Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ शमुवेल 2:30 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

30 ह्यास्तव इस्राएलाचा देव परमेश्वर म्हणतो, तुझे घराणे व तुझ्या बापाचे घराणे माझ्यासमोर निरंतर चालू राहील असे मी म्हटले होते खरे, पण आता परमेश्वर म्हणतो, असे माझ्या हातून न घडो; कारण जे माझा आदर करतात त्यांचा मी आदर करीन आणि जे मला तुच्छ मानतात त्यांचा अवमान होईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

30 यामुळे इस्राएलांचा परमेश्वर म्हणतो, की तुझे घराणे व तुझ्या बापाचे घराणे माझ्यासमोर निरंतर चालेल असे मी म्हटले खरे; परंतु आता परमेश्वर असे म्हणतो, ही गोष्ट माझ्यापासून दूर होवो कारण जे माझा आदर करतात त्यांचा आदर मी करीन आणि जे मला तिरस्कार करतात त्यांचा अवमान होईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

30 “म्हणून याहवेह इस्राएलचे परमेश्वर, असे जाहीर करतात: ‘मी वचन दिले होते की, तुझ्या कुटुंबातील सदस्य सर्वकाळ माझ्यासमोर सेवा करतील.’ परंतु आता याहवेह असे जाहीर करतात: ‘ते माझ्यापासून दूर असो! जे माझा सन्मान करतात त्यांचा मी सन्मान करेन, परंतु जे माझा अवमान करतात त्यांचा अवमान होईल.’

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ शमुवेल 2:30
39 Iomraidhean Croise  

ह्यास्तव परमेश्वर शलमोनाला म्हणाला, “माझा करार व मी तुला लावून दिलेले नियम न पाळता हे असे आचरण तू केलेस त्या अर्थी मी तुझे राज्य तुझ्यापासून तोडून घेऊन तुझ्या एका सेवकाला देईन.


एलीच्या वंशाविषयी शिलो येथे परमेश्वर जे वचन बोलला होता ते पूर्ण करावे म्हणून शलमोनाने अब्याथारास परमेश्वराच्या याजकपदावरून काढून टाकले.


तू आपल्या सेवकाचा जो मान केला आहेस त्याबद्दल दावीद आणखी काय बोलणार? कारण तू आपल्या सेवकाला ओळखतोस.


तो आसाच्या भेटीस जाऊन त्याला म्हणाला, “हे आसा, अहो यहूदी व बन्यामिनी लोकहो, मी म्हणतो ते ऐका; तुम्ही परमेश्वराच्याबरोबर राहाल तोवर तो तुमच्याबरोबर राहील; तुम्ही त्याला शरण जाल तर तो तुम्हांला पावेल. पण तुम्ही त्याला सोडाल तर तो तुम्हांला सोडील.


त्यांनी उज्जीया राजाला प्रतिकार करून म्हटले, “हे उज्जीया, परमेश्वराप्रीत्यर्थ धूप जाळणे हे तुझे काम नव्हे; अहरोनाचे वंशज जे याजक, ज्यांना धूप जाळण्यासाठी पवित्र केले आहे, त्यांचेच हे काम आहे. तू पवित्रस्थानातून निघून जा, कारण तू मर्यादेचे उल्लंघन केले आहेस; अशाने परमेश्वर देवाकडून तुझा गौरव होणार नाही.”


परमेश्वराने माझ्या नीतिमत्त्वाप्रमाणे मला फळ दिले; माझ्या हातांच्या निर्मलतेप्रमाणे त्याने मला प्रतिफळ दिले.


शुद्धांशी तू शुद्ध भावनेने वागतोस, कुटिलांशी तू कुटिलतेने वागतोस,


जो आभाररूपी यज्ञ करतो तो माझा गौरव करतो; आणि जो सरळ मार्गाने चालतो त्याला मी देवाने सिद्ध केलेले तारण प्राप्त करून देईन.”


जागा झालेल्या मनुष्याला जसे स्वप्न निरर्थक वाटते, तसे हे प्रभू, तू सज्ज होताच त्यांचे ते स्वरूप तुच्छ मानशील.


माझ्यावर त्याचे प्रेम आहे, म्हणून मी त्याला मुक्त करीन; त्याला माझ्या नावाची जाणीव आहे म्हणून मी त्याला उच्च स्थळी सुरक्षित ठेवीन.


तो माझा धावा करील तेव्हा मी त्याला उत्तर देईन; संकटसमयी मी त्याच्याजवळ राहीन; मी त्याला मुक्त करीन, मी त्याला गौरव देईन;


आणि अहरोन अथवा त्याचे मुलगे दर्शनमंडपात2 प्रवेश करतील व पवित्रस्थानात सेवा करण्यासाठी वेदीजवळ जातील, तेव्हा त्यांनी हे चोळणे घातलेले असावेत. नाहीतर त्यांना दोष लागून ते मरतील; अहरोनाला व त्याच्या पश्‍चात त्याच्या वंशाला हा नियम निरंतरचा आहे.


आणि अहरोनाला व त्याच्या मुलांना कमरबंद बांध. त्यांच्या डोक्यांना फेटे बांध; ह्या प्रकारे ह्या निरंतरच्या विधीने त्यांना याजकपद प्राप्त व्हावे. ह्या प्रकारे अहरोन व त्याचे मुलगे ह्यांच्यावर संस्कार करावा.


मनुष्याची प्रशंसा त्याच्या सुज्ञतेप्रमाणे होते, पण ज्याचे हृदय कुटिल असते त्याचा तिरस्कार होतो.


त्याला उच्च पद दे म्हणजे ते तुझी उन्नती करील. त्याला कवटाळून राहशील तर ते तुझा गौरव करील;


माझ्यावर जे प्रीती करतात त्यांच्यावर मी प्रीती करते; जे मला परिश्रमाने शोधतात त्यांना मी सापडते.


प्रभू म्हणाला आहे की, “हे लोक माझ्यासमीप येऊन आपल्या तोंडच्या शब्दांनी माझा सन्मान करतात, तरी माझ्यापासून आपले अंतःकरण दूर राखतात, आणि हे माझे भय बाळगतात ते केवळ मनुष्यांनी पढवलेल्या आज्ञेप्रमाणे बाळगतात.


म्हणून परमेश्वर म्हणतो, पाहा, मी नेहेलमी शमाया व त्याचे वंशज ह्यांना शिक्षा करीन; ह्या लोकांत राहून त्याचे नाव घ्यायला त्याचे कोणी उरणार नाही; मी आपल्या लोकांचे अनिष्ट करणार ते तो पाहणार नाही. कारण तो परमेश्वराविरुद्ध फितुरीचे शब्द बोलला आहे, असे परमेश्वर म्हणतो.”’


कारण पाहा, मी तुला राष्ट्रांमध्ये क्षुद्र केले आहे, मानवांमध्ये तुला तुच्छ केले आहे.


प्रभू परमेश्वर म्हणतो, पाहा, मी मेंढपाळांच्या विरुद्ध आहे, त्यांच्यापासून मी आपल्या मेंढरांचा हिशेब मागेन; माझा कळप चारण्याची त्यांना मी बंदी करीन; त्यांना स्वतः चरायला मिळणार नाही; मी आपली मेंढरे त्यांच्या तोंडातून सोडवीन म्हणजे ह्यापुढे ती त्यांना भक्षण करण्यास सापडणार नाहीत.


हे दिवस संपल्यावर मी नबुखद्नेस्सराने आपले डोळे आकाशाकडे लावले; माझी बुद्धी मला परत आली; मी परात्पर देवाचा धन्यवाद केला, त्या सदा जिवंत असणार्‍या देवाचे स्तवन केले व त्याचा महिमा गाइला; कारण त्याचे प्रभुत्व सर्वकाळचे आहे, आणि त्याचे राज्य पिढ्यानपिढ्या राहणारे आहे.


“मुलगा आपल्या बापाचा व चाकर आपल्या धन्याचा सन्मान करतो; मी बाप आहे तर माझा सन्मान कोठे आहे? मी धनी आहे तर माझे भय कोठे आहे? असे त्याच्या नावाचा अपमान करणार्‍या तुम्हा याजकांना परमेश्वर विचारतो. तरी तुम्ही म्हणता, ‘आम्ही तुझ्या नामाचा कोणत्या प्रकारे अपमान केला?’


पाहा, मी तुमच्या शेतातले बी निर्जीव करीन,1 तुमच्या यज्ञपशूची विष्ठा तुमच्या मुखांना फाशीन; लोक विष्ठेबरोबर तुम्हांलाही फेकून देतील.


तर तुमच्या नाकातून निघेपर्यंत आणि तुम्हांला शिसारी येईपर्यंत तुम्ही ते महिनाभर खात राहाल; कारण तुमच्यामध्ये वसत असलेल्या परमेश्वराचा तुम्ही त्याग करून त्याच्यासमोर असे रडगाणे गाइले की, आम्ही मिसर देशातून निघालो तरी कशाला?”


ज्या देशात तुम्ही वस्ती कराल त्यामध्ये मी राहीन म्हणून तो देश अशुद्ध करू नका, कारण मी परमेश्वर इस्राएल लोकांमध्ये वसत आहे.”


जर कोणी माझी सेवा करतो तर त्याने मला अनुसरावे म्हणजे जेथे मी आहे तेथे माझा सेवकही असेल; जर कोणी माझी सेवा करतो तर पिता त्याचा मान करील.


ह्यासाठी की, जसा पित्याचा सन्मान करतात तसा पुत्राचाही सन्मान सर्वांनी करावा. जो पुत्राचा सन्मान करत नाही तो, ज्याने मला पाठवले, त्या पित्याचा सन्मान करत नाही.


जे तुम्ही एकमेकांकडून प्रशंसा करून घेता आणि जो एकच देव त्याच्याकडून प्रशंसा करून घेण्याची खटपट करत नाही, त्या तुम्हांला विश्वास ठेवता येणे कसे शक्य आहे?


येशूने उत्तर दिले, “मला भूत लागले नाही; तर मी आपल्या पित्याचा सन्मान करतो आणि तुम्ही माझा अपमान करता.


म्हणून त्या समयापूर्वी म्हणजे प्रभूच्या येण्यापूर्वी तुम्ही न्यायनिवाडा करूच नका; तो अंधारातील गुप्त गोष्टी प्रकाशात आणील आणि अंतःकरणातील संकल्पही उघड करील; आणि मग प्रत्येकाच्या योग्यतेप्रमाणे देव त्याची वाहवा करील.


ह्यासाठी की, नाशवंत सोन्याची परीक्षा अग्नीने करतात त्या सोन्यापेक्षा मूल्यवान अशी जी तुमच्या विश्वासाची परीक्षा ती येशू ख्रिस्ताच्या प्रकट होण्याच्या वेळेस प्रशंसा, गौरव व मान ह्यांस कारणीभूत व्हावी.


मग झाडे अंजिराला म्हणाली, ‘चल, तू आमच्यावर राज्य कर.’


Lean sinn:

Sanasan


Sanasan