Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ शमुवेल 20:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 दावीद योनाथानाला म्हणाला, “हे पाहा, उद्या चंद्रदर्शन आहे व राजाच्या पंक्तीला बसून भोजन करणे मला चुकणार नाही; तर तू मला जाऊ दे, म्हणजे मी परवा संध्याकाळपर्यंत रानात लपून राहीन.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 दावीद योनाथानाला म्हणाला, “पाहा उद्या चंद्रदर्शन आहे तेव्हा मला राजाबरोबर जेवण्यास बसणे भागच आहे; परंतु मला जाऊ दे परवा संध्याकाळपर्यंत मी रानात लपून राहीन.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 तेव्हा दावीद म्हणाला, “पाहा उद्या चंद्रदर्शन आहे आणि मला राजाबरोबर चंद्रदर्शनाचे भोजन करावयाचे आहे; पण मला जाऊ दे म्हणजे मी परवाच्या संध्याकाळपर्यंत शेतात लपून राहीन.

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ शमुवेल 20:5
17 Iomraidhean Croise  

तो म्हणाला, “तू आज त्याच्याकडे का चाललीस? आज काही चंद्रदर्शन किंवा शब्बाथ नाही.” ती म्हणाली, “काही चिंता नाही.”


कारण ज्याने माझी निंदा केली तो काही माझा वैरी नव्हता; असता तर मी ते सहन केले असते; माझ्यापुढे ज्याने तोरा मिरवला तो काही माझा शत्रू नव्हता; असता तर मी त्याच्यापासून लपून राहिलो असतो;


शुक्ल प्रतिपदेस, पौर्णिमेस, आमच्या सणाच्या दिवशी कर्णा वाजवा.


चतुर मनुष्य अरिष्ट येताना पाहून लपतो; भोळे पुढे जातात आणि हानी पावतात.


तुम्ही म्हणता, “चंद्रदर्शन कधी आटोपेल? म्हणजे आम्हांला धान्य विकता येईल; शब्बाथ केव्हा संपेल म्हणजे आम्ही गहू बाहेर काढू, एफा लहान करू, शेकेल मोठा करू व खोट्या तागडीने फसवू;


आपल्या आनंदाच्या दिवशी, नेमलेल्या सणांच्या दिवशी आणि प्रत्येक महिन्याच्या प्रतिपदेस आपले होमबली व शांत्यर्पणाचे बली अर्पण करत असताना हे कर्णे वाजवावेत; ते तुमच्या देवाला तुमची आठवण करून देतील; मी परमेश्वर तुमचा देव आहे.”


प्रत्येक महिन्याच्या प्रतिपदेस परमेश्वराप्रीत्यर्थ होमार्पण करावे; दोन गोर्‍हे, एक मेंढा आणि एकेक वर्षाची नरजातीची सात दोषहीन कोकरे अर्पावीत;


ह्यावरून त्यांनी त्याला मारण्याकरता दगड उचलले; परंतु येशू मंदिरातून1 गुप्तपणे निघून गेला.


त्यावरून बंधुजनांनी पौलाला समुद्राकडे जाण्यास लगेच पाठवले; आणि सीला व तीमथ्य हे तेथेच राहिले.


तर मग खाण्यापिण्याविषयी, तसेच सण, अमावस्या किंवा शब्बाथ पाळण्याविषयी कोणाला तुमचा निर्णय करू देऊ नका.


म्हणून योनाथानाने दाविदाला सागितले की, “माझा बाप शौल तुला मारून टाकायला पाहत आहे; तर तू सकाळपर्यंत सावध होऊन एखाद्या गुप्त स्थळी लपून राहा.


योनाथान त्याला म्हणाला, “उद्या चंद्रदर्शन आहे तर तुझी जागा रिकामी पाहून तू नाहीस असे समजून येईल.


तीन दिवस झाल्यावर ताबडतोब ये आणि तो प्रसंग घडला त्या दिवशी तू ज्या जागी लपून राहिला होतास त्या जागी एजेल नावाच्या शिळेजवळ राहा.


मग दावीद जाऊन मैदानात लपला; चंद्रदर्शनाच्या दिवशी राजा भोजनाला बसला.


चंद्रदर्शनाच्या दुसर्‍या दिवशीही दाविदाची जागा रिकामीच होती; तेव्हा शौल आपला पुत्र योनाथान ह्याला म्हणाला, “इशायपुत्र काल व आज भोजनास का आला नाही?”


योनाथान दाविदाला म्हणाला, “तुझ्या जिवास वाटेल ते मी तुझ्यासाठी करीन.”


तुझ्या बापाने माझे नाव काढलेच तर त्याला सांग की ’दाविदाला आपला गाव बेथलेहेम येथे तातडीने जायचे होते म्हणून त्याने मोठ्या आग्रहाने माझ्याजवळ रजा मागितली; तेथे त्याच्या सगळ्या कुळाचा वार्षिक यज्ञ आहे.’


Lean sinn:

Sanasan


Sanasan