Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ शमुवेल 22:14 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

14 अहिमलेखाने राजाला उत्तर केले, “आपल्या सर्व सेवकांमध्ये दाविदासारखा विश्वासू कोण आहे? तो तर राजाचा जावई असून आपल्या मंत्रीमंडळातला आहे, दरबारात त्याची मोठी प्रतिष्ठा आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

14 तेव्हा अहीमलेखाने राजाला उत्तर देऊन म्हटले, “तुझ्या सर्व चाकरांमध्ये दावीदासारखा कोण विश्वासू आहे? तो राजाचा जावई आहे व एकांती तुझ्याजवळ मसलतीला येत असतो व तुझ्या घरात प्रतिष्ठीत आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

14 अहीमेलेखाने राजाला उत्तर दिले, “तुमच्या सर्व सेवकांपैकी राजाचा जावई दावीद याच्याइतका विश्वासू असा दुसरा कोण आहे जो तुमच्या अंगरक्षकांचा प्रमुख आणि तुमच्या घराण्यात सर्वाधिक आदरणीय आहे?

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ शमुवेल 22:14
13 Iomraidhean Croise  

इस्राएल लोक म्हणू लागले, “हा चालून आलेला पुरुष तुम्ही पाहिला ना? तो इस्राएलाची निर्भर्त्सना करायला आला आहे; जो कोणी त्याला ठार मारील त्याला राजा बहुत धन देऊन संपन्न करील, आपली कन्या त्याला देईल, आणि इस्राएलात त्याच्या बापाचे घराणे स्वतंत्र करील.”


मग शौलाने दाविदाला आपल्यापासून दूर करून सहस्रपती नेमले; तो लोकांच्या पुढे चालत असे.


तेव्हा दावीद आपले लोक बरोबर घेऊन गेला व त्याने पलिष्ट्यांचे दोनशे पुरुष मारले; दाविदाने त्यांच्या अग्रत्वचा आणून राजाचा जावई होण्यासाठी त्याला बरोबर मोजून दिल्या; तेव्हा शौलाने आपली कन्या मीखल हिचे त्याच्याशी लग्न करून दिले.


योनाथान आपला बाप शौल ह्याला म्हणाला, “त्याला मारून का टाकायचे? त्याने काय केले आहे?”


दावीद अहीमलेख याजकाला म्हणाला, “राजाने मला काही कामगिरीवर पाठवले आहे, आणि मला सांगितले आहे की ज्या कामगिरीवर मी तुला पाठवत आहे आणि तुला जी आज्ञा मी देत आहे तिच्याविषयी कोणाला काही कळू देऊ नकोस, मला अमुक ठिकाणी येऊन भेटा असे मी आपल्या चाकरांना सांगितले आहे.


शौल त्याला म्हणाला, “तू व इशायाचा पुत्र अशा तुम्ही दोघांनी माझ्याविरुद्ध कट केला आहे; तू त्याला भाकर व तलवार दिली आणि त्याच्यासाठी तू देवाकडे प्रश्‍न केला व त्यामुळे तो आज माझ्याविरुद्ध उठून माझा घात करू पाहत आहे ह्याचे काय कारण?”


शिवाय माझ्या पित्या, पाहा, माझ्या हातात आपल्या झग्याचा काठ आहे, आपल्या झग्याचा काठ मी कापून घेतला, पण आपणाला जिवे मारले नाही, ह्यावरून निश्‍चये समजा की माझ्या मनात काही दुष्ट हेतू अथवा पातक नाही, आपला अपराध मी केला नाही, पण आपण माझा जीव घ्यायला एकसारखे टपला आहात.


आपल्या ह्या दासीचा अपराध क्षमा करा; कारण परमेश्वर खरोखर माझ्या स्वामींचे घराणे कायमचे वसवील; कारण माझे स्वामी परमेश्वराच्या लढाया लढत आहेत; आपल्या सर्व आयुष्यभर आपल्या ठायी कसलेही अनिष्ट आढळणार नाही.


परमेश्वर प्रत्येकाला त्याच्या नीतिमत्तेचे व सचोटीचे फळ देईल; आज परमेश्वराने आपणाला माझ्या हाती दिले होते तरी मी परमेश्वराच्या अभिषिक्तावर आपला हात टाकला नाही.


Lean sinn:

Sanasan


Sanasan