Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ शमुवेल 2:29 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

29 माझ्या मंदिरात जी होमार्पणे व अन्नार्पणे अर्पण करण्याची मी आज्ञा दिली आहे त्यांना तुम्ही का लाथ मारता? आणि माझे इस्राएल लोक ह्यांनी केलेल्या अर्पणांपैकी सर्वोत्तम अर्पणे खाऊन तुम्ही लठ्ठ व्हावे म्हणून तू आपल्या पुत्रांचा माझ्याहून अधिक आदर का करीत आहेस?

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

29 तर तुम्ही जो माझा यज्ञ व जे माझे अर्पण मी जिथे राहतो तिथे आज्ञापिले आहे, त्यांना तुम्ही का लाथ मारता? आणि माझे लोक इस्राएलांच्या सर्व अर्पणातील जी उत्तम त्यांकडून आपणाला पुष्ट करण्यास माझ्यांपेक्षा आपल्या मुलांचा तू का अधिक आदर करतोस?

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

29 माझे जे यज्ञ व अर्पणे मी माझ्या मंदिरासाठी नेमून दिली आहेत त्याचा तुम्ही अवमान का करता? माझ्या इस्राएली लोकांनी केलेल्या अर्पणातून सर्वोत्तम भाग खाऊन तू स्वतःला पुष्ट करून माझ्यापेक्षा तुझ्या पुत्रांचा जास्त सन्मान का करतो?’

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ शमुवेल 2:29
22 Iomraidhean Croise  

असे असूनही यहोआश राजाच्या कारकिर्दीच्या तेविसाव्या वर्षापर्यंत मंदिराच्या मोडतोडीची दुरुस्ती झाली नाही.


हे परमेश्वरा, तुझे वसतिस्थान, तुझ्या गौरवाचे निवासस्थान ही मला प्रिय आहेत.


लबाडीस कान देणार्‍या माझ्या लोकांना तुम्ही लबाडी सांगून, जे मरू नयेत त्यांना मारून व जे जगू नयेत त्यांना वाचवून मूठभर जवासाठी व भाकरीच्या तुकड्यासाठी तुम्ही माझ्या लोकांसमोर माझा अवमान केला आहे.


प्रभू परमेश्वर म्हणतो, पाहा, मी मेंढपाळांच्या विरुद्ध आहे, त्यांच्यापासून मी आपल्या मेंढरांचा हिशेब मागेन; माझा कळप चारण्याची त्यांना मी बंदी करीन; त्यांना स्वतः चरायला मिळणार नाही; मी आपली मेंढरे त्यांच्या तोंडातून सोडवीन म्हणजे ह्यापुढे ती त्यांना भक्षण करण्यास सापडणार नाहीत.


“मानवपुत्रा, इस्राएलाच्या मेंढपाळांविरुद्ध तू संदेश देऊन त्यांना सांग, प्रभू परमेश्वर असे म्हणतो : जे इस्राएलाचे मेंढपाळ आपणच चरतात त्यांना धिक्कार असो! मेंढपाळांनी कळपाला चारावे की नाही?


ते माझ्या लोकांच्या पापावर पोसत आहेत, त्यांच्या अधर्माकडे त्यांचे चित्त लागले आहे.


न्यायनिवाडा करताना अन्याय करू नकोस, गरिबाच्या गरिबीकडे पाहू नकोस आणि समर्थापुढे नमू नकोस; तर आपल्या शेजार्‍याचा न्याय निःस्पृहपणे कर.


जे संदेष्टे माझ्या लोकांना बहकवतात, काही चावण्यास मिळाले तर ‘कल्याण असो,’ असे जे म्हणतात व ज्याच्यापासून त्यांना चावण्यास मिळत नाही त्याच्याबरोबर लढण्याची जे तयारी करतात, त्यांच्याविषयी परमेश्वर असे म्हणतो.


जो माझ्यापेक्षा आपल्या बापावर किंवा आईवर अधिक प्रेम करतो तो मला योग्य नाही; जो माझ्यापेक्षा मुलावर किंवा मुलीवर अधिक प्रेम करतो तो मला योग्य नाही;


त्यांनी आपल्या शिष्यांना हेरोद्यांसह त्याच्याकडे पाठवून म्हटले, “गुरूजी आम्हांला ठाऊक आहे की, आपण खरे आहात, परमेश्वराचा मार्ग खरेपणाने शिकवता व कोणाची भीड धरत नाही; कारण आपण तोंड पाहून बोलत नाही.


“जर कोणी माझ्याकडे येईल पण आपला बाप, आई, बायको, मुले, भाऊ व बहिणी ह्यांचा आणि आपल्या जिवाचाही द्वेष करणार नाही तर त्याला माझा शिष्य होता येणार नाही.


कारण तसले लोक आपल्या प्रभू ख्रिस्ताची सेवा करत नाहीत, तर स्वत:च्या पोटाची सेवा करतात; आणि गोड व लाघवी भाषणाने भोळ्याभाबड्यांची अंत:करणे भुलवतात.


तर मग आतापासून आम्ही कोणाला देहदृष्ट्या ओळखत नाही; आणि जरी आम्ही ख्रिस्ताला देहदृष्ट्या ओळखले होते तरी आता ह्यापुढे त्याला तसे ओळखत नाही.


पण यशुरून (इस्राएल) पुष्ट होऊन लाथा झाडू लागला; तू धष्टपुष्ट झालास, तू लठ्ठ झालास, तू तुकतुकीत झालास; तेव्हा त्याने आपल्या निर्माणकर्त्या देवाचा त्याग केला, आणि आपल्या तारणदुर्गाला तुच्छ लेखले.


तो आपल्या मातापित्याविषयी म्हणाला, मी त्यांना ओळखत नाही; त्याने आपल्या भाऊबंदांना मानले नाही, व स्वत:च्या मुलांची ओळख ठेवली नाही. कारण त्यांनी तुझा शब्द पाळला आहे आणि ते तुझा करार राखतात.


वरून येणारे ज्ञान हे मुळात शुद्ध असते; शिवाय ते शांतिप्रिय, सौम्य, समजूत होण्याजोगे, दया व सत्फळे ह्यांनी पूर्ण, अपक्षपाती, निर्दंभ असे आहे.


मग इस्राएल लोकांची सर्व मंडळी शिलो येथे एकत्र झाली व तेथे त्यांनी दर्शनमंडप उभा केला; देश त्यांच्या हाती आला होता.


मी त्याला सांगितले आहे की त्याला ठाऊक असलेल्या अधर्मास्तव मी त्याच्या घराण्याचे कायमचे पारिपत्य करीन, कारण त्याचे पुत्र स्वतःला शापग्रस्त करीत असता त्याने त्यांना आवरले नाही.


Lean sinn:

Sanasan


Sanasan