Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ शमुवेल 23:23 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

23 तो कोणकोणत्या जागी दडी मारून असतो त्या सगळ्या जागांची माहिती काढून अवश्य परत या, म्हणजे मी तुमच्याबरोबर परत येईन; तो ह्या देशात कोठेही असला तरी मी ह्या यहूदाच्या हजारो लोकांतून त्याला हुडकून काढीन.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

23 तर जेथे तो लपून राहतो त्या सर्व लपण्याच्या जागा पाहून त्यांची खात्री करून घ्या, मग खरे वर्तमान घेऊन माझ्याकडे परत या; त्यानंतर मी तुम्हाबरोबर जाईन आणि असे होईल की, तो त्या मुलुखात असला तर मी त्यास यहूदाच्या सर्व हजारांतून त्यास हुडकून काढीन.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

23 लपण्यासाठी ज्या ठिकाणांचा तो उपयोग करतो त्यांचा शोध करा आणि निश्चित माहिती घेऊन माझ्याकडे परत या. मग मी तुमच्याबरोबर जाईन; जर तो त्याच भागात असेल, तर यहूदाहच्या सर्व कुळांमधून मी त्याला शोधून काढेन.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ शमुवेल 23:23
14 Iomraidhean Croise  

आपला देव परमेश्वर ह्याच्या जीविताची शपथ, माझ्या धन्याने आपला शोध करण्यासाठी जेथे लोक पाठवले नाहीत असे एकही राष्ट्र किंवा राज्य उरले नाही; तो अमुक ठिकाणी नाही असे त्यांनी येऊन सांगितले म्हणजे एलीया त्यांना आढळला नाही अशी शपथ तो त्या त्या राज्यास व राष्ट्रास घ्यायला लावी.


त्याने म्हटले, “तो कोठे आहे ते पाहा, म्हणजे मी माणूस पाठवून त्याला पकडून आणतो.” मग तो दोथान येथे आहे अशी त्याला बातमी लागली.


गावातील दडण्याच्या ठिकाणी तो दबा धरून बसतो; गुप्त स्थळी तो निरपराध्याचा घात करतो; त्याचे डोळे लाचारासाठी टपलेले असतात.


कारण त्यांचे पाय दुष्कर्म करण्यास धावतात, आणि रक्तपात करण्यास त्वरा करतात.


हे बेथलेहेम एफ्राथा, यहूदाच्या हजारांमध्ये तुझी गणना अल्प आहे, तरी तुझ्यामधून एक जण निघेल, तो माझ्यासाठी इस्राएलाचा शास्ता होईल; त्याचा उद्भव प्राचीन काळापासून अनादि काळापासून आहे.


कोश थांबला म्हणजे तो म्हणत असे, “हे परमेश्वरा, इस्राएलाच्या सहस्रावधी लोकांकडे परत ये.”


मग दोन दिवसांनंतर ‘वल्हांडण व बेखमीर भाकरी’चा सण होता आणि त्याला कपटाने कसे धरावे व जिवे मारावे हे मुख्य याजक व शास्त्री पाहत होते;


तुम्ही जाऊन आणखी खात्री करून घ्या; त्याची बसण्याउठण्याची जागा कोठे आहे, तेथे तो कोणाच्या दृष्टीस पडला, ह्याची सगळी माहिती काढा; कारण तो मोठा धूर्त आहे;


मग ते निघून शौलाच्या अगोदर जीफ येथे गेले; पण दावीद व त्याचे लोक रानाच्या दक्षिणेस अराबात मावोनाचे अरण्य आहे तेथील मैदानात होते.


शिवाय माझ्या पित्या, पाहा, माझ्या हातात आपल्या झग्याचा काठ आहे, आपल्या झग्याचा काठ मी कापून घेतला, पण आपणाला जिवे मारले नाही, ह्यावरून निश्‍चये समजा की माझ्या मनात काही दुष्ट हेतू अथवा पातक नाही, आपला अपराध मी केला नाही, पण आपण माझा जीव घ्यायला एकसारखे टपला आहात.


Lean sinn:

Sanasan


Sanasan