Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ शमुवेल 2:23 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

23 तेव्हा तो त्यांना म्हणाला, “तुम्ही असली कर्मे का करता? तुमची कुकर्मे ह्या सर्व लोकांकडून माझ्या कानी आली आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

23 तेव्हा तो त्यांना म्हणाला, “तुम्ही अशी कृत्ये का करता? कारण तुमची वाईट कृत्ये या सर्व लोकांपासून मी ऐकली आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

23 तेव्हा तो त्यांना म्हणाला, “तुम्ही अशी कर्मे का करता? तुमच्या दुष्ट कृत्यांबद्दल सर्व लोकांकडून मी ऐकत आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ शमुवेल 2:23
9 Iomraidhean Croise  

“तू हे काय करतोस?” असे विचारून त्याच्या बापाने त्याला जन्मात कधी दुखवले नव्हते. तो फार रूपवान होता; अबशालोमाच्या मागून तो जन्मला होता.


त्यांची मुद्रा त्यांच्याविरुद्ध साक्ष देते; ते सदोमाप्रमाणे आपले पाप जाहीर करतात, लपवत नाहीत; त्यांच्या जीविताला धिक्कार असो; ते स्वतःचे वाईट करून घेतात.


ह्यामुळे पर्जन्यवृष्टी आवरण्यात आली आहे आणि वळवाचा पाऊस पडला नाही; तरी तुझे कपाळ पडले कसबिणीचे; तुला लाज कशी ती ठाऊक नाही.


त्यांनी अमंगळ कृत्य केले त्याची त्यांना लाज वाटली काय? नाही; त्यांना बिलकूल लाज वाटली नाही; शरम कसली ती त्यांना ठाऊक नाही; म्हणून पतन पावणार्‍यांबरोबर ते पतन पावतील; मी त्यांचा समाचार घेईन तेव्हा ते ठोकर खाऊन पडतील, असे परमेश्वर म्हणतो.


“गृहस्थांनो, हे का करता? आम्ही व तुम्ही समभावनेची माणसे आहोत; तुम्ही ह्या निरर्थक गोष्टी सोडून ‘ज्याने आकाश, पृथ्वी, समुद्र व त्यांतील अवघे निर्माण केले’ त्या जिवंत देवाकडे वळावे अशी सुवार्ता आम्ही तुम्हांला सांगतो.


तेव्हा तो जमिनीवर पडला आणि त्याने अशी वाणी आपणाबरोबर बोलताना ऐकली की, “शौला, शौला, माझा छळ का करतोस?”


नाश हा त्यांचा शेवट, पोट हे त्यांचे दैवत, आणि निर्लज्जपणा हे त्यांचे भूषण आहे; त्यांचे चित्त ऐहिक गोष्टींत असते.


एली फार वृद्ध झाला होता; त्याच्या पुत्रांनी सगळ्या इस्राएल लोकांशी कसकसा व्यवहार केला आणि दर्शनमंडपाच्या दाराशी सेवा करीत असलेल्या स्त्रियांशी त्यांनी कसे कुकर्म केले हे सर्व त्याच्या कानावर आले.


माझ्या मुलांनो, असे करू नका; माझ्या कानावर जो बोभाटा येत आहे तो काही ठीक नाही; तुम्ही परमेश्वराच्या प्रजेकडून पातक करवत आहात.


Lean sinn:

Sanasan


Sanasan