Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ शमुवेल 2:22 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

22 एली फार वृद्ध झाला होता; त्याच्या पुत्रांनी सगळ्या इस्राएल लोकांशी कसकसा व्यवहार केला आणि दर्शनमंडपाच्या दाराशी सेवा करीत असलेल्या स्त्रियांशी त्यांनी कसे कुकर्म केले हे सर्व त्याच्या कानावर आले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

22 आता एली फार म्हातारा झाला होता आणि आपले पुत्र सर्व इस्राएलाशी कसे वागले आणि दर्शनमंडपाच्या प्रवेशदाराजवळ ज्या स्त्रिया सेवा करीत त्यांच्यापाशी ते कसे निजले हे सर्व त्याने ऐकले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

22 आता एली, जो फार वृद्ध झाला होता, त्याची मुले सर्व इस्राएल लोकांशी कसा व्यवहार करीत होते आणि ज्या स्त्रिया सभामंडपाच्या प्रवेशद्वारात सेवा करीत होत्या त्यांच्याबरोबर त्यांनी जे कुकर्म केले त्या सर्वांविषयी त्याने ऐकले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ शमुवेल 2:22
10 Iomraidhean Croise  

इस्राएल त्या प्रदेशात राहत असता रऊबेन हा आपल्या बापाची उपपत्नी बिल्हा हिच्यापाशी जाऊन निजला, हे इस्राएलाच्या कानावर गेले. याकोबाला बारा मुलगे होते.


याकोब वंशाचा वृत्तान्त1 हा : योसेफ सतरा वर्षांचा असताना आपल्या भावांबरोबर कळप चारत असे; तो आपल्या बापाच्या स्त्रिया बिल्हा व जिल्पा ह्यांच्या मुलांबरोबर असे; तेव्हा त्याने त्यांच्या दुर्वर्तनाविषयीची खबर आपल्या बापाला दिली.


त्याने गंगाळ व त्याची बैठक पितळेची बनवली. दर्शनमंडपाच्या दाराजवळ सेवा करीत असलेल्या स्त्रियांच्या आरशांचे हे पितळ होते.


तिचे याजक माझ्या नियमशास्त्राचे उल्लंघन करून माझ्या पवित्र वस्तू भ्रष्ट करतात. पवित्र व अपवित्र ह्यांचा ते काही भेद ठेवत नाहीत; शुद्ध व अशुद्ध ह्यांचा फरक ते शिकवत नाहीत; ते माझ्या शब्बाथांविषयी डोळेझाक करतात; त्यांच्यामध्ये माझा अपमान होतो.


तेव्हा तो त्यांना म्हणाला, “तुम्ही असली कर्मे का करता? तुमची कुकर्मे ह्या सर्व लोकांकडून माझ्या कानी आली आहेत.


मी त्याला सांगितले आहे की त्याला ठाऊक असलेल्या अधर्मास्तव मी त्याच्या घराण्याचे कायमचे पारिपत्य करीन, कारण त्याचे पुत्र स्वतःला शापग्रस्त करीत असता त्याने त्यांना आवरले नाही.


शमुवेलाने वृद्ध झाल्यावर आपल्या पुत्रांना इस्राएलाचे न्यायाधीश म्हणून नेमले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan