Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ शमुवेल 23:26 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

26 शौल डोंगराच्या ह्या बाजूने चालला आणि दावीद व त्याचे लोक डोंगराच्या त्या बाजूने चालले. शौलाच्या भीतीने दावीद निसटून जाण्याची त्वरा करीत होता, कारण शौल व त्याचे लोक दाविदाला व त्याच्या लोकांना पकडण्यासाठी त्यांना घेरू पाहत होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

26 शौल डोंगराच्या एका बाजूने चालला आणि दावीद व त्याची माणसे डोंगराच्या दुसऱ्या बाजूने चालली आणि दावीदाने शौलापासून पळायला घाई केली कारण शौल व त्याची माणसे, दावीदाला आणि त्याच्या मनुष्यांना धरायला घेरीत होती.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

26 शौल डोंगराच्या एका बाजूने जात होता तर दावीद आणि त्याची माणसे दुसर्‍या बाजूला होती, शौलापासून दूर जाण्याची ते घाई करत होते. कारण शौल आणि त्याचे सैनिक दावीद व त्याच्या माणसांना पकडण्यास जवळ येत होते,

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ शमुवेल 23:26
17 Iomraidhean Croise  

हे ऐकून दावीद यरुशलेमेतल्या आपल्या सर्व सेवकांना म्हणाला, “चला, आपण पळून जाऊ; न गेलो तर अबशालोमाच्या हातांतून कोणी सुटायचा नाही, निघून जाण्याची त्वरा करा, नाहीतर तो अचानक आपल्याला पकडून आपल्यावर अरिष्ट आणील व शहरावर तलवार चालवील.”


हे आमच्या देवा, तू त्यांचे शासन करणार नाहीस का? कारण आमच्यावर चालून आलेल्या ह्या मोठ्या समूहाशी सामना करण्यास आम्हांला ताकद नाही; आम्ही काय करावे ते आम्हांला सुचत नाही; पण आमचे डोळे तुझ्याकडे लागले आहेत.”


आता ते पावलोपावली आम्हांला घेरत आहेत; ते आम्हांला धुळीस मिळवू पाहत आहेत.


कारण दुर्जन माझ्यावर जुलूम करतात, माझे हाडवैरी मला घेरतात.


पुष्कळ गोर्‍ह्यांनी मला वेढले आहे; बाशानातील दांडग्या गोर्‍ह्यांनी मला घेरले आहे.


कुत्र्यांनी मला वेढले आहे; दुर्जनांच्या टोळीने मला घेरले आहे; त्यांनी माझे हातपाय विंधले आहेत.


मी तर अधीर होऊन म्हणालो, “मी तुझ्या दृष्टीपुढून दूर झालो आहे;” तरी मी तुझा धावा केला तेव्हा तू माझ्या विनवणीचा शब्द ऐकलास.


बंधुजनहो, आशियात आमच्यावर आलेल्या संकटांविषयी तुम्हांला ठाऊक नसावे अशी आमची इच्छा नाही; ते असे की, आम्ही आमच्या शक्तीपलीकडे अतिशयच दडपले गेलो; इतके की आम्ही जगतो की मरतो असे आम्हांला झाले.


त्यांनी ‘पृथ्वीच्या विस्तारावर’ फिरून पवित्र जनांची छावणी व ‘प्रिय’ नगर वेढले; ‘तेव्हा [देवापासून] स्वर्गातून अग्नी उतरला आणि त्याने’ त्यांना ‘खाऊन टाकले.’


शमशोन तेथे आल्याची बातमी गज्जा-करांना लागताच त्यांनी घराला घेरा घातला आणि नगरवेशीत ते रात्रभर त्याच्या पाळतीवर बसले. ‘सकाळी उजाडल्यावर त्याला ठार मारू’ असा विचार करून ते रात्रभर गुपचूप राहिले.


मग मीखलने खिडकीतून दाविदाला उतरवले, व तो पळून जाऊन निभावला.


योनाथान त्या पोराला म्हणाला, “त्वरा कर, धाव, विलंब लावू नकोस.” तेव्हा तो योनाथानाचा पोरगा बाण गोळा करून आपल्या धन्याकडे आला.


शौल आपले लोक बरोबर घेऊन त्याच्या शोधासाठी गेला; ही बातमी दाविदाला समजली तेव्हा तो खडकाळीतून उतरून मावोनाच्या रानात जाऊन राहिला. हे शौलाला समजले तेव्हा त्याने मावोनाच्या रानात दाविदाचा पाठलाग केला.


इतक्यात एका जासुदाने शौलाला येऊन सांगितले, “चला, त्वरा करा, कारण पलिष्ट्यांनी देशावर स्वारी केली आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan