Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ शमुवेल 22:19 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

19 नोबावर तलवार चालवून पुरुष व स्त्रिया, मुले व तान्ही बाळे, बैल, गाढवे व मेंढरे ह्या सर्वांची त्याने कत्तल केली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

19 त्याने याजकांचे नोब नगर याचा तलवारीच्या धारेने नाश केला; पुरुष स्त्रिया बालके व तान्ही बाळे, आणि गुरे, आणि गाढवे आणि मेंढरे ही त्याने तलवारीच्या धारेने जिवे मारली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

19 त्याने याजकांचे शहर नोब, यातील पुरुष आणि स्त्रिया, लेकरे आणि तान्ही बालके, आणि तेथील गुरे, गाढवे आणि मेंढरे सुद्धा तलवारीने मारून टाकले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ शमुवेल 22:19
13 Iomraidhean Croise  

अनाथोथात, नोबात, अनन्यात,


त्याचा आजचा मुक्काम नोबास आहे; तो सीयोनकन्येच्या डोंगराला, यरुशलेमेच्या टेकडीला, हाताने धमकावत आहे.


तुझ्या लोकांमध्ये कलह माजेल; युद्धसमयी शल्मनाने बेथ-आर्बेलास उद्ध्वस्त केले तेव्हा आईला मुलांसह आपटून मारले, तशी सर्व तटबंदीची नगरे नाश पावतील.


व त्याला म्हणाले, “ही काय म्हणतात हे तू ऐकतोस काय?” येशूने त्यांना म्हटले, “होय; ‘बालके व तान्ही मुले ह्यांच्या मुखांतून तू स्तुती पूर्ण करवली आहे’, हे तुमच्या वाचण्यात कधी आले नाही काय?”


कारण ज्याने दया केली नाही त्याचा न्याय दयेवाचून होईल; दया न्यायावर विजय मिळवते.


हे नगर व ह्यात जे काही असेल ते सर्व परमेश्वराला समर्पित करावे, मात्र राहाब वेश्येला आणि जे कोणी तिच्याबरोबर तिच्या घरी असतील त्यांना जिवंत ठेवावे, कारण आपण पाठवलेल्या जासुदांना तिने लपवून ठेवले होते.


त्या नगरातील पुरुष, स्त्रिया, तरुण, वृद्ध, गुरेमेंढरे, गाढवे वगैरे सर्वांचा त्यांनी तलवारीने समूळ नाश केला.


तर आता जाऊन अमालेकास मार दे; त्यांच्या सर्वस्वाचा विध्वंस कर, त्यांची गय करू नकोस; पुरुष, स्त्रिया, अर्भके, तान्ही बाळे, बैल, मेंढरे, उंट आणि गाढवे ह्या सर्वांचा संहार कर.”’


त्याने अमालेक्यांचा राजा अगाग ह्याला जिवंत पकडले, आणि सर्व लोकांचा तलवारीने निखालस संहार केला.


तरीपण शौलाने व लोकांनी अगागाला जिवंत राखले; त्याचप्रमाणे उत्तम उत्तम मेंढरे, बैल, पुष्ट पशू, कोकरे आणि जेजे काही चांगले ते त्यांनी राखून ठेवले; त्यांचा अगदी नाश करावा असे त्यांना वाटले नाही, तर जे काही टाकाऊ व कुचकामाचे होते त्याचाच त्यांनी अगदी नाश केला.


दावीद नोब येथे अहीमलेख याजकाकडे आला; तेव्हा अहीमलेख थरथर कापत दाविदाला सामोरा येऊन म्हणाला, “तुम्ही एकटेच का? तुमच्याबरोबर कोणी मनुष्य नाही?”


तेव्हा राजाने अहिटूबाचा पुत्र अहीमलेख याजक ह्याला आणि त्याच्या बापाच्या घराण्यातील सर्व माणसे म्हणजे नोब येथे राहणारे सर्व याजक ह्यांना बोलावणे पाठवले; तेव्हा ते सर्व राजाकडे आले.


तेव्हा शौलाच्या नोकरांवर नेमलेला दवेग अदोमी म्हणाला, “मी इशायाच्या पुत्राला नोब येथे अहिटूबाचा पुत्र अहीमलेख ह्याच्याकडे येताना पाहिले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan