Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ शमुवेल 2:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

10 परमेश्वराशी झगडणार्‍यांचा चुराडा होईल. तो त्यांच्यावर आकाशातून गर्जेल; परमेश्वर पृथ्वीच्या दिगंतापर्यंत न्याय करील; तो आपल्या राजाला बल देईल, तो आपल्या अभिषिक्ताचा उत्कर्ष करील.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 देवाशी विरोध करणाऱ्यांचे तुकडे तुकडे केले जातील; आकाशांतून तो त्यांच्याविरुध्द मेघगर्जना करील. परमेश्वर पृथ्वीच्या शेवटल्या टोकावर असलेल्यांचा न्याय करील; तो आपल्या राजाला सामर्थ्य देईल आणि आपल्या अभिषिक्ताचे शिंग उंच करील.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

10 जे याहवेहचा विरोध करतात त्यांचा चुराडा होईल. सर्वश्रेष्ठ याहवेह स्वर्गातून गर्जना करतील; पृथ्वीच्या शेवटचा न्याय याहवेह करतील. “ते आपल्या राजाला सामर्थ्य देतील, आणि आपल्या अभिषिक्ताचे शिंग उंच करतील.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ शमुवेल 2:10
50 Iomraidhean Croise  

परमेश्वराने आकाशातून गर्जना केली, परात्पराची वाणी झाली.


तो माझ्या नामाप्रीत्यर्थ मंदिर बांधील, मी त्याचे राजासन कायमचे स्थापीन.


तर आता माझा सेवक दावीद ह्याला सांग, सेनाधीश परमेश्वर म्हणतो, तू माझ्या प्रजेचा, इस्राएलांचा अधिपती व्हावे म्हणून मी तुला मेंढवाड्यातून मेंढराच्या मागे फिरत असताना आणले,


देवाच्या भुजासारखा तुझा भुज आहे काय! त्याच्या वाणीप्रमाणे तुला गर्जना करता येते काय?


तेथे दावीदवंशाची प्रतिष्ठा वाढेल1 असे मी करीन; मी आपल्या अभिषिक्तासाठी दीप मांडला आहे.


आणि त्याने आपल्या लोकांचा पुन्हा उत्कर्ष केला आहे;2 तो आपल्या सर्व भक्तांना, त्याच्याजवळ असलेल्या लोकांना म्हणजे इस्राएलाच्या संततीला स्तुतिपात्र आहे. परमेशाचे स्तवन करा!1


परमेश्वराविरुद्ध व त्याच्या अभिषिक्ताविरुद्ध पृथ्वीवरील राजे उठले आहेत, सत्ताधीश एकत्र जमून मसलत करीत आहेत की,


तो म्हणेल, “मी आपल्या पवित्र सीयोन डोंगरावर आपला राजा अधिष्ठित केला आहे.”


लोहदंडाने तू त्यांना फोडून काढशील; कुंभाराच्या मडक्यासारखा त्यांचा चुराडा करशील.”


परमेश्वर आपल्या अभिषिक्ताला तारतो, हे मला आता कळून आले; तो आपल्या उजव्या हाताच्या उद्धारक प्रतापाची कृत्ये करून आपल्या पवित्र स्वर्गातून त्याचे ऐकेल.


कोणी रथाची व कोणी घोड्यांची बढाई मारतात; आम्ही तर आमचा देव परमेश्वर ह्याच्या नावाची प्रशंसा करू.


हे परमेश्वरा तुझ्या सामर्थ्यामुळे राजा हर्ष करतो; तू सिद्ध केलेल्या तारणामुळे त्याला केवढा उल्लास होतो!


परमेश्वर आपल्या लोकांचे सामर्थ्य आहे, तोच आपल्या अभिषिक्ताचा तारणदुर्ग आहे.


तुला नीतिमत्त्वाची आवड व दुष्टाईचा वीट आहे; म्हणून देवाने, तुझ्या देवाने तुझ्या सोबत्यांपेक्षा श्रेष्ठ असा हर्षदायी तेलाचा अभिषेक तुला केला आहे.


कारण त्यांच्या बलाचे वैभव तू आहेस; तुझ्या प्रसादाने आमचा उत्कर्ष होत राहील.2


माझी सत्यता व माझी दया त्याच्यासोबत राहतील; माझ्या नावाने त्याचा उत्कर्ष होईल3


मी त्याचा हात समुद्रावर, आणि त्याचा उजवा हात नद्यांवर ठेवीन.


कारण तो आला आहे; पृथ्वीचा न्याय करायला तो आला आहे; तो न्यायीपणाने जगाचा व सत्यतेने लोकांचा न्याय करील.


कारण तो पृथ्वीचा न्याय करण्यास आला आहे; तो जगाचा न्याय यथार्थतेने करील, व लोकांचा न्याय सरळपणे करील.


हे परमेश्वरा, तुझा उजवा हात बळाने प्रतापी झाला आहे; हे परमेश्वरा, तुझा उजवा हात शत्रूला चिरडून टाकतो.


हे तरुणा, आपल्या तारुण्यात आनंद कर; तुझ्या तारुण्याच्या दिवसांत तुझे हृदय तुला उल्लास देवो; तू मनास वाटेल त्या मार्गाने व नजरेस येईल तसा चाल; पण ह्या सर्वांबद्दल देव तुझा झाडा घेईल हे तुझ्या लक्षात असू दे.


