Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ शमुवेल 24:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 तेव्हा शौल सर्व इस्राएलातून तीन हजार लोक निवडून घेऊन रानबकर्‍यांच्या खडकांवर दाविदाच्या व त्याच्या लोकांच्या शोधासाठी गेला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 तेव्हा शौल सर्व इस्राएलातून निवडलेल्या तीन हजार मनुष्यांस घेऊन रानबकऱ्याच्या खडकावर दावीदाचा व त्याच्या मनुष्यांचा शोध करायला गेला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 तेव्हा शौलाने सर्व इस्राएलमधून सक्षम असलेले तीन हजार तरुण पुरुष घेतले आणि ते दावीदाचा व त्याच्या माणसांचा शोध करण्यासाठी रानबकर्‍यांच्या खडकाळ भागात गेले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ शमुवेल 24:2
9 Iomraidhean Croise  

तो म्हणाला, “परमेश्वर माझा दुर्ग, माझा गड मला सोडवणारा, माझाच होय.


पहाडी रानशेळ्या विण्याचा काळ तुला ठाऊक आहे काय? हरिणी केव्हा प्रसवतात हे तुला कळते काय?


उंच पर्वत रानबकर्‍यांसाठी आहेत; खडक सशांचे आश्रयस्थान आहेत.


त्यांच्या अधिपतींना कड्यावरून लोटून दिले आहे, आणि ते माझी वचने ऐकतील कारण ती मधुर आहेत.


दुर्जन नीतिमानावर टपलेला असतो, व त्याला जिवे मारण्यास तो पाहत असतो.


माझा जीव घेण्यास टपणारे मला धरण्यासाठी फासे मांडतात; माझे अनिष्ट चिंतणारे अपकारक गोष्टी बोलतात, ते दिवसभर कपटाच्या मसलती करत राहतात.


इस्राएलातले तीन हजार पुरुष निवडले; त्यांपैकी दोन हजार शौलाबरोबर मिखमाश येथे व बेथेलच्या डोंगरावर राहिले आणि एक हजार योनाथानाबरोबर बन्यामिनाच्या गिब्यात राहिले; वरकड सर्व लोकांना त्याने आपापल्या डेर्‍यांकडे रवाना केले.


तेव्हा शौल दाविदाचा पाठलाग करण्याचे सोडून पलिष्ट्यांशी सामना करण्यासाठी गेला म्हणून त्या ठिकाणाचे नाव सेला-हम्मालकोथ (निसटून जाण्याचा खडक) असे पडले.


तेव्हा शौल इस्राएलातले तीन हजार निवडक योद्धे बरोबर घेऊन दाविदाचा शोध करायला जीफ रानात निघून गेला.


Lean sinn:

Sanasan


Sanasan