Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ शमुवेल 2:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 शूर वीरांची धनुष्ये भंगून गेली आहेत; जे लटपटत होते त्यांच्या कंबरेस बलरूप कमरबंद चढवला आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 पराक्रमी पुरूषांची धनुष्ये मोडलेली आहेत, परंतू जे अडखळले त्यांनी बलरूप कमरबंद वेष्टीला आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 “योद्ध्यांचे धनुष्य तुटलेले आहेत, परंतु जे अडखळले, ते शक्तीने सज्ज झाले आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ शमुवेल 2:4
16 Iomraidhean Croise  

लढाईसाठी तू मला सामर्थ्याचा कमरबंद बांधला; माझ्यावर उठलेल्यांना तू माझ्याखाली चीत केलेस.


त्यांची तलवार त्यांच्याच उरात शिरेल, आणि त्यांच्या धनुष्यांचा चुराडा होईल.


दुर्जनांचे बाहू मोडतील, पण नीतिमानांचा आधार परमेश्वर आहे.


“शांत व्हा आणि लक्षात ठेवा की मीच देव आहे, राष्ट्रांमध्ये माझा महिमा वाढेल, पृथ्वीभर माझा महिमा वाढेल.”


तो दिगंतापर्यंत लढाया बंद करतो; तो धनुष्य मोडतो, भाला तोडून टाकतो; रथ अग्नीत जाळून टाकतो.


तेथे धनुष्याचे बाण, ढाल, तरवार व युद्धसामग्री त्याने मोडून टाकली. (सेला)


बंदिवानांच्या पायांशी दबून राहणे व वध झालेल्यांच्या खाली पडून राहणे ह्यांशिवाय त्यांना दुसरी गती नाही. इतके झाले तरी त्याचा क्रोध शमला नाही, त्याचा हात अजून उगारलेला आहे.


तो भागलेल्यांना जोर देतो, निर्बलांना विपुल बल देतो.


कारण तुमच्याबरोबर लढणार्‍या खास्द्यांच्या अवघ्या सैन्याचा जरी तुम्ही पराभव केला व त्यांच्यातले अगदी घायाळ झालेले मात्र काही उरले तरी ते सर्व आपापल्या तंबूत उठून उभे राहतील व हे नगर अग्नीने जाळतील.”


कारण त्याच्यावर म्हणजे बाबेलवर विध्वंस करणारे आले आहेत, त्याचे वीर कैद झाले आहेत; त्यांची धनुष्ये भंग पावली आहेत; कारण परमेश्वर सूड घेणारा देव आहे, तो खातरीने प्रतिफळ देईल.


परंतु त्याने मला म्हटले आहे, “माझी कृपा तुला पुरेशी आहे; कारण अशक्तपणातच माझी शक्ती पूर्णतेस येते.” म्हणून ख्रिस्ताच्या सामर्थ्याची छाया माझ्यावर राहावी म्हणून मी विशेषेकरून आपल्या अशक्तपणाची प्रौढी फार आनंदाने मिरवीन.


तर मग आपली कंबर सत्याने कसा; नीतिमत्त्वाचे उरस्त्राण धारण करा;


मला जो सामर्थ्य देतो त्या ख्रिस्ताकडून मी सर्वकाही करण्यास शक्तिमान आहे.


आणखी काय सांगू? गिदोन, बाराक, शमशोन, इफ्ताह, दावीद, शमुवेल व संदेष्टे ह्यांचे वर्णन करू लागलो तर वेळ पुरणार नाही.


अग्नीची शक्ती नाहीशी केली; ते तलवारीच्या धारेपासून बचावले, ते दुर्बळांचे सबळ झाले, ते लढाईत पराक्रमी झाले, त्यांनी परक्यांची सैन्ये पळवली.


Lean sinn:

Sanasan


Sanasan