Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ शमुवेल 22:18 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

18 तेव्हा राजा दवेगास म्हणाला, “चल, तू जाऊन त्या याजकांवर तुटून पड.” तेव्हा अदोमी दवेग याजकांवर तुटून पडला. त्या दिवशी सणाचे एफोद धारण करणार्‍या पंचाऐंशी पुरुषांचा त्याने वध केला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

18 मग राजाने दवेगाला म्हटले, “तू याजकांच्या अंगावर चालून जा. तेव्हा दवेग अदोमी याजकांच्या अंगावर जाऊन तुटून पडला.” त्या दिवशी त्याने तागाचे एफोद नेसलेल्या पंच्याऐंशी मनुष्यांना जिवे मारले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

18 तेव्हा राजाने दवेगला आज्ञा केली, “तू मागे वळ आणि याजकांना मारून टाक.” तेव्हा एदोमी दोएग फिरला आणि त्यांना मारून टाकले. त्या दिवशी तागाचे एफोद वस्त्र घातलेल्या पंचाऐंशी पुरुषांना त्याने मारून टाकले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ शमुवेल 22:18
14 Iomraidhean Croise  

मग त्यांनी त्याच्याविरुद्ध कट करून राजाज्ञेने परमेश्वराच्या मंदिराच्या अंगणात त्याला दगडमार केला.


त्यांचे याजक तलवारीने पडले, व त्यांच्या विधवा रडल्या नाहीत.


अहरोनाच्या मुलांसाठीही अंगरखे करावेत; त्यांच्या-साठी कमरबंद व फेटे करावेत, ही वस्त्रे गौरवासाठी व शोभेसाठी असावीत.


अरे दुष्टा, नीतिमानाच्या घराचा नाश करण्यास टपू नकोस, त्याच्या विश्रांतिस्थानाचा बिघाड करू नकोस;


एफ्राइमाला पीडा झाली आहे, त्याच्या हक्काची पायमल्ली झाली आहे; कारण तो स्वेच्छेने शून्याच्या मागे लागला.


ते राजाला आपल्या दुष्टतेने, ते सरदारांना आपल्या लबाड्यांनी, खूश करतात.


अम्रीचे कायदे तुम्ही पाळता, अहाबाच्या घराण्याच्या चालीरीती तुम्ही पाळता, व त्यांच्या तत्त्वांप्रमाणे तुम्ही चालता, म्हणून तुमचा नाश होईल, त्याच्या रहिवाशांची निर्भर्त्सना होईल असे मी करीन; माझ्या लोकांची अप्रतिष्ठा तुम्हांला सोसावी लागेल.”


तिच्यातले तिचे सरदार गर्जना करणारे सिंह आहेत, तिचे न्यायाधीश संध्याकाळी बाहेर पडणारे लांडगे आहेत, ते सकाळपर्यंत काही शिल्लक राहू देत नाहीत.


शमुवेल बाळ सणाचे एफोद धारण करून परमेश्वराची सेवा करत असे.


तसेच त्याने माझा याजक व्हावे, माझ्या वेदीवर यज्ञ करावेत, धूप जाळावा आणि माझ्यासमोर एफोद ल्यावे म्हणून इस्राएलाच्या सर्व वंशांतून त्याला मी निवडून नेमले होते की नाही? आणखी तुझ्या मूळ पुरुषाच्या घराण्यास इस्राएल लोकांची सर्व हव्ये मी दिली की नाही?


तुझ्या घराण्यातला जो कोणी वाचून राहील तो चवलीपावलीसाठी व कोरभर भाकरीसाठी त्याच्याकडे जाऊन त्याला दंडवत घालील व म्हणेल की याजकपणाचे कोणतेतरी काम मला द्या म्हणजे मला घासभर अन्न मिळेल.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan