Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ शमुवेल 22:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 विपन्न, कर्जबाजारी व जिवाला त्रासलेले असे सर्व लोक त्याच्याजवळ जमा झाले, तो त्यांचा नायक झाला; सुमारे चारशे पुरुष त्याच्याजवळ जमले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 कोणी अडचणीत पडलेले कोणी कर्जदार व कोणी त्रासलेले असे सर्व त्याच्याकडे एकत्र मिळाले आणि तो त्यांचा सरदार झाला; सुमारे चारशे माणसे त्याच्याजवळ होती.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 जे सर्व निराशेत किंवा कर्जात किंवा असमाधानी होते ते त्याच्याभोवती गोळा झाले आणि दावीद त्यांचा सेनापती झाला. सुमारे चारशे लोक त्याच्याबरोबर होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ शमुवेल 22:2
22 Iomraidhean Croise  

हूशय आणखी म्हणाला, “तू आपल्या बापाला व त्याच्याबरोबरच्या पुरुषांना चांगला ओळखतोस; ते वीर पुरुष आहेत. रानात एखाद्या अस्वलीची पोरे कोणी नेली असताना जशी ती चवताळते तसे ते चवताळलेले आहेत. तुझा बाप मोठा योद्धा आहे; तो काही आपल्या लोकांबरोबर रात्रीचा राहायचा नाही.


गतकाली शौल आमच्यावर राजा असता इस्राएल लोकांची नेआण करणारे पुढारी आपणच होता; आणि परमेश्वर आपणास म्हणाला होता की, माझी प्रजा इस्राएल हिचा मेंढपाळ व अधिपती तूच होशील.”


“परत जाऊन माझ्या लोकांचा नायक हिज्कीया ह्याला सांग, तुझा पूर्वज दावीद ह्याचा देव परमेश्वर म्हणतो, मी तुझी प्रार्थना ऐकली आहे, तुझे अश्रू पाहिले आहेत; मी तुला बरे करतो. तू आजपासून तिसर्‍या दिवशी परमेश्वराच्या मंदिरी जाशील.


एकदा संदेष्ट्याच्या शिष्यांच्या स्त्रियांपैकी एकीने अलीशाकडे गार्‍हाणे केले; ती म्हणाली, “तुझा सेवक, माझा नवरा, मरून गेला आहे; तुला ठाऊक आहे की तो परमेश्वराचे भय बाळगणारा होता. त्याचा सावकार माझ्या दोन पुत्रांना दास करून नेण्यासाठी आला आहे.”


मरणाच्या लागास आलेल्यास मद्य दे, खिन्न मनाच्या मनुष्यास द्राक्षारस दे.


बाप्तिस्मा करणारा योहान ह्याच्या दिवसांपासून तो आतापर्यंत स्वर्गाच्या राज्यावर आक्रमण होत आहे आणि आक्रमण करणारे ते बळकावत आहेत.


अहो कष्टी व भाराक्रांत जनहो, तुम्ही सर्व माझ्याकडे या म्हणजे मी तुम्हांला विसावा देईन.


कारण ज्याच्यासाठी सर्वकाही आहे, व ज्याच्या द्वारे सर्वकाही आहे, त्याने पुष्कळ पुत्रांना गौरवात आणताना त्यांच्या तारणाचा जो उत्पादक त्याला दु:खसहनाच्या द्वारे परिपूर्ण करावे हे त्याला उचित होते.


तेव्हा इफ्ताह आपल्या बांधवांच्या भीतीने पळून गेला आणि टोब देशात जाऊन राहिला. तेथे रिकामटेकडे लोक त्याला मिळाले आणि ते त्याच्याबरोबर वावरू लागले.


दानवंशजांनी त्याला म्हटले, “तुझा आवाज चढवू नकोस, नाहीतर आमचे अविचारी लोक तुझ्यावर तुटून पडतील आणि तू व तुझ्या घरचे लोक प्राणास मुकाल.”


तिचे मन व्यथित झाल्यामुळे ती परमेश्वराची करुणा भाकून ढळढळा रडली.


तेथून दावीद मवाबातील मिस्पे येथे जाऊन मवाबाच्या राजाला म्हणाला, “परमेश्वर माझे काय करणार हे मला समजेपर्यंत माझ्या आईबापांना येऊन तुमच्याजवळ राहू द्या.”


तेव्हा दावीद व त्याचे सुमारे सहाशे लोक कईलातून निघून वाट फुटेल तिकडे गेले. दावीद कईलाहून निसटून गेला हे शौलाला कोणी सांगितले, तेव्हा त्याने निघण्याचे रहित केले.


तेव्हा दावीद आपल्या लोकांना म्हणाला, “आपल्या तलवारी आपल्या कंबरांना बांधा;” आणि त्या प्रत्येकाने आपापली तलवार आपापल्या कंबरेला बांधली; दाविदानेही आपली तलवार कंबरेला बांधली; दाविदाबरोबर चारशे पुरुष गेले, आणि दोनशे पुरुष सामानसुमानाजवळ राहिले.


तेव्हा दावीद मोठ्या पेचात पडला; कारण लोक आपले पुत्र व कन्या ह्यांच्यासाठी शोकाकुल होऊन दाविदाला दगडमार करावा असे म्हणू लागले; पण दावीद आपला देव परमेश्वर ह्याच्यावर भिस्त ठेवून खंबीर राहिला.


“उद्या ह्या सुमारास मी तुझ्याकडे बन्यामिनी प्रांतातला एक मनुष्य पाठवीन, त्याला अभिषेक करून माझ्या इस्राएल लोकांवर अधिपती नेम; तो माझ्या लोकांना पलिष्ट्यांच्या हातून सोडवील; कारण माझ्या लोकांचे गार्‍हाणे माझ्याकडे आले आहे म्हणून त्यांच्याकडे माझी नजर गेली आहे.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan