Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ शमुवेल 2:12 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

12 एलीचे पुत्र अधम होते; त्यांना परमेश्वराची ओळख नव्हती.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

12 एलीची मुले नालायक माणसे होती; ते परमेश्वरास ओळखत नव्हते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

12 एलीचे पुत्र अतिशय नीच होते; ते याहवेहचा आदर करीत नसत.

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ शमुवेल 2:12
23 Iomraidhean Croise  

आणि दोन अधम माणसे त्याच्यासमोर बसवा; ‘त्याने देवाचा व राजाचा धिक्कार केला’ अशी साक्ष त्या दोघांनी द्यावी; मग गावाबाहेर नेऊन त्याला मरेपर्यंत दगडमार करावा.”


दोन अधम पुरुष येऊन त्याच्यासमोर बसले; त्या अधम पुरुषांनी लोकांसमक्ष नाबोथाविरुद्ध साक्ष दिली; ते म्हणाले, “नाबोथाने देवाचा व राजाचा धिक्कार केला आहे.” ह्यानंतर त्यांनी त्याला नगराबाहेर नेऊन तो मरेपर्यंत दगडमार केला.


‘परमेश्वर कोठे आहे?’ असे याजक म्हणाले नाहीत व नियमशास्त्राचा कारभार चालवणार्‍यांनी मला जाणले नाही; लोकपालही1 माझ्यापासून फितले; संदेष्टे बआलदैवताच्या नावाने भाषणे करू लागले व निरर्थक गोष्टींच्या मागे लागले.


दीनदुबळ्यांचा तो न्यायनिवाडा करी तेव्हा त्याचे बरे चालले होते. परमेश्वर म्हणतो, हेच मला जाणणे नव्हे काय?


खोटे बोलण्यास ते आपली जीभ धनुष्याप्रमाणे वाकवतात; ते देशात प्रबळ झाले आहेत, पण सत्यासाठी नव्हे; ते दुष्कर्माला दुष्कर्म जोडतात; मला ते ओळखत नाहीत, असे परमेश्वर म्हणतो.


कपटाने घेरलेली अशी तुझी वस्ती आहे; कपटामुळे ते मला ओळखण्यास अमान्य आहेत, असे परमेश्वर म्हणतो.


तिचे याजक माझ्या नियमशास्त्राचे उल्लंघन करून माझ्या पवित्र वस्तू भ्रष्ट करतात. पवित्र व अपवित्र ह्यांचा ते काही भेद ठेवत नाहीत; शुद्ध व अशुद्ध ह्यांचा फरक ते शिकवत नाहीत; ते माझ्या शब्बाथांविषयी डोळेझाक करतात; त्यांच्यामध्ये माझा अपमान होतो.


त्यांनी पित्याला व मलाही ओळखले नसल्यामुळे ते असे करतील.


सार्वकालिक जीवन हेच आहे की, तू जो एकच खरा देव त्या तुला व ज्याला तू पाठवलेस त्या येशू ख्रिस्ताला त्यांनी ओळखावे.


तरी तुम्ही त्याला ओळखले नाही; मी त्याला ओळखतो; आणि मी त्याला ओळखत नाही असे जर मी म्हणेन तर मी तुमच्यासारखा लबाड ठरेन; पण मी त्याला ओळखतो व त्याचे वचन पाळतो.


देवाला ओळखूनसुद्धा त्यांनी देव म्हणून त्याचा गौरव केला नाही किंवा त्याचे आभार मानले नाहीत; पण ते आपल्या कल्पनांनी शून्यवत झाले आणि त्यांचे निर्बुद्ध मन अंधकाराने भरून गेले.


ख्रिस्ताची बलियाराशी1 एकवाक्यता कशी होणार? विश्वास ठेवणारा व विश्वास न ठेवणारा हे वाटेकरी कसे होणार?


तुमच्यातून काही अधम पुरुष निघाले आणि त्यांनी तुम्हांला अपरिचित अशा ‘अन्य देवांची सेवा करायला या’ असे म्हणून आपल्या नगरातील लोकांना बहकवले,


तर तू विचारपूस करावीस, शोध करावास, व बारकाईने पत्ता काढावास; आणि ही गोष्ट खरी असली आणि तुमच्यामध्ये असले अमंगळ कृत्य घडले आहे ह्याविषयी खात्री झाली,


ते खुशीत असताना गावातल्या गुंडांनी येऊन त्या घराला गराडा घातला व दार ठोठावून त्या म्हातार्‍या घरमालकाला ते म्हणू लागले, “तुझ्या घरी आलेल्या माणसाला बाहेर काढ म्हणजे आम्ही त्याला जाणू.”


ती सर्व पिढी पूर्वजांस मिळाल्यानंतर जी नवी पिढी उदयास आली तिला परमेश्वराची आणि त्याने इस्राएलासाठी केलेल्या कार्याची ओळख राहिली नव्हती. इस्राएलांची नीतिभ्रष्टता व शास्त्यांचा अंमल


पण काही अधम लोक बोलले, “हा मनुष्य आमचा काय उद्धार करणार?” त्यांनी त्याला तुच्छ मानले आणि त्याला काही नजराणा आणला नाही; पण त्याने ते ऐकले न ऐकलेसे केले.


तर आता काय करायचे ह्याचा चांगला विचार कर; कारण आमच्या धन्यावर व त्याच्या सर्व घराण्यावर अरिष्ट येणार आहे, आणि धनी तर असा अधम आहे की त्याला बोलण्याची कोणाची छाती नाही.”


मी त्याला सांगितले आहे की त्याला ठाऊक असलेल्या अधर्मास्तव मी त्याच्या घराण्याचे कायमचे पारिपत्य करीन, कारण त्याचे पुत्र स्वतःला शापग्रस्त करीत असता त्याने त्यांना आवरले नाही.


अद्यापि शमुवेलास परमेश्वराची ओळख झाली नव्हती, आणि परमेश्वराचे वचन त्याला प्रगट झाले नव्हते.


Lean sinn:

Sanasan


Sanasan