Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ शमुवेल 2:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 तो आपल्या भक्तांची पावले सांभाळील. पण दुष्ट अंधारात स्तब्ध पडून राहतील; कारण कोणीही मानव आपल्याच बलाने विजयी होणार नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 तो आपल्या विश्वास ठेवणाऱ्या लोकांचे पाय संभाळील, परंतु दुष्ट अंधारात शांत ठिकाणी ठेवले जातील, कारण सामर्थ्याने कोणी मनुष्य विजय मिळविणार नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 ते आपल्या प्रामाणिक सेवकांची पावले सांभाळतील, परंतु दुष्ट अंधकारमय ठिकाणी शांत केले जातील. “कोणीही बळाने विजय पावत नाही;

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ शमुवेल 2:9
41 Iomraidhean Croise  

ते त्याला प्रकाशातून अंधकारात लोटतील, त्याला जगातून पळवतील.


त्या सर्वांना मातीस मिळव; त्यांची तोंडे काळोखात राहतील असे त्यांना बांधून टाक.


कंगालांस आशा उत्पन्न होते, अधर्म आपले तोंड बंद करतो.


तुझा डेरा शांतिसमाधानाचा आहे अशी तुला प्रतीती येईल; तू आपल्या घरादाराकडे पाहशील तेव्हा तुला काही उणे नाही असे दिसून येईल.


कारण नीतिमानांचा मार्ग परमेश्वराला अवगत असतो, पण दुर्जनांचा मार्ग नष्ट होतो.


त्याने लोकांना सोन्यारुप्यासहित बाहेर नेले; त्याच्या लोकांच्या वंशात कोणी दुर्बल नव्हता.


तो तुझा पाय कदापि ढळू देत नाही; तुझ्या रक्षकाला झोप लागत नाही.


परमेश्वर तुझा रक्षक आहे; परमेश्वर तुझ्या उजव्या हाताला तुला सावली आहे.


परमेश्वर तुझे येणेजाणे येथून पुढे सर्वकाळ सुरक्षित करील.


परमेश्वर आपल्यावर प्रेम करणार्‍या सर्वांचे रक्षण करतो, पण सर्व दुर्जनांचा नाश करतो.


हे परमेश्वरा, मला लज्जित होऊ देऊ नकोस; कारण मी तुझा धावा केला आहे; दुर्जन लज्जित होवोत, ते अधोलोकात निःशब्द राहोत.


कारण परमेश्वराला न्याय प्रिय आहे; तो आपल्या भक्तांना सोडत नाही; त्यांचे रक्षण सर्वकाळ होते; पण दुर्जनांच्या संततीचा उच्छेद होतो.


“माझा पाय घसरला,” असे मी म्हणालो, तेव्हा हे परमेश्वरा, तुझ्या दयेने मला आधार दिला.


अहो परमेश्वरावर प्रीती करणार्‍यांनो, वाइटाचा द्वेष करा; तो आपल्या भक्तांच्या जिवाचे रक्षण करतो. तो त्यांना दुर्जनांच्या हातातून सोडवतो.


मनुष्याचे मन मार्ग योजते, पण परमेश्वर त्याच्या पावलांना मार्ग दाखवतो.


अशासाठी की त्याने नीतिमार्गांचे रक्षण करावे आणि आपल्या भक्तांचा मार्ग सांभाळावा.


कारण परमेश्वर तुझा रक्षणकर्ता होईल, तो तुझा पाय गुंतू देणार नाही.


तो सर्व आयुष्यभर अंधारात अन्न खातो; त्याला बहुत खेद, रोग व संताप ही होतात.


मी परत येऊन भूतलावर आणखी पाहिले तो वेगवानांनाच शर्यतीत यश व वीरांनाच युद्धात विजयश्री मिळते असे नाही; शहाण्यांनाच अन्न व समंजसांनाच धन मिळते आणि ज्ञात्यांवरच अनुग्रह होतो असे नाही; तर सर्व कालवश व दैववश आहेत.


त्याची निगा ठेवणारा मी परमेश्वर; मी त्याला घडोघडी पाणी घालतो; त्याला कोणी उपद्रव करू नये म्हणून मी त्याची रात्रंदिवस राखण करतो.


अगे खास्द्यांच्या कन्ये, गप्प बस, अंधारात जाऊन लप; कारण लोक ह्यापुढे तुला राज्यांची स्वामिनी म्हणणार नाहीत.


आपण स्वस्थ का बसलो आहोत? जमा व्हा, चला, आपण तटबंदीच्या नगरात शिरू व तेथे नष्ट होऊ; कारण आम्ही परमेश्वराविरुद्ध पाप केले आहे म्हणून आम्ही नाश पावावे असे परमेश्वर आमचा देव ह्याने ठरवले आहे व विषाचे पाणी आम्हांला प्यायला दिले आहे.


परमेश्वर म्हणतो, “ज्ञान्याने आपल्या ज्ञानाचा अभिमान बाळगू नये; बलवानाने आपल्या बळाचा व श्रीमंताने आपल्या श्रीमंतीचा अभिमान बाळगू नये;


तो महापुराने निनवेच्या स्थानाचा नायनाट करील व तो आपल्या शत्रूंचा पाठलाग करून त्यांना अंधारात उधळून लावील.


हा संतापाचा दिवस आहे, दुःखाचा व क्लेशाचा दिवस आहे, विध्वंसाचा व उजाडीचा दिवस आहे, अंधकाराचा व उदासीनतेचा दिवस आहे, अभ्रांचा व निबिड अंधकाराचा दिवस आहे.


तेव्हा त्याने मला उत्तर केले, “जरूब्बाबेलास परमेश्वराचे हे वचन आहे : बलाने नव्हे, पराक्रमाने नव्हे, तर माझ्या आत्म्याने कार्यसिद्धी होईल असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो.


‘परमेश्वर तुला आशीर्वाद देवो व तुझे संरक्षण करो;


परंतु राज्याचे पुत्र बाहेरील अंधारात टाकले जातील, तेथे रडणे व दात खाणे चालेल.”


आपल्याला ठाऊक आहे की, प्रत्येक तोंड बंद व्हावे व अवघे जग देवासमोर शिक्षेस पात्र ठरावे, म्हणून नियमशास्त्र जे काही सांगते ते शास्त्राधीन असलेल्या लोकांना सांगते.


तो आपल्या लोकांवर2 प्रीती करतो; त्याचे सर्व पवित्र जन तुझ्या हाती आहेत; ते तुझ्या पायाशी बसले आहेत; त्यांनी तुझी वचने ग्रहण केली आहेत.


ते निर्जल झरे, वादळाने उडवलेले धुके, असे आहेत; त्यांच्यासाठी घनांधकाराची काळोखी सर्वकाल राखलेली आहे.


देवपित्याने पवित्र केलेले आणि येशू ख्रिस्तासाठी राखून ठेवलेले असे पाचारलेले लोक ह्यांना येशू ख्रिस्ताचा दास व याकोबाचा बंधू यहूदा ह्याच्याकडून :


ते लज्जारूपी फेस दाखवणार्‍या समुद्राच्या विक्राळ लाटा, भ्रमण करणारे तारे, असे आहेत; त्यांच्यासाठी निबिड काळोख सर्वकाळ राखून ठेवलेला आहे.


प्रियजनहो, आपल्या समाईक तारणाविषयी तुम्हांला लिहायची मला मोठी ओढ लागली होती, तरी एकदाचाच पवित्र जनांच्या हवाली केलेला जो विश्वास त्याचे समर्थन करण्यासंबंधीचा बोध तुम्हांला लिहून पाठवण्याचे मला अगत्य वाटले.


तर आता, अहो माझे स्वामी, परमेश्वराच्या जीविताची शपथ व आपल्या जीविताची शपथ, परमेश्वराने आपणाला रक्तपात करण्यापासून व आपल्या हाताने सूड घेण्यापासून आवरले आहे; म्हणून आता आपले शत्रू व माझ्या स्वामींची हानी चिंतणारे ह्यांचे नाबालासारखे होवो.


Lean sinn:

Sanasan


Sanasan