेत? मी काय केले आहे? माझ्या हातून कोणती कसूर झाली आहे ?


आता माझे स्वामीराज ह्यांनी आपल्या दासाची विनंती ऐकावी; परमेश्वराने जर आपणाला माझ्याविरुद्ध चेतवले असेल तर तो हे माझे अर्पण मान्य करो; पण कोणी मानवांनी आपणाला चेतवले असेल तर परमेश्वराच्या दृष्टीने ते शापित होवोत, कारण मी परमेश्वराच्या वतनाचा वाटेकरी होऊ नये म्हणून त्यांनी मला बाहेर हाकून दिले आहे; ते म्हणतात, जा, अन्य देवतांची उपासना कर.


Lean sinn:

Sanasan


Sanasan