Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ शमुवेल 20:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 तर तू आपल्या दासावर कृपा कर; कारण तू परमेश्वराची शपथ वाहून आपल्या दासाशी करार केला आहे; माझ्याकडून काही अपराध घडला असला तर तूच मला मारून टाक; तुझ्या बापाकडे मला कशाला नेतोस?”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 यास्तव तू आपल्या दासावर कृपा कर. कारण तू आपल्या दासास आपल्याबरोबर परमेश्वराच्या करारात आणले आहे; तथापि माझ्या ठायी अन्याय असला तर तूच मला जिवे मार; तू आपल्या बापाजवळ मला का आणावे?”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 तर, तुझ्या सेवकावर दया दाखव, कारण तू त्याला याहवेहसमोर तुझ्याशी करार करून घेतले आहेस. जर मी दोषी आहे, तर तू स्वतःच मला मार! तुझ्या पित्याच्या हाती मला का स्वाधीन करावे?”

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ शमुवेल 20:8
16 Iomraidhean Croise  

तर आता माझ्या धन्याशी स्नेहाने व सत्याने वागणार असलात तर तसे सांगा, नसल्यास तसे सांगा; म्हणजे मी उजवीडावी वाट धरीन.”


इस्राएलाचा अंतकाळ समीप आला तेव्हा त्याने आपला मुलगा योसेफ ह्याला बोलावून आणून म्हटले, “तुझी माझ्यावर कृपादृष्टी असेल तर माझ्याशी तू ममतेने व सत्यतेने वागून मला मिसर देशात पुरणार नाहीस अशी शपथ माझ्या मांडीखाली हात ठेवून वाहा;


अबशालोम यवाबाला म्हणाला, “मला गशूराहून का आणले? तेथेच मी आजवर राहिलो असतो तर बरे झाले असते, असा निरोप तुझ्या हाती राजाला पाठवावा म्हणून मी तुला येथे ये, असे सांगून पाठवले होते. तर आता मला राजाचे दर्शन करवून दे; मी दोषी असलो तर त्याने मला मारून टाकावे.”


दावीद त्यांना सामोरा जाऊन म्हणाला, “तुम्ही केवळ मित्रभावाने कुमक करण्यासाठी माझ्याकडे आला असल्यास माझे मन तुमच्याशी जडून राहील; पण तुम्ही माझ्याशी दगा करून मला शत्रूंच्या हाती देण्यासाठी आला असाल तर आपल्या पूर्वजांचा देव हे पाहून तुम्हांला शासन करो, कारण माझ्या हातून काही उपद्रव झालेला नाही.”


मी अधीरपणे म्हणालो की, “सर्व माणसे लबाड आहेत.”


दया व सत्य ही तुला न सोडोत; त्यांची माळ तू आपल्या गळ्यात वागव; त्यांना आपल्या हृत्पटलावर लिहून ठेव;


मी अपराध केला असला किंवा मरणास योग्य असे काही केले असले तर मी मरण्यास तयार नाही असे नाही; परंतु त्यांनी माझ्यावर जे आरोप ठेवले आहेत त्यांतला एकही जर खरा ठरत नाही, तर मला त्यांच्या स्वाधीन करण्याचा कोणालाही अधिकार नाही; मी कैसराजवळ न्याय मागतो.”


तेव्हा त्या पुरुषांनी तिला म्हटले, “तुम्ही ही आमची कामगिरी बाहेर फोडली नाही तर तुमच्यासाठी आम्ही आमचे प्राण देऊ; आणि परमेश्वर आम्हांला हा देश देईल तेव्हा आम्ही तुझ्याशी दयाळूपणाने व खरेपणाने वागू.”


“देवाधिदेव परमेश्वर, देवाधिदेव परमेश्वर ह्याला ठाऊक आहे व इस्राएलासही ठाऊक होवो की, आम्ही परमेश्वराविरुद्ध बंड करून किंवा त्याचा विश्वासघात करून असे केले असल्यास तो आज आम्हांला जिवंत न ठेवो!


नामी आपल्या सुनांना म्हणाली, “तुम्ही दोघी आता आपापल्या माहेरी जा; तुम्ही जशी माझ्या मृतांवर व माझ्यावर माया केली तशीच परमेश्वर तुमच्यावर करो.


दाविदाचे शौलाशी भाषण संपले तेव्हा योनाथानाचे मन दाविदाच्या मनाशी इतके जडले की तो त्याला प्राणाप्रमाणे प्रिय झाला.


मग योनाथानाने दाविदाशी आणभाक केली; कारण तो त्याला प्राणाप्रमाणे प्रिय झाला होता.


ह्यामुळे योनाथानाने दाविदाच्या घराण्याशी आणभाक केली; तो म्हणाला, “असे न केल्यास परमेश्वर दाविदाच्या शत्रूंच्या हातून माझे पारिपत्य करो.”


योनाथान म्हणाला, “असे कधी होणार नाही; माझ्या बापाने तुझा घात योजला तर त्याची चाहूल मला लागताच मी तुला सांगणार नाही काय?”


त्या दोघांनी परमेश्वरापुढे करार केला; मग दावीद त्या उंचवट्यावरील झाडीत राहिला व योनाथान आपल्या घरी गेला.


Lean sinn:

Sanasan


Sanasan