Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ शमुवेल 18:30 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

30 पलिष्ट्यांचे सरदार युद्धास सिद्ध झाले; जेव्हा जेव्हा ते बाहेर निघत तेव्हा तेव्हा दावीद शौलाच्या इतर सेवकांपेक्षा अधिक चतुराईने यश संपादी, ह्यामुळे त्याच्या नावाची ख्याती झाली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

30 नंतर पलिष्ट्यांचे सरदार लढायास बाहेर आले आणि असे झाले की ते आले असता दावीद शौलाच्या सर्व चाकरापेक्षा चतुराईने वर्तला आणि त्याचे नाव प्रसिद्ध झाले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

30 पलिष्ट्यांच्या सरदारांनी बाहेर जाऊन युद्ध सुरूच ठेवले आणि जेव्हा ते असे करीत, त्या त्यावेळी शौलाच्या बाकीच्या सैन्यापेक्षा दावीदाला अधिक यश मिळे, आणि तो प्रसिद्ध होत गेला.

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ शमुवेल 18:30
17 Iomraidhean Croise  

राजे लोक युद्धांच्या मोहिमेस जातात त्या वेळी म्हणजे वर्षारंभी दाविदाने यवाबाला व त्याच्याबरोबर त्याच्या नोकरचाकरांना व सर्व इस्राएल लोकांना पाठवले; त्यांनी अम्मोन्यांचा संहार करून राब्बा नगरास वेढा घातला; पण दावीद यरुशलेमेतच राहिला.


जिकडे तू गेलास तिकडे मी तुझ्याबरोबर राहिलो, आणि तुझ्या सर्व शत्रूंचा तुझ्यापुढून उच्छेद केला; पृथ्वीवर जे पुरुष आजपर्यंत झाले आहेत त्यांच्या नावांप्रमाणे तुझे नाव मी थोर करीन.


मग राजाने तिसर्‍यांदा पन्नासांच्या एका नायकाला पन्नास शिपाई देऊन पाठवले. ह्या तिसर्‍या पन्नासांच्या नायकाने जाऊन एलीयापुढे गुडघे टेकले व विनवणी करून म्हटले, “हे देवाच्या माणसा, माझा प्राण व ह्या आपल्या पन्नास दासांचे प्राण आपल्या दृष्टीला मोलवान वाटोत.


परमेश्वराच्या दृष्टीने त्याच्या भक्तांचे मरण अमोल आहे.


माझ्या सर्व शिक्षकांपेक्षा मी अधिक समंजस आहे. कारण मी तुझ्या निर्बंधांचे मनन करतो.


मनुष्याची प्रशंसा त्याच्या सुज्ञतेप्रमाणे होते, पण ज्याचे हृदय कुटिल असते त्याचा तिरस्कार होतो.


ज्ञानाच्या व विवेकाच्या बाबतींत राजा त्यांना जे काही विचारी त्यांत ते त्याच्या अवघ्या राज्यात असलेल्या सर्व ज्योतिष्यांपेक्षा व मांत्रिकांपेक्षा दसपट हुशार आहेत असे त्याला दिसून येई.


कारण मी तुम्हांला अशी वाचा व बुद्धी देईन की तिला अडवण्यास किंवा तिच्याविरुद्ध बोलण्यास तुमचे कोणीही विरोधक समर्थ होणार नाहीत.


म्हणून अज्ञान्यांसारखे नव्हे तर ज्ञान्यांसारखे सभोवार नजर ठेवून जपून चाला.


माणसांनी नाकारलेला तरी देवाच्या दृष्टीने ‘निवडलेला व मूल्यवान’ असा जो जिवंत ‘धोंडा’ त्याच्याजवळ येत असता,


म्हणून तुम्हा विश्वास ठेवणार्‍यांना ती मूल्यवान आहे; परंतु जे विश्वास ठेवत नाहीत त्यांना, “बांधणार्‍यांनी नापसंत केलेला धोंडा तोच कोनशिला झाला,”


तेव्हा दाविदाचा शौलाला अधिकच धाक वाटू लागला, आणि तो दाविदाचा कायमचा वैरी बनला.


जिकडे जिकडे शौल दाविदाला पाठवी, तिकडे तिकडे जाऊन तो चतुराईने कार्यसिद्धी करी; शौलाने त्याला योद्ध्यांवर नेमले. हे सर्व लोकांना पसंत पडले; तसेच शौलाच्या सेवकांनाही ते पसंत पडले.


इकडे युद्ध पुन्हा सुरू झाले तेव्हा दाविदाने जाऊन पलिष्ट्यांशी युद्ध केले, त्यांचा मोठा संहार केला व ते त्याच्यापुढून पळून गेले.


ह्यास्तव इस्राएलाचा देव परमेश्वर म्हणतो, तुझे घराणे व तुझ्या बापाचे घराणे माझ्यासमोर निरंतर चालू राहील असे मी म्हटले होते खरे, पण आता परमेश्वर म्हणतो, असे माझ्या हातून न घडो; कारण जे माझा आदर करतात त्यांचा मी आदर करीन आणि जे मला तुच्छ मानतात त्यांचा अवमान होईल.


तेव्हा शौल म्हणाला, “मी अपराधी आहे; माझ्या पुत्रा दाविदा, माघारी ये; आज माझा प्राण तुझ्या दृष्टीला मोलवान वाटला म्हणून ह्यापुढे मी तुला काहीएक उपद्रव करणार नाही; मी मूर्खपणाने वागलो आहे, माझ्या हातून मोठा अधर्म झाला आहे.”


पाहा, आपला प्राण जसा माझ्या दृष्टीला मोलवान वाटला तसाच माझाही प्राण परमेश्वराच्या दृष्टीस मोलवान वाटो व तो मला सर्व संकटांतून सोडवो.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan