Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ शमुवेल 18:17 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

17 शौल दाविदाला म्हणाला, “पाहा, माझी वडील कन्या मेरब हिच्याशी तुझे लग्न करून देतो; मात्र तुझा पराक्रम माझ्यासाठी होऊ दे, आणि परमेश्वराच्या वतीने लढाया कर.” आपला हात त्याच्यावर पडू नये तर पलिष्ट्यांचा हात त्याच्यावर पडावा असे त्याला वाटत होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

17 मग शौलाने दावीदाले म्हटले, “पाहा मी आपली वडील कन्या मेरब ही तुला पत्नी करून देईन. माझ्यासाठी तू केवळ शूर हो, आणि परमेश्वरासाठी लढाया कर.” कारण शौल म्हणाला, माझा हात त्याजवर न पडो, पण पलिष्टंयाचा हात त्याजवर पडो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

17 एके दिवशी शौल दावीदास म्हणाला, “माझी थोरली कन्या मेरब तुला मी पत्नी म्हणून देईन, केवळ शौर्याने माझी सेवा कर व याहवेहच्या लढाया लढ.” कारण शौल स्वतःशी म्हणाला, “मी दावीदावर हात टाकणार नाही, पलिष्ट्यांनी ते करावे.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ शमुवेल 18:17
22 Iomraidhean Croise  

त्या पत्रात असे लिहिले होते की, “तुंबळ युद्धाच्या तोंडी उरीयाला ठेवा; आणि त्याला तेथेच सोडून मागे हटा; म्हणजे त्याला मार लागून तो मरेल.”


तू परमेश्वराची आज्ञा तुच्छ मानून त्याच्या दृष्टीने वाईट असे हे कृत्य का केलेस? उरीया हित्ती ह्याचा तू तलवारीने घात केला, त्याची बायको आपल्या घरात घातलीस आणि उरीयाचा अम्मोन्यांच्या तलवारीने वध करवलास?


परमेश्वराचा कोश दावीदपुरात येत असताना शौलाची कन्या मीखल हिने खिडकीतून डोकावून दावीद राजा परमेश्वरापुढे नाचतबागडत आहे हे पाहिले, तेव्हा तिच्या मनाला त्याचा वीट आला.


ते एकमेकांशी असत्य भाषण करतात, ते दुटप्पीपणाने खुशामतीचे शब्द बोलतात,


त्याच्या तोंडचे शब्द लोण्यासारखे मृदू होते, पण त्याचे हृदय युद्धप्रिय होते; त्याचे शब्द तेलापेक्षा बुळबुळीत पण नागव्या तलवारींसारखे होते.


द्वेष्टा आपल्या वाणीने खोटा बहाणा करतो, पण अंतर्यामी कपट बाळगतो;


तो गोडगोड बोलतो तेव्हा त्याच्यावर विश्वास ठेवू नकोस, कारण त्याच्या हृदयात सात विषे आहेत;


त्याचा द्वेष धूर्ततेने झाकला आहे, तरी समाजापुढे त्याची दुष्टता उघडकीस येईल.


ह्यामुळे ‘परमेश्वराचे संग्राम’ नावाच्या ग्रंथात येणेप्रमाणे लिहिले आहे : “सुफातला वाहेब, व आर्णोनेची खोरी


तेव्हा मोशे त्यांना म्हणाला, “जर तुम्ही ही गोष्ट कराल, म्हणजे जर तुम्ही युद्ध करण्यासाठी परमेश्वरापुढे सशस्त्र व्हाल,


पण स्वामीच्या सांगण्याप्रमाणे त्याचा प्रत्येक दास युद्धासाठी सशस्त्र होऊन परमेश्वरापुढे युद्ध करायला पलीकडे जाईल.”


मोशे त्यांना म्हणाला, “जर गादाच्या व रऊबेनाच्या वंशजांतील प्रत्येक पुरुष सशस्त्र होऊन तुमच्याबरोबर परमेश्वरापुढे यार्देनेपलीकडे गेला व देश तुमच्या ताब्यात आला, तर तुम्ही त्यांना गिलाद प्रदेश वतन करून द्यावा;


ज्याला जिवे मारायचे त्याच्यावर प्रथम साक्षीदाराचे हात पडावेत आणि मग इतर लोकांचे हात पडावेत. अशा प्रकारे तू आपल्यामधून ह्या दुष्टाईचे निर्मूलन करावेस.


शौलाचे पुत्र योनाथान, इश्वी व मलकीशुवा हे होते; त्याच्या दोन कन्यांची नावे अशी : थोरलीचे मेरब व धाकटीचे मीखल.


इस्राएल लोक म्हणू लागले, “हा चालून आलेला पुरुष तुम्ही पाहिला ना? तो इस्राएलाची निर्भर्त्सना करायला आला आहे; जो कोणी त्याला ठार मारील त्याला राजा बहुत धन देऊन संपन्न करील, आपली कन्या त्याला देईल, आणि इस्राएलात त्याच्या बापाचे घराणे स्वतंत्र करील.”


आपल्या दासाने त्या सिंहाला व अस्वलाला मारून टाकले. हा असुंती पलिष्टी त्या दोहोंपैकी एकासारखा ठरेल, कारण त्याने जिवंत देवाच्या सेनेला तुच्छ लेखले आहे.”


आणि ह्या सगळ्या समुदायाला कळून येईल की परमेश्वर तलवारीने व भाल्याने विजयी होतो असे नाही; कारण हे युद्ध परमेश्वराचे आहे; तो तुम्हांला आमच्या हाती देईल.”


शौल म्हणाला, “ती त्याला दिली म्हणजे ती त्याला पाशरूप होईल, आणि पलिष्ट्यांचा हात त्याच्यावर पडेल.” ह्यास्तव शौल दाविदाला म्हणाला, “ह्या खेपेस तू अवश्य माझा जावई होणार.”


तेव्हा शौल म्हणाला, “तुम्ही दाविदाला जाऊन सांगा की, राजाला हुंडा नको; मात्र राजाच्या शत्रूंचा सूड उगवावा म्हणून त्याला पलिष्ट्यांच्या शंभर अग्रत्वचा हव्या आहेत.” शौलाचा ह्यात असा हेतू होता की अशाने तरी दावीद पलिष्ट्यांच्या हातून पतन पावेल.


तेव्हा दावीद आपले लोक बरोबर घेऊन गेला व त्याने पलिष्ट्यांचे दोनशे पुरुष मारले; दाविदाने त्यांच्या अग्रत्वचा आणून राजाचा जावई होण्यासाठी त्याला बरोबर मोजून दिल्या; तेव्हा शौलाने आपली कन्या मीखल हिचे त्याच्याशी लग्न करून दिले.


आपल्या ह्या दासीचा अपराध क्षमा करा; कारण परमेश्वर खरोखर माझ्या स्वामींचे घराणे कायमचे वसवील; कारण माझे स्वामी परमेश्वराच्या लढाया लढत आहेत; आपल्या सर्व आयुष्यभर आपल्या ठायी कसलेही अनिष्ट आढळणार नाही.


दावीद सिकलाग येथे आला तेव्हा त्याने आपले मित्र यहूदाचे वडील ह्यांच्याकडे लुटीचा काही भाग पाठवून त्यांना सांगितले की, “परमेश्वराच्या शत्रूंच्या लुटीतून तुम्हांला ही भेट पाठवली आहे”;


Lean sinn:

Sanasan


Sanasan