Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ शमुवेल 22:17 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

17 तेव्हा जवळ प्यादे उभे होते त्यांना राजा म्हणाला, “चला, परमेश्वराच्या याजकांचा वध करा; कारण त्यांनी दाविदाशी हातमिळवणी केली आहे; तो पळून गेला हे त्यांना ठाऊक असूनही त्यांनी माझ्या कानावर घातले नाही;” पण परमेश्वराच्या याजकांवर राजाचे सेवक आपला हात टाकीनात.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

17 मग राजा आपणाजवळ जे शिपाई उभे होते त्यांना म्हणाला, “परमेश्वराच्या याजकांच्या अंगावर जाऊन त्यांना मारा कारण त्यांनीही दावीदाचा पक्ष धरला आहे; आणि तो पळाला असे त्यांना कळले असता त्यांनी मला कळवले नाही.” परंतु राजाचे चाकर परमेश्वराच्या याजकांवर तुटून पडायला आपले हात पुढे करीनात.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

17 नंतर राजाने त्याच्या बाजूला असलेल्या अंगरक्षकांना हुकूम दिला: “पुढे येऊन याहवेहच्या याजकांना जिवे मारा, कारण ते सुद्धा दावीदाच्या बाजूने आहेत. दावीद माझ्यापासून पळून चालला होता, हे त्यांना माहीत होते, तरी त्यांनी मला सांगितले नाही.” परंतु याहवेहच्या याजकांवर हात उगारण्यास अंगरक्षकांची इच्छा नव्हती.

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ शमुवेल 22:17
15 Iomraidhean Croise  

ह्यानंतर असे झाले की अबशालोमाने आपल्यासाठी रथ, घोडे व आपल्यापुढे दौडण्यासाठी पन्नास माणसे ठेवली.


त्या समयी हग्गीथेचा पुत्र अदोनीया शिरजोर होऊन म्हणाला, “मी राजा होणार.” त्याने रथ, स्वार व आपल्यापुढे धावण्यासाठी पन्नास पुरुष ठेवले.


रहबाम राजाने त्यांच्याऐवजी पितळेच्या ढाली बनवल्या आणि राजाच्या स्वारीपुढे धावणार्‍यांच्या व राजवाड्याची रखवाली करत होते त्यांच्या स्वाधीन त्या केल्या.


ईजबेल परमेश्वराच्या संदेष्ट्यांचा वध करीत होती तेव्हा ओबद्याने शंभर संदेष्टे नेऊन एका गुहेत पन्नास व दुसर्‍या गुहेत पन्नास असे लपवले व त्यांना अन्नपाणी पुरवले.


होमबली अर्पण करण्याचे संपले तेव्हा येहूने पहारेकर्‍यांना व सरदारांना सांगितले की, “आत जाऊन त्यांचा वध करा; एकालाही बाहेर येऊ देऊ नका.” तेव्हा त्यांनी तलवारीच्या धारेखाली त्यांचा संहार केला; त्या पहारेकर्‍यांनी व सरदारांनी त्यांना बाहेर फेकून दिले आणि बआलाच्या देवळाच्या गढीत ते गेले.


त्या सुइणी देवाचे भय बाळगणार्‍या होत्या, म्हणून त्यांनी मिसरी राजाच्या हुकमाप्रमाणे न करता मुलगेही जिवंत राहू दिले.


परंतु पेत्र व योहान ह्यांनी त्यांना उत्तर दिले की, “देवाच्या ऐवजी तुमचे ऐकावे हे देवाच्या दृष्टीने योग्य की अयोग्य आहे हे तुम्हीच ठरवा;


तेव्हा लोक शौलाला म्हणाले, “ज्याने इस्राएलाचा एवढा उद्धार केला तो योनाथान मरणार काय? असे कदापि होणे नाही; परमेश्वराच्या जीविताची शपथ, त्याच्या डोक्यावरचा एक केसही भूमीवर पडता कामा नये, कारण त्याने आज परमेश्वराच्या पक्षाने कामगिरी केली आहे.” ह्या प्रकारे लोकांनी योनाथानाचा बचाव केला, तो मेला नाही.


पाहा, मी तुझा बाहू व तुझ्या पितृकुळाचा बाहू उच्छेदीन व तुझ्या घरी कोणीही वृद्ध माणूस सापडायचा नाही, असे दिवस येत आहेत.


तेव्हा शौलाने योनाथानाला मारण्यासाठी भाला उगारला; त्यावरून तो समजला की दाविदाला जिवे मारण्याचा आपल्या बापाचा निश्‍चय झाला आहे.


शौल त्याला म्हणाला, “तू व इशायाचा पुत्र अशा तुम्ही दोघांनी माझ्याविरुद्ध कट केला आहे; तू त्याला भाकर व तलवार दिली आणि त्याच्यासाठी तू देवाकडे प्रश्‍न केला व त्यामुळे तो आज माझ्याविरुद्ध उठून माझा घात करू पाहत आहे ह्याचे काय कारण?”


राजा म्हणाला, “अहीमलेखा, तुला व तुझ्या बापाच्या घराण्यातील सर्वांना अवश्य मेले पाहिजे.”


तर आता काय करायचे ह्याचा चांगला विचार कर; कारण आमच्या धन्यावर व त्याच्या सर्व घराण्यावर अरिष्ट येणार आहे, आणि धनी तर असा अधम आहे की त्याला बोलण्याची कोणाची छाती नाही.”


तो म्हणाला, “तुमच्यावर जो राजा राज्य करील तो अशी सत्ता चालवील की तो तुमच्या पुत्रांना धरून आपले रथ व घोडे ह्यांची चाकरी करायला ठेवील, आणि ते त्याच्या रथांपुढे धावतील.


Lean sinn:

Sanasan


Sanasan