Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ शमुवेल 2:24 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

24 माझ्या मुलांनो, असे करू नका; माझ्या कानावर जो बोभाटा येत आहे तो काही ठीक नाही; तुम्ही परमेश्वराच्या प्रजेकडून पातक करवत आहात.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

24 माझ्या मुलांनो असे करू, नका कारण जी बातमी मी ऐकतो ती चांगली नाही; तुम्ही परमेश्वराच्या लोकांस आज्ञाभंग करायला लावता.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

24 नाही, माझ्या मुलांनो; याहवेहच्या लोकांमध्ये पसरत असलेला अहवाल जो मी ऐकत आहे तो चांगला नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ शमुवेल 2:24
16 Iomraidhean Croise  

परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते त्याने केले; त्याने आपल्या बापाचे अनुकरण केले; त्याच्या बापाने इस्राएलांकडून जे पाप करवले त्याच पापाच्या मार्गाने तोही चालला.


ह्याचे कारण हेच की, यराबामाने स्वतः पापकर्मे करून इस्राएलासही ती करायला लावली आणि त्याने इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याला संताप आणला.


पण येहूने इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याच्या नियमशास्त्राप्रमाणे चालण्याची पूर्ण मनाने खबरदारी घेतली नाही. यराबामाने इस्राएलाकडून ज्या कर्मांच्या योगे पाप करवले त्यांचा नाद त्याने सोडला नाही.


तेव्हा मोशे अहरोनाला म्हणाला, “तू ह्या लोकांवर एवढे पातक आणले असे ह्यांनी तुझे काय केले होते?”


पण तुम्ही मार्ग सोडून गेला आहात, नियमशास्त्राच्या मार्गात पुष्कळांना तुम्ही ठोकर खायला लावले आहे; तुम्ही लेव्यांचा करार बिघडवला आहे, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो.


अडखळणांमुळे जगाची केवढी दुर्दशा होणार! अडखळणे तर अवश्य होणार; परंतु ज्या माणसाकडून अडखळण होईल त्याची केवढी दुर्दशा होणार!


तर बंधुजनहो, तुम्ही आपल्यामधून पवित्र आत्म्याने व ज्ञानाने पूर्ण असे सात प्रतिष्ठित पुरुष शोधून काढा. त्यांना आम्ही ह्या कामावर नेमू;


गौरवाने व अपमानाने, अपकीर्तीने व सत्कीर्तीने, आम्ही आपली लायकी पटवून देतो; फसवणारे मानलेले तरी आम्ही खरे;


त्याची निंदा होऊ नये व त्याने सैतानाच्या पाशात सापडू नये म्हणून त्याच्याविषयी बाहेरच्या लोकांनीही चांगली साक्ष दिलेली असावी.


भ्रमात असणार्‍या लोकांतून कोणी बाहेर पडले न पडले तोच ते लोक त्यांना व्यर्थपणाच्या फुगीर गोष्टी सांगतात व दैहिक वासनाधीन करून त्यांना कामातुरपणाचे मोह घालतात.


देमेत्रियाविषयी सर्वांनी व स्वत: सत्यानेही चांगली साक्ष दिली आहे; आम्हीही साक्ष देतो; आणि आमची साक्ष खरी आहे हे तुला ठाऊक आहे.


तरी तुला दोष देणे मला प्राप्त आहे. कारण ईजबेल नावाची जी स्त्री आपणाला संदेष्ट्री म्हणवते, आणि ‘जारकर्म करण्यास व मूर्तीला दाखवलेला नैवेद्य खाण्यास’ माझ्या दासांना शिकवून भुलवते, तिला तू तसे करू देतोस.


हे त्या तरुणांचे पाप परमेश्वराच्या दृष्टीने फार घोर होते; कारण त्यामुळे लोकांना परमेश्वरासाठी अर्पण आणण्याचा वीट आला.


एली फार वृद्ध झाला होता; त्याच्या पुत्रांनी सगळ्या इस्राएल लोकांशी कसकसा व्यवहार केला आणि दर्शनमंडपाच्या दाराशी सेवा करीत असलेल्या स्त्रियांशी त्यांनी कसे कुकर्म केले हे सर्व त्याच्या कानावर आले.


तेव्हा तो त्यांना म्हणाला, “तुम्ही असली कर्मे का करता? तुमची कुकर्मे ह्या सर्व लोकांकडून माझ्या कानी आली आहेत.


Lean sinn:

Sanasan


Sanasan