Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ शमुवेल 23:14 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

14 मग दावीद रानातील गढ्यांमध्ये राहू लागला; तो जीफ नावाच्या रानातील पहाडी प्रदेशात राहिला. शौल त्याचा शोध नित्य करीत असे; पण देवाने त्याला त्याच्या हाती लागू दिले नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

14 आणि दावीद रानातील गडामध्ये राहू लागला. तो जीफ रानात डोंगराळ प्रदेशात राहू लागला. शौल नित्य त्याचा शोध करीत गेला, परंतु परमेश्वराने त्यास त्याच्या हाती दिले नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

14 दावीद अरण्यातील गडांमध्ये आणि जीफच्या डोंगराळ प्रदेशातील रानामध्ये राहू लागला. दिवसेंदिवस शौल त्याचा शोध घेत होता, परंतु परमेश्वराने दावीदाला त्याच्या हाती दिले नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ शमुवेल 23:14
19 Iomraidhean Croise  

गथ, मारेशा, सीफ,


तू माझे आश्रयस्थान आहेस, तू संकटापासून माझे रक्षण करशील; मुक्ततेच्या स्तोत्रांनी तू मला वेढशील. (सेला)


पाहा, मी दूर निघून गेलो असतो व रानात वस्ती केली असती; (सेला)


कारण त्यांचे पाय दुष्कर्म करण्यास धावतात, आणि रक्तपात करण्यास त्वरा करतात.


परमेश्वरापुढे शहाणपण, बुद्धी व युक्ती ही मुळीच चालत नाहीत.


कारण दुष्कर्म केल्यावाचून त्यांना झोप येत नाही; कोणाला पाडले नाही, तर त्यांची झोप उडते.


तेव्हा राजाने राजपुत्र यमेल, अरहज्रीएलपुत्र सराया, व अब्देलपुत्र शलेम्या ह्यांना अशी आज्ञा केली की बारूख लेखक व यिर्मया संदेष्टा ह्यांना धरून आणावे; पण परमेश्वराने त्यांना लपवले.


तर मग ह्या गोष्टीवरून आपण काय म्हणावे? देव आपल्याला अनुकूल असल्यास आपल्याला प्रतिकूल कोण?


मला अंत्युखियात, इकुन्यात व लुस्त्रात जे काही झाले ते व मी जो छळ सहन केला तो तू ओळखून आहेस; त्या सर्वांतून प्रभूने मला सोडवले.


जीफ, टेलेम व बालोथ;


मावोन, कर्मेल, जीफ व यूटा;


दाविदाला कळून चुकले होते की शौल आपला प्राण घ्यायला निघाला आहे. दावीद जीफ नावाच्या रानात एका उंचवट्यावरील झाडीत राहिला होता.


दावीद कईला येथे गेला हे कोणी शौलाला कळवले तेव्हा तो म्हणाला, “आता देवाने त्याला माझ्या हाती दिले आहे; कारण दरवाजे व अडसर असलेल्या नगरात जाऊन तो आयताच कोंडला गेला आहे.”


शिवाय माझ्या पित्या, पाहा, माझ्या हातात आपल्या झग्याचा काठ आहे, आपल्या झग्याचा काठ मी कापून घेतला, पण आपणाला जिवे मारले नाही, ह्यावरून निश्‍चये समजा की माझ्या मनात काही दुष्ट हेतू अथवा पातक नाही, आपला अपराध मी केला नाही, पण आपण माझा जीव घ्यायला एकसारखे टपला आहात.


दावीद आपल्या मनात म्हणाला, “मी कोणत्या तरी दिवशी शौलाच्या हातून मरणारच तर पलिष्ट्यांच्या देशात पळून जावे ह्यापेक्षा दुसरा चांगला उपाय नाही; अशाने शौल माझ्यासंबंधाने निराश होऊन इस्राएल देशाच्या कोणत्याही प्रांतात माझा ह्यापुढे शोध करणार नाही; ह्याप्रमाणे मी त्याच्या हातून सुटून जाईन.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan