Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ शमुवेल 19:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 इकडे युद्ध पुन्हा सुरू झाले तेव्हा दाविदाने जाऊन पलिष्ट्यांशी युद्ध केले, त्यांचा मोठा संहार केला व ते त्याच्यापुढून पळून गेले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 यानंतर आणखी लढाई झाली आणि दावीदाने जाऊन पलिष्ट्यांशी लढून त्यांचा फार मोड केला आणि ते त्याच्यापुढून पळाले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 त्यानंतर पुन्हा एकदा युद्ध सुरू झाले आणि दावीद जाऊन पलिष्ट्यांशी लढला, त्याने त्यांना असे मारले की ते त्याच्यापुढून पळून गेले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ शमुवेल 19:8
8 Iomraidhean Croise  

इस्राएलांच्या राजाने बाहेर पडून घोडे व रथ ह्यांवर मारा करून अराम्यांची मोठी कत्तल उडवली.


सैन्याने माझ्यापुढे ठाणे दिले तरी माझे हृदय कचरणार नाही; माझ्यावर युद्धप्रसंग ओढवला तरीही मी हिम्मत धरून राहीन.


दावीद आपली सर्व कामे चतुराईने सिद्धीस नेत असे, आणि परमेश्वर त्याच्याबरोबर असे.


पलिष्ट्यांचे सरदार युद्धास सिद्ध झाले; जेव्हा जेव्हा ते बाहेर निघत तेव्हा तेव्हा दावीद शौलाच्या इतर सेवकांपेक्षा अधिक चतुराईने यश संपादी, ह्यामुळे त्याच्या नावाची ख्याती झाली.


योनाथानाने दाविदाला बोलावून आणून ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या; मग योनाथानाने दाविदाला शौलाकडे नेले; आणि तो पूर्वीप्रमाणे शौलाच्या तैनातीस राहिला.


शौल हाती भाला घेऊन आपल्या मंदिरात बसला असून दावीद त्याच्यापुढे वाद्य वाजवत असता परमेश्वराकडील दुरात्मा शौलाच्या ठायी संचरला.


मग दावीद व त्याचे लोक कईलास गेले; त्यांनी पलिष्ट्यांशी युद्ध करून त्यांची गुरेढोरे हाकून आणली आणि त्यांची मोठी कत्तल केली. ह्या प्रकारे दाविदाने कईला येथील रहिवाशांचे रक्षण केले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan