Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ शमुवेल 20:30 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

30 तेव्हा शौलाचा कोप योनाथानावर भडकला आणि तो त्याला म्हणाला, “अरे दुष्ट, फितुरखोर बायकोच्या पोरा, तुझी व तुझ्या आईची बेअब्रू व्हावी म्हणून तुझे मन इशायपुत्रावर बसले आहे हे मला ठाऊक नाही काय?

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

30 तेव्हा योनाथानावर शौलाचा राग पेटला तो त्यास म्हणाला, “अरे विपरीत फितूर खोर पत्नीच्या मुला तुझी फजिती व तुझ्या आईच्या नागवेपणाची फजिती होण्यास तू इशायाच्या मुलाशी जडलास हे मला ठाऊक नाही काय?

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

30 शौलाचा राग योनाथानवर भडकला आणि तो त्याला म्हणाला, “भ्रष्ट आणि फितुरी स्त्रीच्या मुला! तू तुझ्या स्वतःची व जिने तुला जन्म दिला त्या तुझ्या आईची बेअब्रू करून त्या इशायच्या पुत्राच्या बाजूने आहेस हे मला माहीत नाही काय?

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ शमुवेल 20:30
14 Iomraidhean Croise  

मूर्ख तर चिंता करून करून नाश पावतो; वेडा मत्सराने मरतो.


ज्याला लवकर क्रोध येत नाही तो महाबुद्धिवान होय; उतावळ्या स्वभावाचा माणूस मूर्खता प्रकट करतो.


सुज्ञाची जिव्हा सुज्ञान वदते; मूर्खाच्या मुखातून मूर्खता बाहेर पडते.


राजाचा कोप सिंहाच्या गर्जनेसारखा आहे; त्याची प्रसन्नता गवतावर पडलेल्या दहिवरासारखी आहे.


क्रोधिष्ट मनुष्याने आपला दंड भोगला पाहिजे, कारण त्याला एकदा दंडमुक्त केले तर तसे पुनःपुन्हा करावे लागेल.


गर्विष्ठ व चढेल मनुष्याला ‘उद्दाम’ म्हणतात, तो गर्वाच्या ताठ्याने वागतो.


ज्या मनुष्याचे चित्त स्वाधीन नाही, तो गावकुसू नसलेल्या पडक्या गावासारखा आहे.


दगड जड असतो व वाळू वजनाने भारी असते, पण मूर्खाचा राग ह्या दोहोंहून भारी असतो.


मी तर तुम्हांला सांगतो, जो कोणी आपल्या भावावर [उगाच] रागावेल तो न्यायसभेच्या शिक्षेस पात्र होईल; जो कोणी आपल्या भावाला, ‘अरे वेडगळा,’ असे म्हणेल तो वरिष्ठ सभेच्या शिक्षेस पात्र होईल आणि जो कोणी त्याला ‘अरे मूर्खा,’ असे म्हणेल, तो नरकाग्नीच्या शिक्षेस पात्र होईल.


सर्व प्रकारचे कडूपण, संताप, क्रोध, गलबला व निंदा ही अवघ्या दुष्टपणासह तुमच्यापासून दूर करण्यात येवोत;


बापांनो, तुम्ही आपल्या मुलांना चिडीस आणू नका; तर प्रभूच्या शिस्तीत व शिक्षणात त्यांना वाढवा.


तो म्हणाला, मला जाऊ दे, कारण त्या नगरात आमचे कूळ यज्ञ करणार आहे, आणि माझ्या भावाने मला तेथे बोलावले आहे, तर आता माझ्यावर तुझी कृपादृष्टी असेल तर मला जाऊ दे, म्हणजे मी आपल्या भावांना भेटून येईन; ह्यामुळेच तो राजाच्या पंक्तीला आला नाही.”


जोवर हा इशायपुत्र ह्या भूतलावर जिवंत आहे तोवर तुला व तुझ्या राज्याला कधीही स्थिरता प्राप्त व्हायची नाही; तर आता बोलावणे पाठवून त्याला माझ्याकडे आण; त्याला अवश्य मारून टाकायचे आहे.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan