Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ शमुवेल 24:15 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

15 परमेश्वर न्यायाधीश आहे, तो माझ्या व तुमच्यामध्ये निवाडा करो; माझे प्रकरण लक्षात आणून तो माझा कैवार घेवो, व माझा न्याय करून मला आपल्या हातून सोडवो.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

15 यास्तव परमेश्वर न्यायाधीश होऊन माझ्यामध्ये व तुमच्यामध्ये न्याय करो. हे पाहून तो माझा वाद करो आणि तुमच्या हातून मला सोडवो.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

15 याहवेहनेच आपला न्यायाधीश होऊन आपल्यामध्ये निवाडा करावा. त्यांनी माझा वाद लक्षात घेऊन माझा कैवार घ्यावा; व मला तुमच्या हातून सोडवून माझी सुटका करावी.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ शमुवेल 24:15
12 Iomraidhean Croise  

ह्याप्रमाणे त्याचा बाप यहोयादा ह्याने केलेले उपकार योवाश राजा स्मरला नाही, पण त्याने त्याच्या पुत्राचा वध केला. त्याच्या मृत्युसमयी तो म्हणाला, “परमेश्वरा, हे अवलोकन करून ह्याचे उसने फेड.”


माझा वाद तू चालव, मला मुक्त कर; तू आपल्या वचनाप्रमाणे मला नवजीवन दे.


हे परमेश्वरा, मला विरोध करणार्‍यांना विरोध कर; माझ्याबरोबर लढणार्‍यांशी लढ.


हे देवा, माझा न्याय कर; भक्तिहीन राष्ट्राशी माझ्या पक्षाने लढ; कपटी व कुटिल मनुष्यापासून मला मुक्त कर.


सर्व राष्ट्रांनो, तुम्ही ऐका; अगे पृथ्वी तू व तुझ्यावरील सर्व वस्तुजात ह्यांनी कान द्यावा; प्रभू परमेश्वर, आपल्या पवित्र मंदिरातून प्रभू, तुमच्याविरुद्ध साक्ष देतो,


परमेश्वर माझा तंटा लढून माझा हक्क संपादन करील, तोपर्यंत मी त्याचा राग सहन करीन; कारण मी त्याच्याविरुद्ध पाप केले आहे; मला तो प्रकाशात नेईल, मी त्याचे न्यायीपण पाहीन.


मी तुझा काही गुन्हा केला नाही, तरी माझ्याशी लढून तू माझ्यावर अन्याय करत आहेस, न्यायाधीश परमेश्वर हा इस्राएल लोक व अम्मोनी लोक ह्यांचा आज न्याय करो.”


तो पलिष्टी दाविदाला म्हणाला, “मी काय कुत्रा आहे म्हणून तू काठी घेऊन माझ्यापुढे आला आहेस?” त्या पलिष्ट्याने आपल्या देवांची नावे घेऊन दाविदाला शिव्याशाप दिले.


परमेश्वर माझ्यातुमच्यामध्ये न्याय करो आणि परमेश्वरच माझ्याबद्दल आपले शासन करो; पण माझा हात आपल्यावर पडणार नाही.


नाबालाच्या मृत्यूचे वृत्त ऐकून दावीद म्हणाला, “नाबालाच्या हातून माझी अप्रतिष्ठा झाली तिची दाद ज्याने घेतली आणि आपल्या दासाला घात करण्यापासून आवरले, तो परमेश्वर धन्य! परमेश्वराने नाबालाचे दुष्कर्म त्याच्याच शिरी उलटवले.” मग दाविदाने अबीगईलेशी लग्नाचे बोलणे करण्यासाठी तिच्याकडे लोक पाठवले.


तर आता परमेश्वराच्या दृष्टिवेगळे माझे रक्त भूमीवर न पडो; डोंगरात कोणी तितराची शिकार करावी तसा इस्राएलाचा राजा एक पिसू धुंडायला निघाला आहे.”


तेव्हा दाविदाने हेर पाठवून शौल खरोखरच आला आहे की काय ह्याची माहिती काढली.


Lean sinn:

Sanasan


Sanasan