Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ शमुवेल 2:27 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

27 मग देवाचा एक मनुष्य एलीकडे जाऊन म्हणाला, “परमेश्वर असे म्हणतो, तुझ्या मूळ पुरुषाचे कुटुंब मिसरात फारोच्या घरी दास्य करीत होते तेव्हा त्याला मी प्रकट झालो होतो की नाही?

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

27 आता देवाचा एक पुरुष एलीकडे येऊन त्यास म्हणाला, “परमेश्वर असे म्हणतो, तुझ्या पूर्वजांचे घराणे मिसरात फारोच्या दास्यात राहत असता मी त्यास प्रगट झालो नाही काय?

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

27 परमेश्वराचा एक मनुष्य एलीकडे आला आणि त्याला म्हणाला, “याहवेह असे म्हणतात: ‘तुझे पूर्वज इजिप्तमध्ये फारोहच्या दास्यात असताना मी त्यांना स्पष्टपणे प्रगट झालो नाही काय?

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ शमुवेल 2:27
14 Iomraidhean Croise  

नंतर पाहा, परमेश्वराच्या आज्ञेवरून देवाचा माणूस यहूदातून बेथेल येथे आला; त्या वेळी यराबाम हवन करीत वेदीजवळ उभा होता.


एलीच्या वंशाविषयी शिलो येथे परमेश्वर जे वचन बोलला होता ते पूर्ण करावे म्हणून शलमोनाने अब्याथारास परमेश्वराच्या याजकपदावरून काढून टाकले.


मग परमेश्वराने मिसर देशात मोशे व अहरोन ह्यांना सांगितले की,


परमेश्वर मोशे व अहरोन ह्यांना म्हणाला, “वल्हांडण सणाचा विधी असा : परदेशीयांपैकी कोणी त्यातले काही खाऊ नये;


मग परमेश्वर अहरोनाला म्हणाला, “मोशेला भेटण्यास तू रानात जा.” तो गेला आणि देवाच्या डोंगरावर त्याला भेटून त्याने त्याचे चुंबन घेतले.


देवाचा भक्त मोशे ह्याने आपल्या मरणापूर्वी इस्राएल लोकांना आशीर्वाद दिला तो असा :


हे देवभक्ता, तू ह्यांपासून पळ, आणि नीतिमत्त्व, सुभक्ती, विश्वास, प्रीती, धीर व सौम्यता ह्यांच्या पाठीस लाग.


कारण संदेश मनुष्यांच्या इच्छेने कधी आलेला नाही; तर पवित्र आत्म्याने प्रेरित झालेल्या पवित्र मनुष्यांनी देवापासून आलेला संदेश सांगितला आहे.


त्या स्त्रीने जाऊन आपल्या नवर्‍याला सांगितले, “एक देवमाणूस माझ्याकडे आला, त्याचे स्वरूप देवदूताप्रमाणे अति गौरवशाली होते; पण तो कोठून आला हे मी त्याला विचारले नाही व त्यानेही मला आपले नाव सांगितले नाही.


तेव्हा परमेश्वराने इस्राएल लोकांकडे एक संदेष्टा पाठवला; तो त्यांना म्हणाला, “इस्राएलाचा देव परमेश्वर म्हणतो की, मी तुम्हांला मिसर देशातून काढून आणले, दास्यगृहातून तुम्हांला बाहेर आणले;


एलीच्या घराण्याविषयी जे काही मी बोललो आहे ते सर्व अथपासून इतिपर्यंत त्या दिवशी मी पुरे करीन.


त्याने एफ्राइमाचा डोंगरी प्रदेश व शलीशा प्रांत पायांखाली घातला तरी ती त्याला सापडली नाहीत; मग ते शालीम प्रांतात गेले तेथेही ती नव्हती; नंतर ते बन्यामिन्यांच्या प्रांतात गेले तेथेही त्यांचा पत्ता लागला नाही.


तेव्हा तो त्याला म्हणाला, “पाहा, ह्या नगरात देवाचा एक माणूस राहत आहे, त्याची लोकांत मोठी मानमान्यता आहे; तो जे काही सांगतो ते सर्व घडून येते; चल, आपण तिकडे जाऊ; आपण कोणत्या मार्गाने जावे हे तो आपल्याला कदाचित सांगेल.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan