Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ शमुवेल 23:22 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

22 तुम्ही जाऊन आणखी खात्री करून घ्या; त्याची बसण्याउठण्याची जागा कोठे आहे, तेथे तो कोणाच्या दृष्टीस पडला, ह्याची सगळी माहिती काढा; कारण तो मोठा धूर्त आहे;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

22 मी तुम्हास विनंती करतो तुम्ही जा आणखी मन लावून त्याचा माग काढा आणि तेथे त्यास कोणी पाहिले याची माहिती काढून पाहा कारण तो फार चतुराईने वागतो असे मला कळाले आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

22 जा आणि अधिक माहिती मिळवा. दावीद नेहमी कुठे जातो आणि त्याला तिकडे कोणी पाहिले, याचा शोध करा. मला समजले की तो फारच धूर्त आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ शमुवेल 23:22
6 Iomraidhean Croise  

पाहा, तो एखाद्या भुयारात किंवा दुसर्‍या ठिकाणी लपून राहिला असेल. सुरुवातीला काही लोक पडले तर अबशालोमाच्या पक्षाच्या लोकांचाच वध होत आहे अशी वार्ता लोकांमध्ये पसरेल.


त्याने म्हटले, “तो कोठे आहे ते पाहा, म्हणजे मी माणूस पाठवून त्याला पकडून आणतो.” मग तो दोथान येथे आहे अशी त्याला बातमी लागली.


तो शहाण्यांस त्यांच्याच धूर्ततेने धरतो; कुटिलांच्या मसलतीचा तो त्वरित शेवट करतो.


शौल म्हणाला, “परमेश्वर तुमचे कल्याण करो; कारण तुम्ही माझ्यावर दया केली आहे;


तो कोणकोणत्या जागी दडी मारून असतो त्या सगळ्या जागांची माहिती काढून अवश्य परत या, म्हणजे मी तुमच्याबरोबर परत येईन; तो ह्या देशात कोठेही असला तरी मी ह्या यहूदाच्या हजारो लोकांतून त्याला हुडकून काढीन.”


आणि हेब्रोन आदिकरून ज्या ज्या ठिकाणी दावीद आपल्या लोकांसह फिरत असे तेथील आपल्या मित्रांना त्याने लुटीतून भेटी पाठवल्या.


Lean sinn:

Sanasan


Sanasan