सगळ्या बर्‍यावाईट गुप्त गोष्टींचा न्याय करताना देव सगळ्या कृत्यांची झाडाझडती घेईल.


मेघगर्जना, भूमिकंप, महानाद, वावटळ, तुफान व ग्रासणारी अग्निज्वाला ह्यांनी सेनाधीश परमेश्वर तुझा समाचार घेईल.


पाहा, राजा धर्माने राज्य करील, त्याचे सरदार न्यायाने सत्ता चालवतील.


माझ्याविषयी म्हणतील की केवळ परमेश्वराच्या ठायीच न्याय्यत्व व सामर्थ्य आहे; त्याला प्रत्येक जण शरण येईल; त्याच्यावर संतापलेले सर्व लज्जित होतील.


त्या दिवशी इस्राएल घराण्यास एक शृंग उगवेल असे मी करीन व त्यांच्यामध्ये तुझे तोंड उघडेल असे करीन; तेव्हा त्यांना समजेल की, मी परमेश्वर आहे.”


तेव्हा राजा आपल्या उजवीकडच्यांना म्हणेल, ‘अहो, माझ्या पित्याचे आशीर्वादितहो, या; जे राज्य जगाच्या स्थापनेपासून तुमच्याकरता सिद्ध केले आहे ते वतन घ्या;


तेव्हा येशू जवळ येऊन त्यांच्याशी बोलताना म्हणाला, “स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिलेला आहे.


आणि आपल्यासाठी त्याने आपला दास ‘दावीद’ ह्याच्या घराण्यात ‘बलवान उद्धारक प्रस्थापित केला आहे;


आता ज्या माझ्या वैर्‍यांच्या मनात मी त्यांच्यावर राज्य करू नये असे होते त्यांना येथे आणा व माझ्यादेखत ठार मारा.”


नासोरी येशूला देवाने पवित्र आत्म्याचा व सामर्थ्याचा अभिषेक केला; तो सत्कर्मे करत व सैतानाच्या सत्तेखाली असलेल्या सर्वांना बरे करत फिरला; कारण देव त्याच्याबरोबर होता.


कारण खरोखरच ज्याला तू अभिषेक केलास तो तुझा पवित्र ‘सेवक’ येशू ह्याच्या विरुद्ध ह्या शहरात परराष्ट्रीय व इस्राएल लोक ह्यांच्यासह हेरोद व पंतय पिलात हे एकत्र झाले;


कारण आपणा सर्वांना ख्रिस्ताच्या न्यायासनासमोर खर्‍या स्वरूपाने प्रकट झाले पाहिजे, ह्यासाठी की, प्रत्येकाला, त्याने देहाने केलेल्या गोष्टीचे फळ मिळावे; मग ते बरे असो किंवा वाईट असो.


हे परमेश्वरा, तुझे सर्व शत्रू असेच नाश पावोत; पण त्याच्यावर प्रेम करणारे प्रतापाने उदय पावणार्‍या सूर्यासमान होवोत.” मग देशाला चाळीस वर्षे विसावा मिळाला.


तर आता जो राजा तुम्ही निवडून घेतला व मागून घेतला तो हा पाहा; परमेश्वराने तुमच्यावर हा राजा नेमला आहे.


आज गव्हाची कापणी चालू आहे ना? परमेश्वराने मेघगर्जना करून पर्जन्यवृष्टी करावी अशी मी प्रार्थना करीन, म्हणजे मग तुम्ही आपल्यासाठी राजा मागून परमेश्वराच्या दृष्टीने केवढा अपराध केला आहे हे तुमच्या लक्षात येईल.”


मग शमुवेलाने परमेश्वराची प्रार्थना केली, आणि परमेश्वराने त्या दिवशी गर्जना व पर्जन्यवृष्टी केली; तेव्हा सर्व लोकांना परमेश्वराची व शमुवेलाची दहशत बसली.


हा मी तुमच्यापुढे आहे, परमेश्वरासमक्ष व त्याच्या अभिषिक्तासमक्ष माझ्याविरुद्ध काही असेल तर सांगा; मी कोणाचा बैल घेतला आहे काय? कोणाचे गाढव घेतले आहे काय? कोणाला फसवले आहे काय? कोणावर बलात्कार केला आहे काय? डोळेझाक करण्यासाठी कोणाच्या हातून लाच घेतली आहे काय? असे काही असल्यास सांगा म्हणजे मी त्याची भरपाई करीन.”


तेव्हा शमुवेल त्याला म्हणाला, “परमेश्वराने इस्राएलावरील तुझे राजपद तुझ्यापासून काढून घेऊन ते तुझ्याहून जो बरा अशा तुझ्या एका शेजार्‍याला दिले आहे.


मग परमेश्वराने शमुवेलाला म्हटले, “मी शौलाला इस्राएलाच्या राजपदावरून झुगारून दिले आहे, तर तू त्याच्यासाठी कोठवर शोक करीत राहणार? शिंगात तेल भरून चल; मी तुला इशाय बेथलेहेमकर ह्याच्याकडे पाठवतो; कारण मी त्याच्या एका पुत्राला माझ्याकरता राजा निवडले आहे.”


शमुवेल होमार्पण करत असताना पलिष्टी इस्राएलाशी लढायला जवळ येऊन ठेपले; त्या दिवशी परमेश्वराने प्रचंड गर्जना करून पलिष्ट्यांना घाबरे केले, आणि इस्राएलापुढे त्यांचा मोड झाला.


Lean sinn:

Sanasan


Sanasan