Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ शमुवेल 20:41 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

41 तो पोरगा निघून जाताच दावीद दक्षिणेकडील एका ठिकाणाकडून उठून आला व त्याने भूमीवर उपडे पडून तीनदा नमन केले; मग एकमेकांचे चुंबन घेऊन ते रडू लागले; दावीद तर मनस्वी रडला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

41 पोर गेल्यावर दावीद दक्षिणेकडील एका ठिकाणातून उठून भूमीवर उपडा पडला व तीन वेळा नमला; तेव्हा ते एकमेकाचे चुंबन घेऊन एकमेकांसाठी रडले पण दावीद अधीक रडला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

41 तो मुलगा निघून गेल्यानंतर, दावीद त्या दगडाच्या दक्षिण बाजूने उठला आणि योनाथानसमोर भूमीवर उपडे पडून तीन वेळेस नमन केले. नंतर त्या दोघांनी एकमेकांचे चुंबन घेतले आणि एकत्र रडले—परंतु दावीद अधिक रडला.

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ शमुवेल 20:41
20 Iomraidhean Croise  

मग याकोब राहेलीचे चुंबन घेऊन मोठ्याने रडला.


लाबानाने आपला भाचा याकोब आल्याचे वर्तमान ऐकले तेव्हा तो धावत त्याला सामोरा गेला. त्याला आलिंगन देऊन त्याने त्याची चुंबने घेतली; त्याने त्याला आपल्या घरी नेले. मग त्याने लाबानाला सर्व वृत्तान्त कथन केला.


तेव्हा एसाव त्याला भेटण्यासाठी धावत आला, त्याने त्याला आलिंगन दिले; त्याच्या गळ्यात गळा घालून त्याचे चुंबन घेतले, आणि ते दोघे रडले.


योसेफ त्या देशाचा मुख्य अधिकारी होता, आणि देशातल्या सर्व लोकांना तोच धान्य विकत असे. योसेफाच्या भावांनी येऊन जमिनीपर्यंत लवून त्याला मुजरा केला.


ते म्हणाले, “आपला दास, आमचा पिता सुखरूप आहे, तो अजून जिवंत आहे.” त्यांनी लवून त्याला मुजरा केला.


आणि सर्व भावांचे मुके घेऊन त्यांच्या गळा पडून तो रडला; त्यानंतर त्याचे भाऊ त्याच्याबरोबर बोलत बसले.


ह्यानंतर तिसर्‍या दिवशी छावणीतून शौल होता तेथून एक माणूस आला; त्याने आपले कपडे फाडले होते व डोक्यात धूळ घातली होती. तो दाविदाजवळ येऊन पोहचल्यावर त्याने त्याला साष्टांग दंडवत घातले.


माझ्या बंधो, योनाथाना, मी तुझ्याकरिता विव्हळ होत आहे. तू माझ्यावर फार माया करत असायचास. तुझे माझ्यावर विलक्षण प्रेम होते, स्त्रियांच्या प्रेमाहूनही ते अधिक होते.


तकोवा येथील त्या स्त्रीने राजाकडे जाऊन त्याला साष्टांग दंडवत घातले आणि म्हटले, “महाराज, माझी दाद लावा.”


मग सारे लोक यार्देनेपलीकडे गेले; राजाही पलीकडे गेला; राजाने बर्जिल्लयाचे चुंबन घेऊन त्याचे अभीष्ट चिंतले; आणि तो स्वस्थानी परत गेला.


मफीबोशेथ बिन योनाथान बिन शौल ह्याने येऊन दाविदाला भूमीपर्यंत लवून दंडवत घातले. दावीद म्हणाला, “मफीबोशेथा!” तो म्हणाला, “आपला दास हजर आहे.”


बथशेबेने राजाला लवून मुजरा केला. त्याने तिला विचारले, “तुला काय पाहिजे?”


लोक राजाला म्हणाले, “पाहा, नाथान संदेष्टा आला आहे.” त्याने राजासमोर होऊन त्याला भूमीपर्यंत लवून मुजरा केला.


तेव्हा बथशेबेने भूमीपर्यंत लवून राजाला मुजरा करून म्हटले, “माझे स्वामीराज दावीद चिरायू होवोत.”


तेव्हा ते सर्व फार रडले व त्यांनी पौलाच्या गळ्यात गळा घालून त्याचे पुष्कळ मुके घेतले.


मग शमुवेलाने तेलाची कुपी घेऊन शौलाच्या मस्तकावर ओतली व त्याचे चुंबन घेऊन म्हटले, “परमेश्वराने तुला हा अभिषेक केला आहे तो त्याच्या वतनाचा अधिपती व्हावे म्हणूनच ना?


मग योनाथानाने दाविदाशी आणभाक केली; कारण तो त्याला प्राणाप्रमाणे प्रिय झाला होता.


योनाथानाने आपली हत्यारे आपल्या पोराला देऊन सांगितले की, “ही नगरात घेऊन जा.”


दावीद शौलाला म्हणाला, “लोक म्हणतात की, पाहा, दावीद आपला घात करू पाहत आहे, त्यांच्या बोलण्याकडे आपण का कान देता?


अबीगईल दाविदाला पाहून झटकन गाढवावरून उतरली व दाविदापुढे जमिनीवर उपडी पडून तिने दंडवत घातले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan