Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ शमुवेल 23:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 शौल आपला नाश करण्याची मसलत करीत आहे हे दाविदाला समजले तेव्हा तो अब्याथार याजकाला म्हणाला, “एफोद इकडे आण.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 आपल्याबद्दल शौल वाईट योजीत आहे, हे दावीदाला कळले म्हणून तो अब्याथार याजकाला म्हणाला, “एफोद इकडे आण.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 जेव्हा दावीदाला समजले की, शौल त्याच्याविरुद्ध कट करीत आहे, तेव्हा तो अबीयाथार याजकाला म्हणाला, “एफोद इकडे आणा.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ शमुवेल 23:9
15 Iomraidhean Croise  

अब्याथार याजकाला राजा म्हणाला, “तू अनाथोथ येथे आपल्या शेतीवाडीत जाऊन राहा; तू मरणदंडास पात्र आहेस तरी मी आज तुला मारून टाकत नाही, कारण माझा बाप दावीद ह्याच्यासमक्ष तू परमेश्वर देवाचा कोश वाहत असायचास आणि माझ्या बापाला ज्या ज्या विपत्ती प्राप्त झाल्या त्यांचा वाटेकरी तू होत असायचास.”


मला हाक मार म्हणजे मी तुला उत्तर देईन व तुला ठाऊक नाहीत अशा मोठ्या व गहन गोष्टी तुला सांगेन.


कारण पुष्कळ दिवसपर्यंत इस्राएल लोक हे राजा, सरदार, यज्ञ, पूजास्तंभ, एफोद व तेराफीम1 ह्यांवाचून बसून राहतील.


तो एलाजार याजकापुढे उभा राहील आणि एलाजार त्याच्या वतीने उरीमाच्या निर्णयासाठी परमेश्वराला विचारील; यहोशवाच्या आज्ञेप्रमाणे सर्व मंडळी म्हणजे तो स्वतः व त्याच्यासहित सर्व इस्राएल लोक पुढे जातील आणि त्याच्या आज्ञेप्रमाणे मागे येतील.”


हे ओळखून ते लुकवनिया प्रांतातील लुस्त्र व दर्बे ह्या नगरांत व त्या सभोवतालच्या प्रदेशात पळून गेले;


पण त्यांचा तो कट शौलाला समजला. त्यांनी तर त्याला मारण्याकरता रात्रंदिवस वेशींवर पाळत ठेवली होती;


तेव्हा त्यांनी परमेश्वराला आणखी विचारले, “तो मनुष्य येथे आला आहे काय?” परमेश्वराने सांगितले, “पाहा, तो सामानसुमानात लपून राहिला आहे.”


मग शौल अहीयाला म्हणाला, “देवाचा कोश इकडे आण.” देवाचा कोश त्या समयी इस्राएल लोकांबरोबरच होता.


तरीपण अहीटूबपुत्र अहीमलेख ह्याच्या पुत्रांपैकी अब्याथार नावाचा एक पुत्र निभावून दाविदाकडे पळून गेला.


मग दावीद म्हणाला, “हे परमेश्वरा, इस्राएलच्या देवा, शौल माझ्यामुळे कईला नगराचा नाश करण्यासाठी येऊ पाहत आहे, हे वर्तमान तुझ्या दासाने तरी नक्की ऐकले आहे.


अहीमलेखाचा पुत्र अब्याथार हा कईला येथे दाविदाकडे पळून गेला तेव्हा तो हाती एफोद घेऊन गेला होता.


तेव्हा कईलास जाऊन दाविदाला व त्याच्या लोकांना घेरावे म्हणून शौलाने आपल्या सर्व लोकांना युद्धासाठी बोलावले.


दावीद अहीमलेखाचा पुत्र अब्याथार याजक ह्याला म्हणाला, “एफोद माझ्याकडे आण. तेव्हा अब्याथाराने एफोद दाविदाकडे आणले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan