Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ शमुवेल 22:16 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

16 राजा म्हणाला, “अहीमलेखा, तुला व तुझ्या बापाच्या घराण्यातील सर्वांना अवश्य मेले पाहिजे.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

16 राजा म्हणाला, “अहीमलेखा, तुला खचित मरण पावले पाहिजे; तुला व तुझ्या वडिलाच्या घराण्यातील सर्वांना मरण पावले पाहिजे”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

16 परंतु राजा म्हणाला, “अहीमेलेख, तू आणि तुझे संपूर्ण कुटुंब, तुम्ही खात्रीने मराल.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ शमुवेल 22:16
14 Iomraidhean Croise  

ईजबेल परमेश्वराच्या संदेष्ट्यांचा वध करीत होती तेव्हा ओबद्याने शंभर संदेष्टे नेऊन एका गुहेत पन्नास व दुसर्‍या गुहेत पन्नास असे लपवले व त्यांना अन्नपाणी पुरवले.


तेव्हा ईजबेलीने जासूद पाठवून एलीयाला बजावले की, “संदेष्ट्यांच्या जिवाच्या गतीसारखी तुझ्या जिवाची गती उद्या ह्याच वेळी केली नाही तर देव माझे तसेच व त्याहूनही अधिक करोत.”


एकट्या मर्दखयावर हात टाकणे हे त्याला त्याच्या दृष्टीने कमीपणाचे वाटले, कारण मर्दखय कोणत्या जातीचा आहे हे त्यांनी हामानास सांगितले होते; त्यामुळे अहश्वेरोशाच्या अवघ्या साम्राज्यातील मर्दखयाचे लोक म्हणजे सर्व यहूदी लोक ह्यांचा नायनाट करण्याचा बेत हामानाने केला.


गरीब प्रजेवरचा दुष्ट अधिपती गर्जणार्‍या सिंहासारखा आणि भक्ष्य शोधत फिरणार्‍या अस्वलासारखा आहे.


हे ऐकून राजा क्रोधाने संतप्त झाला आणि ‘बाबेलच्या सर्व ज्ञान्यांचा वध करावा’ अशी त्याने आज्ञा केली.


राजाने खास्द्यांना म्हटले की, “माझा ठराव होऊन चुकला आहे की माझे स्वप्न व त्याचा अर्थ मला तुम्ही कळवला नाही, तर तुमचे तुकडे-तुकडे करून तुमची घरे उकिरडे करावेत.


तेव्हा मागी लोकांनी आपल्याला फसवले हे पाहून हेरोद अतिशय संतापला आणि जी वेळ त्याने मागी लोकांपासून नीट विचारून घेतली होती तिच्याप्रमाणे त्याने बेथलेहेमात व आसपासच्या सर्व प्रदेशांत जी दोन वर्षांची व त्यांहून कमी वयाची बालके होती त्या सर्वांना त्याने माणसे पाठवून त्यांच्याकडून जिवे मारवले.


हेरोदाने त्याचा शोध केला असताही शोध लागला नाही; म्हणून त्याने पहारेकर्‍यांची चौकशी करून त्यांना ठार मारण्याचा हुकूम सोडला. मग तो यहूदीयाहून कैसरीयात येऊन राहिला.


मुलांसाठी बापांना जिवे मारू नये अथवा बापांसाठी मुलांना जिवे मारू नये; जो गुन्हा करील त्यालाच त्याच्या गुन्ह्याबद्दल जिवे मारावे.


शौल म्हणाला, “परमेश्वर असेच करो, किंबहुना ह्याहून अधिक करो; योनाथान, तुला अवश्य मेले पाहिजे.”


जोवर हा इशायपुत्र ह्या भूतलावर जिवंत आहे तोवर तुला व तुझ्या राज्याला कधीही स्थिरता प्राप्त व्हायची नाही; तर आता बोलावणे पाठवून त्याला माझ्याकडे आण; त्याला अवश्य मारून टाकायचे आहे.”


मी काय आजच पहिल्याने त्याच्यासाठी देवाकडे प्रश्‍न करू लागलो काय? असे माझ्याकडून न घडो; राजाने आपल्या ह्या सेवकाला आणि माझ्या बापाच्या सर्व घराण्याला असा बट्टा लावू नये; कारण ह्या प्रकरणी आपल्या दासाला अधिकउणे काहीच माहीत नाही.”


तेव्हा जवळ प्यादे उभे होते त्यांना राजा म्हणाला, “चला, परमेश्वराच्या याजकांचा वध करा; कारण त्यांनी दाविदाशी हातमिळवणी केली आहे; तो पळून गेला हे त्यांना ठाऊक असूनही त्यांनी माझ्या कानावर घातले नाही;” पण परमेश्वराच्या याजकांवर राजाचे सेवक आपला हात टाकीनात.


Lean sinn:

Sanasan


Sanasan