Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ शमुवेल 24:12 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

12 परमेश्वर माझ्यातुमच्यामध्ये न्याय करो आणि परमेश्वरच माझ्याबद्दल आपले शासन करो; पण माझा हात आपल्यावर पडणार नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

12 माझ्यामध्ये व तुमच्यामध्ये परमेश्वर न्याय करो; माझा सूड परमेश्वर तुमच्यावर उगवो. परंतु माझा हात तुमच्यावर पडणार नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

12 याहवेह तुमच्या आणि माझ्यामध्ये न्याय करो. तुम्ही माझ्याबरोबर जे चुकीचे केले आहे त्याचा बदला याहवेहच घेवो, परंतु मी तुम्हाला हात लावणार नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ शमुवेल 24:12
17 Iomraidhean Croise  

तेव्हा साराय अब्रामाला म्हणाली, “माझ्या अपमानाचा दोष तुमच्या माथी; मी माझी दासी तुमच्या मिठीत दिली, पण आपण गर्भवती आहो असे पाहून ती मला तुच्छ लेखू लागली आहे, परमेश्वर आपल्या दोघांचा न्याय करो.”


अब्राहामाचा देव, नाहोराचा देव व त्यांच्या पित्याचे1 देव आपल्या दोघांचा न्याय करोत.” मग याकोबाने आपला बाप इसहाक ह्याचा जो ‘धाक’ त्याची शपथ वाहिली.


त्याच देवाने मला सूड उगवू दिला, अन्य राष्ट्रांना माझ्या सत्तेखाली आणले.


मग त्या तिसांतला प्रमुख जो अमासय ह्याला आत्म्याने व्यापले व तो म्हणाला, “हे दाविदा, आम्ही आपलेच आहोत; इशायपुत्रा, आम्ही आपल्या पक्षाचे आहोत; आपले कुशल असो, कुशल असो; आपल्या साहाय्यकर्त्यांचेही कुशल असो; कारण आपला देव आपला साहाय्यकारी आहे.” ह्यावर दाविदाने त्यांना ठेवून घेतले व आपल्या सैन्यावर नायक नेमले.


मी तर ईश्वराचा धावा केला असता; मी देवावर हवाला टाकला असता.


हे परमेश्वरा, मला विरोध करणार्‍यांना विरोध कर; माझ्याबरोबर लढणार्‍यांशी लढ.


हे देवा, माझा न्याय कर; भक्तिहीन राष्ट्राशी माझ्या पक्षाने लढ; कपटी व कुटिल मनुष्यापासून मला मुक्त कर.


हे पारिपत्य करणार्‍या देवा, परमेश्वरा, हे पारिपत्य करणार्‍या देवा, तू आपले तेज प्रकट कर.


प्रिय जनहो, सूड उगवू नका, तर देवाच्या क्रोधाला वाट द्या; कारण असा शास्त्रलेख आहे की, “सूड घेणे माझ्याकडे आहे, मी फेड करीन,” असे प्रभू म्हणतो.


त्याची निंदा होत असता त्याने उलट निंदा केली नाही; दुःख भोगत असता त्याने धमकावले नाही; तर यथार्थ न्याय करणार्‍याकडे स्वतःला सोपवून दिले.


ते मोठ्याने ओरडून म्हणाले, “हे स्वामी, तू पवित्र व सत्य आहेस. तू ‘कोठपर्यंत न्यायनिवाडा करणार’ नाहीस आणि पृथ्वीवर राहणार्‍या लोकांपासून आमच्या ‘रक्ताचा सूड घेणार’ नाहीस?”


मी तुझा काही गुन्हा केला नाही, तरी माझ्याशी लढून तू माझ्यावर अन्याय करत आहेस, न्यायाधीश परमेश्वर हा इस्राएल लोक व अम्मोनी लोक ह्यांचा आज न्याय करो.”


मग दावीद रामातील नायोथ येथून पळून गेला आणि योनाथानाकडे जाऊन म्हणू लागला, “मी काय केले? माझ्याकडून काय अपराध घडला? तुझ्या बापाचा मी असा काय गुन्हा केला आहे की तो माझा जीव घ्यायला पाहत आहे?”


परमेश्वर न्यायाधीश आहे, तो माझ्या व तुमच्यामध्ये निवाडा करो; माझे प्रकरण लक्षात आणून तो माझा कैवार घेवो, व माझा न्याय करून मला आपल्या हातून सोडवो.”


परमेश्वर प्रत्येकाला त्याच्या नीतिमत्तेचे व सचोटीचे फळ देईल; आज परमेश्वराने आपणाला माझ्या हाती दिले होते तरी मी परमेश्वराच्या अभिषिक्तावर आपला हात टाकला नाही.


Lean sinn:

Sanasan


Sanasan