Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ शमुवेल 20:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 दावीद प्रतिज्ञापूर्वक म्हणाला, “तुझी कृपादृष्टी माझ्यावर आहे हे तुझ्या बापाला पक्के ठाऊक आहे म्हणून तो म्हणतो की ही गोष्ट योनाथानाला कळू नये; कारण त्याला फार वाईट वाटेल; बाकी परमेश्वराच्या जीविताची व तुझ्या जीविताची शपथ, माझ्यामध्ये व मृत्यूमध्ये केवळ एका पायरीचे अंतर आहे.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 मग दावीद शपथ वाहून म्हणाला, “तुझी कृपादृष्टी माझ्यावर आहे हे तुझा बाप खचित जाणतो; म्हणून तो म्हणतो, हे योनाथानाला कळू नये कळले तर त्यास दुःख होईल; परंतु खरोखर परमेश्वर जिवंत आहे व तुझा जीव जिवंत आहे माझा जीव मरणापासून केवळ पावलांच्या अंतरावर आहे.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 परंतु दावीदाने शपथ घेतली आणि म्हणाला, “तुझ्या पित्याला चांगलेच माहीत आहे की, मी तुझ्या दृष्टीत कृपा पावलो आहे आणि ते स्वतःशी म्हणाले आहेत, ‘योनाथानला हे माहीत होऊ नये नाहीतर तो दुःखी होईल.’ तरीपण जिवंत याहवेहची व तुझ्या जिवाची शपथ की, माझ्यामध्ये व मृत्यूमध्ये फक्त एका पावलाचे अंतर आहे.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ शमुवेल 20:3
18 Iomraidhean Croise  

इत्तयाने राजाला उत्तर केले, “परमेश्वराच्या जीविताची आणि माझ्या स्वामीराजांच्या जीविताची शपथ; प्राण जावो की राहो, जिकडे माझे स्वामीराज जातील तिकडे आपला सेवकही असणार.”


एलीया अलीशाला म्हणाला, “परमेश्वर मला बेथेल येथे पाठवत आहे; तर तू येथेच थांब.” अलीशा म्हणाला, “परमेश्वराच्या व आपल्या जीविताची शपथ, मी आपणाला कधी सोडणार नाही.” मग ते बेथेल येथे गेले.


एलीया त्याला म्हणाला, “अलीशा, परमेश्वर मला यरीहोला पाठवत आहे तर तू येथे थांब.” तो म्हणाला, “परमेश्वराच्या व आपल्या जीविताची शपथ, मी आपणाला सोडणार नाही.” मग ते यरीहोस गेले.


एलीया त्याला म्हणाला, “परमेश्वर मला यार्देनेकडे पाठवत आहे. तू येथेच थांब.” तो म्हणाला, “परमेश्वराच्या व आपल्या जीविताची शपथ, मी आपणाला सोडणार नाही.” मग ते दोघे पुढे चालले.


मृत्यूच्या बंधनांनी मला वेष्टले, मला अधोलोकाच्या यातना झाल्या, मला उपद्रव व क्लेश झाले,


सिद्कीयाने गुप्तपणे यिर्मयाला प्रतिज्ञापूर्वक म्हटले, “आमचा जीव ज्याने उत्पन्न केला त्या परमेश्वराच्या जीविताची शपथ, मी तुला जिवे मारणार नाही व तुझा प्राण घेऊ पाहणार्‍या ह्या लोकांच्या हाती तुला देणार नाही.”


आणि सत्याने, न्यायाने व सरळपणाने परमेश्वराच्या जीविताची शपथ वाहशील, तर राष्ट्रे परमेश्वराच्या ठायी आपणांस धन्य गणतील व त्याचा अभिमान बाळगतील.”


तुला आपल्या जिवाची काळजी वाटत राहील, तुला रात्रंदिवस धास्ती लागून राहील व तुला आपल्या जीविताची काही शाश्वती वाटणार नाही.


तू आपला देव परमेश्वर ह्याचे भय बाळग, त्याची सेवा कर आणि त्याच्याच नावाने शपथ वाहा.


माणसे आपणांपेक्षा मोठ्याची शपथ वाहतात; आणि आपल्या म्हणण्याचे समर्थन करण्यासाठी त्यांच्यामध्ये शपथ सर्व वादाचा शेवट आहे.


तेव्हा हन्ना म्हणाली, “माझे स्वामी! आपल्या जीविताची शपथ, माझे स्वामी, जी स्त्री आपल्याजवळ येथे उभी राहून परमेश्वराची प्रार्थना करत होती तीच स्त्री मी आहे.


दावीद त्या पलिष्ट्याशी सामना करायला गेला हे पाहून शौलाने आपला सेनापती अबनेर ह्याला विचारले, “अबनेरा, हा तरुण पुरुष कोणाचा पुत्र आहे?” अबनेर म्हणाला, “महाराज, आपल्या जीविताची शपथ, मला ठाऊक नाही.”


तो त्याला म्हणाला, “असे कधी न घडो; तू मारला जाणार नाहीस; माझा बाप लहानमोठे कोणतेही काम मला सांगितल्यावाचून करीत नाही; तर एवढीच गोष्ट माझ्यापासून तो का गुप्त ठेवील? असे मुळीच होणे नाही.”


योनाथान दाविदाला म्हणाला, “तुझ्या जिवास वाटेल ते मी तुझ्यासाठी करीन.”


तर आता, अहो माझे स्वामी, परमेश्वराच्या जीविताची शपथ व आपल्या जीविताची शपथ, परमेश्वराने आपणाला रक्तपात करण्यापासून व आपल्या हाताने सूड घेण्यापासून आवरले आहे; म्हणून आता आपले शत्रू व माझ्या स्वामींची हानी चिंतणारे ह्यांचे नाबालासारखे होवो.


दावीद आपल्या मनात म्हणाला, “मी कोणत्या तरी दिवशी शौलाच्या हातून मरणारच तर पलिष्ट्यांच्या देशात पळून जावे ह्यापेक्षा दुसरा चांगला उपाय नाही; अशाने शौल माझ्यासंबंधाने निराश होऊन इस्राएल देशाच्या कोणत्याही प्रांतात माझा ह्यापुढे शोध करणार नाही; ह्याप्रमाणे मी त्याच्या हातून सुटून जाईन.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan