Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ शमुवेल 18:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 योनाथानाने आपल्या अंगावरचा झगा उतरवून दाविदाला दिला; त्याप्रमाणे आपला पेहराव, तलवार, धनुष्य व कमरबंदही दिला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 योनाथानाने आपल्या अंगातील जो झगा होता तो काढून दावीदाला दिला आणि आपले अंग वस्त्रे आणि आपली तलवार व आपले धनुष्य व आपला कमरबंद ही त्यास दिला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 योनाथानने आपल्या अंगातील झगा काढून तो दावीदाला दिला. आपला अंगरखा, तलवार, धनुष्य व कंबरपट्टा सुद्धा दावीदाला दिले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ शमुवेल 18:4
10 Iomraidhean Croise  

मग फारोने आपल्या बोटातील मुद्रिका काढून योसेफाच्या बोटात घातली, त्याला तलम तागाची वस्त्रे लेववली आणि त्याच्या गळ्यात सोन्याची कंठी घातली;


वधलेल्यांचे रक्त प्राशन केल्यावाचून व बलाढ्यांचे मांदे भक्षण केल्यावाचून योनाथानाचे धनुष्य कधी परत येत नसे, शौलाची तलवार कधी रिकामी परतत नसे.


मी परमेश्वराच्या ठायी अत्यंत हर्ष पावतो, माझ्या देवाच्या ठायी माझा जीव उल्लासतो; कारण जसा नवरा शेलापागोटे लेऊन स्वत:ला याजकासारखा मंडित करतो व नवरी जशी अलंकारांनी स्वत:ला भूषित करते, तशी त्याने मला तारणाची वस्त्रे नेसवली आहेत; मला नीतिमत्तेच्या झग्याने आच्छादले आहे.


त्याच्या कंबरांना पट्टे असून डोक्यात उंची व रंगीत पागोटी होती; ते सर्व पुरुष वीरांप्रमाणे दिसत असून त्यांची ढब खास्दी देशातील बाबेलच्या पुरुषांप्रमाणे होती.


पण बापाने आपल्या दासांना सांगितले, ‘लवकर उत्तम झगा आणून ह्याला घाला, ह्याच्या हातात अंगठी व पायांत जोडे घाला,


ज्याला पाप ठाऊक नव्हते त्याला त्याने तुमच्या-आमच्याकरता पाप असे केले; ह्यासाठी की, आपण त्याच्या ठायी देवाचे नीतिमत्त्व असे व्हावे.


शौलाने आपला पेहराव दाविदाला लेववला, त्याच्या मस्तकी पितळी टोप घातला व त्याच्या अंगात चिलखत चढवले.


जिकडे जिकडे शौल दाविदाला पाठवी, तिकडे तिकडे जाऊन तो चतुराईने कार्यसिद्धी करी; शौलाने त्याला योद्ध्यांवर नेमले. हे सर्व लोकांना पसंत पडले; तसेच शौलाच्या सेवकांनाही ते पसंत पडले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan