Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ शमुवेल 22:15 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

15 मी काय आजच पहिल्याने त्याच्यासाठी देवाकडे प्रश्‍न करू लागलो काय? असे माझ्याकडून न घडो; राजाने आपल्या ह्या सेवकाला आणि माझ्या बापाच्या सर्व घराण्याला असा बट्टा लावू नये; कारण ह्या प्रकरणी आपल्या दासाला अधिकउणे काहीच माहीत नाही.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

15 आजच मी त्याच्यासाठी परमेश्वरास विचारू लागलो काय? असे करणे माझ्यापासून दूर असो; राजाने आपल्या दासास किंवा माझ्या वडिलाच्या घराण्यातील कोणाला अपराध लावू नये कारण या सर्वांतले अधिक उणे काहीच तुझ्या दासास ठाऊक नाही.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

15 केवळ त्याच दिवशी मी त्याच्यासाठी परमेश्वराकडे चौकशी केली काय? नक्कीच नाही! राजाने आपल्या सेवकावर किंवा त्याच्या पित्याच्या घराण्यातील कोणावरही आरोप करू नये, कारण आपल्या सेवकाला या सर्व प्रकरणाबद्दल काहीच माहीत नाही.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ शमुवेल 22:15
10 Iomraidhean Croise  

अबशालोमाच्या सांगण्यावरून त्याच्याबरोबर दोनशे पुरुष गेले. ते भोळ्या भावाने गेले; त्यांना काहीएक ठाऊक नव्हते.


राजाच्या घरची माणसे आणण्यासाठी व त्याला तिचा वाटेल तसा उपयोग करण्यासाठी एक नाव तेथे ठेवली होती. राजा यार्देन उतरून जाण्यासाठी आला तेव्हा गेराचा पुत्र शिमी त्याच्या पाया पडून म्हणाला,


“माझ्या स्वामींनी माझा अपराध जमेस धरू नये, ज्या दिवशी माझे स्वामीराज यरुशलेम सोडून निघाले त्या दिवशी आपल्या दासाने दुष्टपणाचे वर्तन केले त्याचे स्मरण करू नये. महाराजांनी ते मनात ठेवू नये.


दाविदाने परमेश्वराला प्रश्‍न केला, “मी पलिष्ट्यांवर चढाई करू काय? तू त्यांना माझ्या हाती देशील काय?” परमेश्वराने दाविदाला म्हटले, “चढाई कर; मी खात्रीने पलिष्ट्यांना तुझ्या हाती देतो.”


मग दाविदाने परमेश्वराला प्रश्‍न केला असता त्याने सांगितले, “त्यांच्याशी सामना करू नकोस, तर वळसा घेऊन त्यांच्या पिछाडीस जा आणि तुतीच्या झाडांसमोरून त्यांच्यावर छापा घाल.


आम्हांला अभिमान बाळगण्याचे कारण, म्हणजे आमच्या सदसद्विवेकबुद्धीची साक्ष ही आहे की, दैहिक ज्ञानाने नव्हे तर देवाच्या कृपेने, आम्ही जगात व विशेषेकरून तुमच्याबरोबर देवाने दिलेल्या पवित्रतेने व सात्त्विकपणाने वागलो.


राजा म्हणाला, “अहीमलेखा, तुला व तुझ्या बापाच्या घराण्यातील सर्वांना अवश्य मेले पाहिजे.”


मग अबीगईल नाबालाकडे गेली, तेव्हा त्याने आपल्या घरी राजाच्यासारखी मेजवानी केली आहे असे तिने पाहिले; त्याचे चित्त रमून गेले होते. तो फार झिंगला होता; ह्यास्तव सकाळी उजाडेपर्यंत तिने त्याला कमीजास्त काही सांगितले नाही.


Lean sinn:

Sanasan


Sanasan