Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ शमुवेल 21:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

7 त्या दिवशी तेथे शौलाचा दवेग नावाचा एक सेवक परमेश्वरासमोर खोळंबून राहिला होता; तो अदोमी असून शौलाच्या गुराख्यांचा प्रमुख होता.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 त्या दिवशी शौलाच्या चाकरातील एक पुरुष तेथे परमेश्वराच्या पुढे थांबवलेला असा होता; त्याचे नाव दवेग; तो अदोमी होता; तो शौलाच्या गुराख्यांचा मुख्य होता.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

7 त्या दिवशी शौलाचा एक सेवक तिथे होता, ज्याला याहवेहसमोर थांबवून ठेवले गेले होते; तो शौलाचा मुख्य मेंढपाळ दवेग, एदोमी प्रांतातील होता.

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ शमुवेल 21:7
21 Iomraidhean Croise  

तेव्हा गरार येथील गुराखी इसहाकाच्या गुराख्यांशी भांडले व म्हणाले की, “हे पाणी आमचे आहे.” त्यावरून त्याने त्या विहिरीचे नाव एसेक (कलह) असे ठेवले; कारण त्यांनी त्याच्याशी कलह केला.


जी गुरे शारोनात चरत असत त्यांवर शित्रय शारोनी हा होता; खोर्‍यातल्या गुरांवर अदलय ह्याचा पुत्र शाफाट हा होता;


आणि मेंढरांवर याजीज हाग्री हा होता; हे दावीद राजाच्या धनावर अधिकारी होते.


त्याची पुष्कळ जनावरे होती म्हणून त्याने जंगलात, तळवटीत व मैदानांत बुरूज बांधले व पुष्कळ हौद खोदले. पहाडात व कर्मेलात त्याचे शेतकरी व द्राक्षाचे मळेकरी असत, कारण त्याला शेतीची फार आवड होती.


लोक येतात तसे ते तुझ्याकडे येऊन माझ्या लोकांच्या रीतीप्रमाणे तुझ्यापुढे बसतात, ते तुझी वचने ऐकतात पण त्याप्रमाणे चालत नाहीत; ते तोंडाने गोडगोड गोष्टी बोलतात, पण त्यांचे मन लोभवश झाले आहे.


कोणा परक्याने पवित्र पदार्थ खाऊ नयेत; याजकाचा पाहुणा किंवा मजूर ह्यानेही पवित्र पदार्थ खाऊ नयेत.


याजकाची मुलगी विधवा असली अथवा नवर्‍याने टाकलेली असली, आणि ती विनापत्य असून तरुणपणी होती तशीच आपल्या बापाच्या घरी परत येऊन राहत असली तर तिने आपल्या बापाचे अन्न खावे; पण कोणा परक्याने ते खाऊ नये.


तू सपीठ घेऊन त्याच्या बारा पोळ्या भाज; एक पोळी दोन दशमांश एफाभर सपिठाची करावी.


दर शब्बाथवारी त्याने परमेश्वरासमोर त्या नित्यनेमाने मांडाव्यात; इस्राएल लोकांच्या वतीने हा सर्वकाळचा करार होय.


तुम्ही म्हणता, “चंद्रदर्शन कधी आटोपेल? म्हणजे आम्हांला धान्य विकता येईल; शब्बाथ केव्हा संपेल म्हणजे आम्ही गहू बाहेर काढू, एफा लहान करू, शेकेल मोठा करू व खोट्या तागडीने फसवू;


‘हे लोक [तोंड घेऊन माझ्याकडे येतात व] ओठांनी माझा सन्मान करतात, परंतु त्यांचे अंतःकरण माझ्यापासून दूर आहे.


तेव्हा शौल गुरांच्या मागून शेतातून येत होता; त्याने विचारले, “लोक का रडतात? त्यांना काय झाले?” याबेशच्या लोकांचे म्हणणे त्यांनी त्याला कळवले.


इस्राएलावर राज्य स्थापित केल्यावर शौलाने मवाबी, अम्मोनी, अदोमी, सोबाचे राजे व पलिष्टी ह्यांच्याशी युद्ध केले. जिकडे जिकडे तो जाई तिकडे तिकडे तो विजयी होई.


मग दावीद अहीमलेखाला म्हणाला, “येथे तुझ्याजवळ एखादा भाला किंवा तलवार आहे काय? राजाची कामगिरी एवढ्या निकडीची होती की मी आपली तलवार किंवा आपली दुसरी हत्यारे बरोबर आणली नाहीत.”


त्याने त्याच्यासाठी परमेश्वराकडे प्रश्‍न केला, त्याला अन्नसामग्री पुरवली आणि गल्याथ पलिष्ट्याची तलवार त्याला दिली.”


दावीद अब्याथारास म्हणाला, “ज्या दिवशी अदोमी दवेग तेथे होता त्याच दिवशी मी ताडले की हा निश्‍चितच शौलाला सांगेल; तुझ्या बापाच्या घराण्यातल्या सर्व माणसांच्या मरणास मी कारण झालो आहे.


तेव्हा शौलाच्या नोकरांवर नेमलेला दवेग अदोमी म्हणाला, “मी इशायाच्या पुत्राला नोब येथे अहिटूबाचा पुत्र अहीमलेख ह्याच्याकडे येताना पाहिले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan