Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ शमुवेल 23:17 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

17 त्याने त्याला म्हटले, “भिऊ नकोस, माझा पिता शौल ह्याच्या हाती तू लागणार नाहीस, तू इस्राएलाचा राजा होणार व मी तुझा दुय्यम होणार. माझा बाप शौल ह्यालाही हे ठाऊक आहे.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

17 तो त्यास म्हणाला, “भिऊ नको कारण माझा बाप शौल याच्या हाती तू लागणार नाहीस. तू तर इस्राएलावर राजा होशील आणि तुझ्याजवळ मीच पहिला तुझा सहाय्यक होईन हे माझा बाप शौलही जाणतो.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

17 तो म्हणाला, “भिऊ नकोस, माझा पिता शौल तुझ्यावर हात टाकणार नाही. तू इस्राएलचा राजा होशील आणि मी तुझा दुय्यम होईन, हे माझा पिता शौलसुद्धा जाणून आहे.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ शमुवेल 23:17
24 Iomraidhean Croise  

परमेश्वर माझ्या पक्षाचा आहे; मी भिणार नाही. मनुष्य माझे काय करणार?


परमेश्वराचे भय धरल्याने श्रद्धा दृढ होते; आणि ज्याच्या ठायी श्रद्धा असते त्याच्या मुलांना ती आश्रयस्थान होते.


मनुष्याच्या मनात अनेक मसलती येतात, परंतु परमेश्वराची योजना स्थिर राहते.


गलित हस्त दृढ करा; लटपटणारे गुडघे बळकट करा.


घाबर्‍या मनाच्यांस म्हणा, “धीर धरा, भिऊ नका; पाहा, तुमचा देव सूड घेण्यास, अनुरूप असे प्रतिफल देण्यास येईल;” तो येईल व तुमचा उद्धार करील.


तू भिऊ नकोस, कारण मी तुझ्याबरोबर आहे, घाबरू नकोस, कारण मी तुझा देव आहे; मी तुला शक्ती देतो, मी तुझे साहाय्यही करता, मी आपल्या नीतिमत्तेच्या उजव्या हाताने तुला सावरतो.


हे कीटका, याकोबा, इस्राएलाचे लोकहो, भिऊ नका, असे परमेश्वर म्हणतो; मी तुला साहाय्य करतो; इस्राएलाचा पवित्र प्रभू तुझा उद्धारकर्ता आहे.


तुझ्यावर चालवण्यासाठी घडलेले कोणतेही हत्यार तुझ्यावर चालणार नाही; तुझ्यावर आरोप ठेवणार्‍या सर्व जिव्हांना तू दोषी ठरवशील. परमेश्वराच्या सेवकांचे हेच वतन आहे, हीच माझ्याकडून मिळालेली त्यांची नीतिमत्ता आहे, असे परमेश्वर म्हणतो.”


हे लहान कळपा, भिऊ नकोस; कारण तुम्हांला ते राज्य द्यावे हे तुमच्या पित्याला बरे वाटले आहे.


आम्ही रोम शहरात गेल्यावर [शताधिपतीने बंदिवानांना सेनापतीच्या स्वाधीन केले, पण] पौलाला त्याच्यावर पहारा करणार्‍या शिपायाबरोबर वेगळे राहण्याची परवानगी मिळाली.


परंतु ते देवाचे असल्यास तुम्हांला ते नष्ट करता यायचे नाही; तुम्ही मात्र देवाचे विरोधी ठराल.”


म्हणून मी स्पेन देशाला जाईन तेव्हा तुमच्याकडे येईन (कारण तिकडे जाताना मी तुम्हांला भेटेन आणि तुमच्या सहवासाने काहीसे मन भरल्यावर तुम्ही माझी तिकडे बोळवण कराल अशी मी आशा धरतो.)


म्हणून आपण धैर्याने म्हणतो2 “प्रभू मला साहाय्य करणारा आहे, मी भिणार नाही; मनुष्य माझे काय करणार?”


जोवर हा इशायपुत्र ह्या भूतलावर जिवंत आहे तोवर तुला व तुझ्या राज्याला कधीही स्थिरता प्राप्त व्हायची नाही; तर आता बोलावणे पाठवून त्याला माझ्याकडे आण; त्याला अवश्य मारून टाकायचे आहे.”


भिऊ नकोस, माझ्याबरोबर राहा, कारण जो तुझा जीव घ्यायला पाहत आहत आहे, तो माझाही जीव घ्यायला पाहत आहे; माझ्याजवळ तू सुरक्षित राहशील.”


कोणाच्या तावडीत त्याचा शत्रू सापडला तर तो त्याला सहीसलामत जाऊ देईल काय? म्हणून आज तू जे वर्तन माझ्याशी केले आहेस त्याबद्दल परमेश्वर तुझे बरे करो.


पाहा, मला हे ठाऊक आहे की तू खात्रीने राजा होणार आणि इस्राएलाचे राज्य तुझ्या हाती कायम राहणार.


म्हणून आता माझ्याजवळ परमेश्वराच्या नामाने अशी आणभाक कर की तू माझ्या पश्‍चात माझ्या वंशाचा उच्छेद करणार नाहीस, आणि माझ्या बापाच्या घराण्यातून माझी नावनिशाणी नाहीशी करणार नाहीस.”


तेव्हा दाविदाला त्याचे लोक म्हणाले, “परमेश्वराने आपणाला सांगितले होते की, पाहा मी तुझा शत्रू तुझ्या हाती देईन, मग तुला वाटेल तसे त्याचे कर; हे घडून येण्याचा दिवस हाच आहे.” तेव्हा दाविदाने उठून शौलाच्या झग्याचा काठ हळूच कापून घेतला.


आपणाविषयी जे काही परमेश्वराने म्हटले आहे त्यानुसार माझ्या स्वामींचे कल्याण करून आपणाला परमेश्वराने इस्राएलाचा अधिपती नेमल्यावर,


Lean sinn:

Sanasan


Sanasan