Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ शमुवेल 19:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 योनाथानाने आपला बाप शौल ह्याच्याकडे दाविदाची प्रशंसा करून म्हटले की, “राजाने आपला दास दावीद ह्याच्याविरुद्ध अपराध करू नये. कारण त्याने आपला काही अपराध केला नाही, उलट त्याची सर्व कामे आपल्या हिताची झाली आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 तेव्हा योनाथानाने आपला बाप शौल याला दावीदाविषयी बरे बोलला आणि तो त्यास म्हणाला की, “राजाने आपला चाकर दावीद याचे वाईट करू नये कारण, त्याने तुमच्यासाठी फार चांगली कृत्ये केली आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 योनाथान त्याचा पिता शौल याच्याशी दावीदाबद्दल चांगले बोलत म्हणाला, “राजाने त्यांचा सेवक दावीद याचे काही वाईट करू नये; त्याने तुमचे काही वाईट केले नाही आणि त्याने जे काही केले त्यामुळे तुम्हाला मोठा फायदा झाला आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ शमुवेल 19:4
15 Iomraidhean Croise  

रऊबेन त्यांना म्हणाला, “मुलाला काही अपाय करू नका असे मी तुम्हांला सांगितले नव्हते काय? पण तुम्ही माझे ऐकले नाही; पाहा, आता त्याच्या रक्ताचा बदला द्यावा लागत आहे.”


जो कोणी मनुष्याचा रक्तपात करील त्याचा रक्तपात मनुष्याकडून होईल; कारण देवाने मनुष्य आपल्या प्रतिरूपाचा उत्पन्न केला आहे.


एखाद्याने आपल्या शेजार्‍याचा अपराध केल्यामुळे त्याला शपथ घ्यायला लावली, आणि ती ह्या मंदिरात तुझ्या वेदीसमोर त्याने घेतली,


मी केलेल्या बर्‍याची फेड ते वाइटाने करतात; माझा जीव निराधार झाला आहे.


माझा दोष नसता ते धावून सज्ज होत आहेत. मला साहाय्य करावे म्हणून तू जागा होऊन पाहा.


जो बर्‍याची फेड वाइटाने करतो, त्याच्या घरातून अरिष्ट जाणार नाही.


बर्‍याची फेड वाइटाने व्हावी काय? कारण त्यांनी माझ्या जिवासाठी खाडा खणला आहे. त्यांच्यावरल्या तुझ्या रागाचे निवारण व्हावे म्हणून त्यांच्यासाठी मध्यस्थी करण्यास मी तुझ्यासमोर उभा राहिलो ह्याचे स्मरण कर.


बंधूंविरुद्ध असे पाप करून व त्यांच्या दुर्बळ सदसद्विवेकबुद्धीला धक्का देऊन तुम्ही ख्रिस्ताविरुद्ध पाप करता.


जो कोणी आपल्या बंधूंचा द्वेष करतो तो नरहिंसक आहे; आणि कोणाही नरहिंसकाच्या ठायी सार्वकालिक जीवन राहत नाही, हे तुम्हांला माहीत आहे.


कोणा मनुष्याने दुसर्‍या मनुष्याचा अपराध केला तर न्यायाधीश त्याचा न्याय करील, पण कोणी परमेश्वराविरुद्ध पातक केले तर त्याची वकिली कोण करील?” तरीपण ते आपल्या पित्याचा शब्द ऐकेनात कारण देवाला त्यांना मारून टाकायचे होते.


योनाथान आपला बाप शौल ह्याला म्हणाला, “त्याला मारून का टाकायचे? त्याने काय केले आहे?”


अहिमलेखाने राजाला उत्तर केले, “आपल्या सर्व सेवकांमध्ये दाविदासारखा विश्वासू कोण आहे? तो तर राजाचा जावई असून आपल्या मंत्रीमंडळातला आहे, दरबारात त्याची मोठी प्रतिष्ठा आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan