Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ शमुवेल 2:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

7 परमेश्वर निर्धन करतो व धनवानही करतो; तो अवनत करतो व उन्नतही करतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 परमेश्वर गरीब करतो व श्रीमंतही करतो. तो नम्र करतो, तसेच तो उंचही करतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

7 गरिबी आणि संपत्ती याहवेह पाठवितात; ते नम्र करतात आणि उंचही तेच करतात.

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ शमुवेल 2:7
17 Iomraidhean Croise  

तेव्हा तो उठून घरात गेल्यावर त्या शिष्याने त्याच्या मस्तकावर तेल ओतून म्हटले, “इस्राएलाचा देव परमेश्वर म्हणतो, मी तुला परमेश्वराच्या लोकांचा म्हणजे इस्राएलाचा राजा व्हावे म्हणून अभिषेक केला आहे;


धन व मान तुझ्यापासूनच प्राप्त होतात व तू सर्वांवर प्रभुत्व करतोस; सामर्थ्य व पराक्रम तुझ्याच हाती आहेत; लोकांना थोर करणे व सर्वांना सामर्थ्य देणे हे तुझ्याच हाती आहे.


हिज्कीयाला बहुत धन व मान मिळाला; त्याने सोने, रुपे, रत्ने, सुगंधी द्रव्ये, ढाली व नाना प्रकारची चांगली पात्रे ह्यांसाठी भांडारे बनवली.


त्याने नगरे वसवली; शेरडेमेंढरे व गाईबैल ह्यांचे विपुल धन संपादले. परमेश्वराने त्याला बहुत धन दिले.


तो म्हणाला, “मी मातेच्या उदरातून नग्न आलो आणि तसाच जेथून नग्न आलो तेथे परत जाणार आहे; परमेश्वराने दिले, आणि परमेश्वराने नेले; धन्य परमेश्वराचे नाम!”


प्रत्येक गर्विष्ठाला पाहून त्याला खाली पाड आणि दुष्टाला जागच्या जागी तुडव.


तो नीचावस्थ जनांस उच्च करतो; शोकमग्न उन्नत होऊन समृद्धी पावतात.


ह्याला कारण तुझा रोष, तुझा क्रोध; कारण तू मला वर उचलून फेकून दिले आहेस.


तर न्याय करणारा देव आहे; तो एकाला खाली पाडतो व दुसर्‍याला वर चढवतो.


पाहा, परमेश्वराच्या हाती प्याला आहे व त्यात द्राक्षारस फेसाळत आहे; त्यात मसाला मिसळला आहे आणि त्यातून तो ओतून देतो; पृथ्वीवरील सर्व दुर्जनांना तो खातरीने गाळासकट प्यावा लागेल.


सधन व निर्धन ह्यांचा एकमेकांशी व्यवहार असतो. त्या सर्वांचा निर्माणकर्ता परमेश्वर आहे.


गर्विष्ठ, उन्मत्त व चढेल अशा सर्वांसाठी सेनाधीश परमेश्वराने दिवस नेमला आहे; त्या दिवशी ते नीच होतील.


कारण पाहा, मी तुला राष्ट्रांमध्ये क्षुद्र केले आहे, मानवांमध्ये तुला तुच्छ केले आहे.


वनांतील सर्व वृक्षांना कळेल की मी परमेश्वराने उंच वृक्षास नीच केले आहे व नीच वृक्षास उंच केले आहे, आणि हिरव्या झाडास सुकवले आहे व शुष्क झाडास फलद्रूप केले आहे; मी परमेश्वर हे बोललो आहे व मी हे केलेही आहे.”


प्रभूसमोर नम्र व्हा, म्हणजे तो तुम्हांला उच्च करील.


Lean sinn:

Sanasan


Sanasan