Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ शमुवेल 19:23 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

23 त्यावरून तो तिकडे रामात नायोथाकडे गेला; तेव्हा देवाचा आत्मा त्याच्या ठायी संचरला व तो रामातील नायोथ येथे जाऊन पोहचेपर्यंत भाषण करीत चालला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

23 तेव्हा शौल रामातल्या नायोथात गेला आणि देवाचा आत्मा त्यावर आला आणि तो जाताना रामातल्या नायोथापर्यंत भविष्यवाद करीत गेला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

23 शौल रामाहतील नाइयोथकडे निघाला. परंतु परमेश्वराचा आत्मा त्याच्यावरही आला आणि नायोथपर्यंत पोहोचेपर्यंत भविष्यवाणी करीत चालत गेला.

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ शमुवेल 19:23
14 Iomraidhean Croise  

मनुष्याचे मन मार्ग योजते, पण परमेश्वर त्याच्या पावलांना मार्ग दाखवतो.


राजाचे मन पाटाच्या पाण्याप्रमाणे परमेश्वराच्या हाती आहे. त्याला वाटेल तिकडे तो ते वळवतो.


तेव्हा परमेश्वराने बलामाच्या तोंडी शब्द घातले व म्हटले, “बालाकाकडे परत जा आणि ह्याप्रमाणे बोल.”


बलामाने दृष्टी वर करून पाहिले तर, इस्राएल लोक आपापल्या वंशांप्रमाणे वस्ती करून राहत आहेत असे त्याला दिसले; देवाचा आत्मा त्याच्यावर उतरला.


त्या दिवशी पुष्कळ जण मला म्हणतील, ‘प्रभो, प्रभो, आम्ही तुझ्या नावाने संदेश दिला, तुझ्या नावाने भुते घालवली व तुझ्या नावाने पुष्कळ महत्कृत्ये केली नाहीत काय?’


हे तर तो आपल्या मनचे बोलला नाही, तर त्या वर्षी तो प्रमुख याजक होता म्हणून त्याने संदेश दिला की, येशू त्या राष्ट्राकरता मरणार आहे.


मला संदेश देण्याची शक्ती असली, मला सर्व गुजे व सर्व विद्या अवगत असल्या, आणि डोंगर ढळवता येतील इतका दृढ माझा विश्वास असला, पण माझ्या ठायी प्रीती नसली, तर मी काहीच नाही.


ते टेकडीजवळ आले, तेव्हा पाहा, संदेष्ट्यांचा एक समुदाय त्याला भेटला; आणि देवाचा आत्मा त्याच्यावर सामर्थ्याने आला व तो त्यांच्याबरोबर भाषण करू लागला.


तेव्हा तेथल्या एका मनुष्याने उत्तर दिले; तो म्हणाला, “ह्या संदेष्ट्याचा बाप कोण होता?” ह्यावरून शौलही संदेष्ट्यांपैकी आहे काय अशी म्हण पडली.


तेव्हा परमेश्वराचा आत्मा तुझ्यावर सामर्थ्याने येईल. व तूही त्यांच्याबरोबर भाषण करू लागशील आणि तुझ्यात बदल होऊन तू निराळा मनुष्य होशील.


दुसर्‍या दिवशी शौलाच्या ठायी देवाकडील दुरात्मा जोराने संचरला, व तो आपल्या मंदिरात बडबडू लागला; दावीद आपल्या नित्यक्रमाप्रमाणे वीणा वाजवत होता; आणि शौलाच्या हाती भाला होता.


दावीद पळून निभावून रामास शमुवेलाकडे गेला व जे काही वर्तन शौलाने त्याच्याशी केले ते अवघे त्याने त्याच्या कानी घातले. मग तो व शमुवेल नायोथ येथे जाऊन राहिले.


तेव्हा शौलाने दाविदाला पकडून आणण्यासाठी जासूद पाठवले. संदेष्ट्यांचे मंडळ भाषण करीत आहे व शमुवेल त्यांच्यापुढे उभा आहे असे शौलाच्या त्या जासुदांनी पाहिले तेव्हा देवाचा आत्मा त्यांच्या ठायी संचरला व तेही भाषण करू लागले.


मग तो स्वत: रामास गेला, व सेखूतल्या मोठ्या हौदानजीक येऊन पोहचल्यावर विचारू लागला, “शमुवेल व दावीद कोठे आहेत?” तेव्हा कोणी सांगितले, “पाहा, ते रामातील नायोथ येथे आहेत.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan