Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ शमुवेल 2:35 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

35 आणि मी आपल्यासाठी एक विश्वासू याजक निर्माण करीन; तो माझ्या अंतःकरणात व माझ्या मनात जे आहे त्याप्रमाणे करील; मी त्याचे घराणे कायमचे स्थापीन आणि तो माझ्या अभिषिक्तासमोर निरंतर चालेल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

35 मी आपणासाठी विश्वासू याजक उभा करीन; तो माझ्या मनात व माझ्या मनांत जे आहे त्याप्रमाणे करील. मी त्याचे घराणे निश्चित स्थापीन; आणि तो माझ्या अभिषिक्त राजासमोर निरंतर चालेल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

35 मी माझ्यासाठी एक विश्वासू याजक पुढे आणेन, जो माझ्या अंतःकरणात आणि माझ्या मनात जे आहे त्यानुसार करेल. मी त्याचे याजकीय घराणे स्थिर स्थापित करेन आणि ते निरंतर माझ्या अभिषिक्तासमोर सेवा करतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ शमुवेल 2:35
28 Iomraidhean Croise  

इस्राएल लोकांवर मी शास्ते नेमले होते त्यांच्या काळापासून जसे दुर्जन त्यांना त्रस्त करीत होते तसे ते ह्यापुढे करणार नाहीत; तुला मी शत्रूंपासून विसावा दिला आहे. परमेश्वर तुला म्हणत आहे की मी तुझे घराणे कायमचे स्थापीन.


कारण, हे सेनाधीश परमेश्वरा, हे इस्राएलाच्या देवा, तू माझे कान उघडून सांगितलेस की, मी तुझे घराणे स्थापीन; म्हणून ही विनंती तुला करायचे धैर्य तुझ्या सेवकाला झाले.


आणि सादोक याजक व नाथान संदेष्टा ह्यांनी त्याला गीहोन येथे राज्याभिषेक केला व ते तेथून एवढा जयघोष करीत वर गेले की नगर अगदी दणाणून गेले; तुमच्या कानी ध्वनी पडला तो हाच.


पण सादोक याजक, यहोयादाचा पुत्र बनाया. नाथान संदेष्टा, शिमी, रेई व दाविदाचे शूर वीर हे अदोनीयाच्या पक्षाला मिळाले नाहीत.


तू माझा सेवक दावीद ह्याच्याप्रमाणे माझ्या सर्व आज्ञा मानशील, माझ्या मार्गाने चालशील, माझ्या दृष्टीने जे योग्य तेच करशील आणि माझे नियम व आज्ञा पाळत जाशील तर मी तुझ्याबरोबर राहीन आणि जसे मी दाविदाचे घराणे कायम स्थापले तसे तुझेही कायम स्थापीन आणि इस्राएल लोकांना तुझ्या हवाली करीन.


राजाने त्याच्या जागी यहोयादाचा पुत्र बनाया ह्याला मुख्य सेनापती नेमले आणि अब्याथाराच्या जागी सादोकाला याजक नेमले.


त्यांनी त्या दिवशी परमेश्वरासमोर मोठ्या आनंदाने खाणेपिणे केले. नंतर त्यांनी दावीद राजाचा पुत्र शलमोन ह्याला दुसर्‍यांदा राजा नेमून परमेश्वरातर्फे अधिपती होण्यासाठी त्याला व याजकाच्या कामासाठी सादोकाला अभिषेक केला.


तो आपल्या राजाला मोठे विजय देतो; आपल्या अभिषिक्ताला, दाविदाला व त्याच्या संततीला, सर्वकाळ वात्सल्य दाखवतो.


परमेश्वराविरुद्ध व त्याच्या अभिषिक्ताविरुद्ध पृथ्वीवरील राजे उठले आहेत, सत्ताधीश एकत्र जमून मसलत करीत आहेत की,


त्या सुइणी देवाचे भय बाळगणार्‍या होत्या म्हणून त्याने त्यांची घराणी स्थापित केली.


त्यांच्यावर मी एक मेंढपाळ नेमून त्यांना चारीन; तो कोण तर माझा सेवक दावीद; तो त्यांना चारील; तो त्यांचा मेंढपाळ होईल.


त्याच्यासाठी व त्याच्यामागून त्याच्या संततीसाठी हा निरंतरचा याजकपदाचा करार होय; कारण आपल्या देवाविषयी तो ईर्ष्यावान होऊन त्याने इस्राएल लोकांसाठी प्रायश्‍चित्त केले.”


म्हणून त्याला सर्व प्रकारे ‘आपल्या बंधूंसारखे’ होणे अगत्याचे होते, ह्यासाठी की, लोकांच्या पापांबद्दल प्रायश्‍चित्त करण्याकरता त्याने स्वत: देवासंबंधीच्या गोष्टींविषयी दयाळू व विश्वसनीय प्रमुख याजक व्हावे.


ते टेकडीजवळ आले, तेव्हा पाहा, संदेष्ट्यांचा एक समुदाय त्याला भेटला; आणि देवाचा आत्मा त्याच्यावर सामर्थ्याने आला व तो त्यांच्याबरोबर भाषण करू लागला.


शमुवेलापासून निघून जाण्यासाठी त्याची पाठ वळली तोच देवाने त्याचे मन बदलून टाकले व ही सर्व चिन्हे त्याला त्या दिवशी प्राप्त झाली.


हा मी तुमच्यापुढे आहे, परमेश्वरासमक्ष व त्याच्या अभिषिक्तासमक्ष माझ्याविरुद्ध काही असेल तर सांगा; मी कोणाचा बैल घेतला आहे काय? कोणाचे गाढव घेतले आहे काय? कोणाला फसवले आहे काय? कोणावर बलात्कार केला आहे काय? डोळेझाक करण्यासाठी कोणाच्या हातून लाच घेतली आहे काय? असे काही असल्यास सांगा म्हणजे मी त्याची भरपाई करीन.”


मग शमुवेलाने तेलाचे शिंग हाती घेऊन त्याच्या भावांमध्ये त्याला अभिषेक केला; आणि त्या दिवसापासून पुढे परमेश्वराचा आत्मा दाविदाच्या ठायी जोराने संचरू लागला. नंतर शमुवेल उठून रामास गेला.


तुझ्या घराण्यातला जो कोणी वाचून राहील तो चवलीपावलीसाठी व कोरभर भाकरीसाठी त्याच्याकडे जाऊन त्याला दंडवत घालील व म्हणेल की याजकपणाचे कोणतेतरी काम मला द्या म्हणजे मला घासभर अन्न मिळेल.”


आपल्या ह्या दासीचा अपराध क्षमा करा; कारण परमेश्वर खरोखर माझ्या स्वामींचे घराणे कायमचे वसवील; कारण माझे स्वामी परमेश्वराच्या लढाया लढत आहेत; आपल्या सर्व आयुष्यभर आपल्या ठायी कसलेही अनिष्ट आढळणार नाही.


शमुवेल बाळ एलीसमक्ष परमेश्वराची सेवा करत असे. त्या काळी परमेश्वराचे वचन दुर्लभ झाले होते; त्याचे दृष्टान्त वारंवार होत नसत.


मग शमुवेलाने एक दूधपिते कोकरू घेऊन व त्याचा परमेश्वराला नि:शेष होम करून इस्राएलासाठी परमेश्वराची आराधना केली व ती परमेश्वराने ऐकली.


पण त्याचे पुत्र त्याच्या मार्गाने चालले नाहीत; त्यांना पैशाचा लोभ लागून ते लाच खात व न्यायनिवाडा विपरीत करीत.


तेव्हा त्या म्हणाल्या, “होय, आहे; पाहा, तो पुढेच आहे; त्वरा करा, कारण तो आजच गावी आला आहे, आज लोक उच्च स्थानी होमहवन करणार आहेत.


तर तुम्ही नगरात जाताच तो त्या उच्च स्थानी भोजनास जाण्याच्या अगोदर तुम्हांला भेटेल; तो यज्ञाला आशीर्वाद देतो म्हणून तो तेथे येण्यापूर्वी लोक जेवत नसतात; नंतर आमंत्रित लोक भोजन करतात. तर आता तुम्ही वर चढून जा, आताच त्याची भेट होईल.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan