Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ शमुवेल 19:24 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

24 तो आपली वस्त्रे फेडून शमुवेलापुढे भाषण करू लागला, व अहोरात्र जमिनीवर उघडा पडून राहिला. ह्यावरून ’शौलही संदेष्ट्यांपैकीच आहे काय?’ अशी म्हण पडली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

24 मग त्यानेही आपली अंगवस्त्रे काढून शमुवेलापुढे भविष्यवाद केला आणि तो संपूर्ण दिवस आणि ती सर्व रात्र तो उघडा पडून राहीला; या कारणास्तव ते म्हणू लागले की, शौलही भविष्यवक्त्यांपैकी आहे की काय?

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

24 त्याने आपली वस्त्रे काढली आणि शमुवेलपुढे भविष्यवाणी करू लागला. तो संपूर्ण दिवस व ती रात्र शौल उघडा पडला. त्यावरूनच लोक म्हणतात, “शौलसुद्धा संदेष्ट्यांपैकी एक आहे काय?”

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ शमुवेल 19:24
10 Iomraidhean Croise  

दावीद सणाचे एफोद कंबरेस वेष्टून परमेश्वरासमोर आवेशाने नृत्य करत चालला.


आपल्या घराण्यातील लोकांना आशीर्वाद देण्यासाठी दावीद परत आला. तेव्हा शौलाची कन्या मीखल दाविदाला भेटायला बाहेर आली व त्याला म्हणू लागली, “एखादा हलकट मनुष्य उघडाबोडका होतो तसे आज इस्राएलाच्या महाराजांनी आपले दास व दासी ह्यांच्यासमोर आपले शरीर उघडे केले, तेव्हा इस्राएलाचे महाराज किती वैभवशाली दिसले!”


त्या वेळी आमोजाचा पुत्र यशया ह्याच्या द्वारे परमेश्वर म्हणाला : “जा, आपल्या कंबरेचे गोणपाट सोडून टाक, आपल्या पायातला जोडा काढ.” त्याने तसे केले; तो उघडा व अनवाणी चालला.


ह्यास्तव मी शोक व आक्रंदन करीन. मी उघडानागडा फिरेन, मी कोल्ह्यांसारखा ओरडेन व शहामृगांसारखा विव्हळेन.


जो देवाची वचने श्रवण करतो ज्याला सर्वसमर्थाचे दर्शन घडते; जो दंडवत घालतो, ज्याचे डोळे उघडे आहेत, त्याची ही वाणी आहे :


तेव्हा सर्व ऐकणारे विस्मित होऊन म्हणू लागले, “हे नाव घेणार्‍यांचा ज्याने यरुशलेमेत नाश केला तोच हा नव्हे काय? आणि त्यांना बांधून मुख्य याजकांकडे न्यावे म्हणूनच हा येथे आला होता ना?”


तेव्हा परमेश्वराचा आत्मा तुझ्यावर सामर्थ्याने येईल. व तूही त्यांच्याबरोबर भाषण करू लागशील आणि तुझ्यात बदल होऊन तू निराळा मनुष्य होशील.


शमुवेल मरेपर्यंत पुन: शौलाच्या भेटीला गेला नाही; तरी शमुवेल शौलासाठी विलाप करीत असे; आणि आपण शौलाला इस्राएलावर राजा केले ह्याचा परमेश्वराला अनुताप झाला.


दुसर्‍या दिवशी शौलाच्या ठायी देवाकडील दुरात्मा जोराने संचरला, व तो आपल्या मंदिरात बडबडू लागला; दावीद आपल्या नित्यक्रमाप्रमाणे वीणा वाजवत होता; आणि शौलाच्या हाती भाला होता.


Lean sinn:

Sanasan


Sanasan