Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ शमुवेल 20:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 तो त्याला म्हणाला, “असे कधी न घडो; तू मारला जाणार नाहीस; माझा बाप लहानमोठे कोणतेही काम मला सांगितल्यावाचून करीत नाही; तर एवढीच गोष्ट माझ्यापासून तो का गुप्त ठेवील? असे मुळीच होणे नाही.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 तेव्हा त्याने त्यास म्हटले, “असे न होवो तू मरणार नाहीस; पाहा माझा बाप लहान मोठे काहीएक कार्य मला सांगितल्या वाचून करीत नाही. तर ही गोष्ट माझा बाप माझ्यापासून कशाला गुप्त ठेवील? असे होणार नाही.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 “कधीच नाही!” योनाथानने उत्तर दिले. “तू मरणार नाहीस! माझा पिता कोणतेही काम; लहान किंवा मोठे, ते मला सांगितल्याशिवाय करीत नाही. तर ते माझ्यापासून ही गोष्ट का लपवून ठेवतील? हे खरे आहे ना!”

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ शमुवेल 20:2
14 Iomraidhean Croise  

ते त्याला म्हणाले, “स्वामींनी असे शब्द का बोलावे? असली गोष्ट करणे आपल्या दासांपासून दूरच असो.


यज्ञपशू व अन्नार्पण ह्यांत तुला संतोष नाही; तू माझे कान उघडले2 आहेस; होम व पापाबद्दल अर्पण ही तू मागत नाहीस.


चोराचा भागीदार आपल्या आत्म्याचा द्वेष्टा होय; तो शपथ ऐकतो तरी काही सांगत नाही.


प्रभू परमेश्वराने माझे कान उघडले आहेत; मी फितूर झालो नाही, मागे फिरलो नाही.


तो येऊन त्या मळेकर्‍यांचा नाश करील व द्राक्षमळा दुसर्‍यांना देईल.” हे ऐकून ते म्हणाले, “असे न होवो.”


मी आतापासून तुम्हांला दास म्हणत नाही; कारण धनी काय करतो ते दासाला ठाऊक नसते; परंतु मी तुम्हांला मित्र म्हटले आहे; कारण जे काही मी आपल्या पित्यापासून ऐकून घेतले ते सर्व मी तुम्हांला कळवले आहे.


कारण जी वचने तू मला दिलीस ती मी त्यांना दिली आहेत; ती त्यांनी स्वीकारली; मी तुझ्यापासून आलो हे त्यांनी खरोखर ओळखले आणि तू मला पाठवलेस असा त्यांनी विश्वास ठेवला.


आमचा देव परमेश्वर ह्याला होमार्पण, अन्नार्पण व यज्ञार्पण करण्यासाठी आमचा देव परमेश्वर ह्याची त्याच्या निवासमंडपासमोर असलेल्या वेदीखेरीज दुसरी वेदी बांधून परमेश्वराविरुद्ध बंड करण्याचे आणि आज परमेश्वराला अनुसरण्याचे सोडून देणे आमच्या हातून कदापि न घडो.”


तेव्हा लोकांनी उत्तर दिले, “परमेश्वराचा त्याग करून अन्य देवांची सेवा करणे आमच्या हातून कदापि न घडो;


तेव्हा लोक शौलाला म्हणाले, “ज्याने इस्राएलाचा एवढा उद्धार केला तो योनाथान मरणार काय? असे कदापि होणे नाही; परमेश्वराच्या जीविताची शपथ, त्याच्या डोक्यावरचा एक केसही भूमीवर पडता कामा नये, कारण त्याने आज परमेश्वराच्या पक्षाने कामगिरी केली आहे.” ह्या प्रकारे लोकांनी योनाथानाचा बचाव केला, तो मेला नाही.


मग दावीद रामातील नायोथ येथून पळून गेला आणि योनाथानाकडे जाऊन म्हणू लागला, “मी काय केले? माझ्याकडून काय अपराध घडला? तुझ्या बापाचा मी असा काय गुन्हा केला आहे की तो माझा जीव घ्यायला पाहत आहे?”


योनाथान दाविदाला म्हणाला, “इस्राएलाचा देव परमेश्वर साक्षी, मी उद्या अथवा परवा ह्या सुमाराला माझ्या बापाचे मनोगत काढल्यावर तुझ्या हिताचे काही असले तर ताबडतोब तुला सांगून पाठवणार नाही काय?


दावीद प्रतिज्ञापूर्वक म्हणाला, “तुझी कृपादृष्टी माझ्यावर आहे हे तुझ्या बापाला पक्के ठाऊक आहे म्हणून तो म्हणतो की ही गोष्ट योनाथानाला कळू नये; कारण त्याला फार वाईट वाटेल; बाकी परमेश्वराच्या जीविताची व तुझ्या जीविताची शपथ, माझ्यामध्ये व मृत्यूमध्ये केवळ एका पायरीचे अंतर आहे.”


शौल येण्यापूर्वी एक दिवस आधी परमेश्वराने शमुवेलास आदेश दिला होता की,


Lean sinn:

Sanasan


Sanasan