Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ शमुवेल 20:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 मग दावीद रामातील नायोथ येथून पळून गेला आणि योनाथानाकडे जाऊन म्हणू लागला, “मी काय केले? माझ्याकडून काय अपराध घडला? तुझ्या बापाचा मी असा काय गुन्हा केला आहे की तो माझा जीव घ्यायला पाहत आहे?”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 दावीद रामा येथल्या नायोथाहून पळून योनाथानाकडे येऊन म्हणाला, “मी काय केले आहे? माझा अपराध काय? तुझ्या वडिलाच्यापुढे माझे काय पाप झाले आहे की तो माझा जीव घ्यायला पाहत आहे?”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 नंतर दावीद रामाहतील नायोथ येथून पळून गेला आणि योनाथानकडे जाऊन त्याने विचारले, “मी काय केले आहे? माझा अपराध काय आहे? तुझ्या पित्याशी मी काय चुकीचे वागलो आहे की, ते मला मारण्याचा प्रयत्न करीत आहेत?”

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ शमुवेल 20:1
19 Iomraidhean Croise  

कारण परकीय1 लोक माझ्यावर उठले आहेत; दांडगे लोक माझा जीव घेऊ पाहतात; त्यांनी देवाकडे लक्ष लावले नाही.


आम्हांला अभिमान बाळगण्याचे कारण, म्हणजे आमच्या सदसद्विवेकबुद्धीची साक्ष ही आहे की, दैहिक ज्ञानाने नव्हे तर देवाच्या कृपेने, आम्ही जगात व विशेषेकरून तुमच्याबरोबर देवाने दिलेल्या पवित्रतेने व सात्त्विकपणाने वागलो.


भक्तिमान लोकांना परीक्षेतून कसे सोडवावे व अनीतिमान लोकांना शिक्षा भोगत न्यायाच्या दिवसासाठी कसे राखून ठेवावे हे प्रभूला कळते.


प्रियजनहो, आपले मन आपल्याला दोषी ठरवत नसेल, तर देवासमोर येण्यास आपल्याला धैर्य आहे.


हा मी तुमच्यापुढे आहे, परमेश्वरासमक्ष व त्याच्या अभिषिक्तासमक्ष माझ्याविरुद्ध काही असेल तर सांगा; मी कोणाचा बैल घेतला आहे काय? कोणाचे गाढव घेतले आहे काय? कोणाला फसवले आहे काय? कोणावर बलात्कार केला आहे काय? डोळेझाक करण्यासाठी कोणाच्या हातून लाच घेतली आहे काय? असे काही असल्यास सांगा म्हणजे मी त्याची भरपाई करीन.”


शौलाने आपला पुत्र योनाथान व आपले सर्व सेवक ह्यांना सांगून ठेवले की दाविदाला मारून टाकावे; पण शौलाचा पुत्र योनाथान ह्याचे दाविदावर फारच मन बसले होते.


दावीद पळून निभावून रामास शमुवेलाकडे गेला व जे काही वर्तन शौलाने त्याच्याशी केले ते अवघे त्याने त्याच्या कानी घातले. मग तो व शमुवेल नायोथ येथे जाऊन राहिले.


तो त्याला म्हणाला, “असे कधी न घडो; तू मारला जाणार नाहीस; माझा बाप लहानमोठे कोणतेही काम मला सांगितल्यावाचून करीत नाही; तर एवढीच गोष्ट माझ्यापासून तो का गुप्त ठेवील? असे मुळीच होणे नाही.”


योनाथान आपला बाप शौल ह्याला म्हणाला, “त्याला मारून का टाकायचे? त्याने काय केले आहे?”


शिवाय माझ्या पित्या, पाहा, माझ्या हातात आपल्या झग्याचा काठ आहे, आपल्या झग्याचा काठ मी कापून घेतला, पण आपणाला जिवे मारले नाही, ह्यावरून निश्‍चये समजा की माझ्या मनात काही दुष्ट हेतू अथवा पातक नाही, आपला अपराध मी केला नाही, पण आपण माझा जीव घ्यायला एकसारखे टपला आहात.


परमेश्वर माझ्यातुमच्यामध्ये न्याय करो आणि परमेश्वरच माझ्याबद्दल आपले शासन करो; पण माझा हात आपल्यावर पडणार नाही.


तो दाविदाला म्हणाला, “तू माझ्याहून नीतिमान आहेस; तू तर माझ्याशी भलाईने वागलास, पण मी तुझ्याशी वाईट वागलो.


दावीद शौलाला म्हणाला, “लोक म्हणतात की, पाहा, दावीद आपला घात करू पाहत आहे, त्यांच्या बोलण्याकडे आपण का कान देता?


तो आणखी म्हणाला, “माझे स्वामी आपल्या दासाच्या पाठीस का लागले आहेत? मी काय केले आहे? माझ्या हातून कोणती कसूर झाली आहे ?


Lean sinn:

Sanasan


Sanasan