Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ शमुवेल 18:14 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

14 दावीद आपली सर्व कामे चतुराईने सिद्धीस नेत असे, आणि परमेश्वर त्याच्याबरोबर असे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

14 दावीदाची त्याच्या सर्व मार्गात भरभराट झाली, कारण परमेश्वर त्याच्या बरोबर होता.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

14 प्रत्येक कामात दावीद यशस्वी होत असे, कारण याहवेह त्याच्याबरोबर होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ शमुवेल 18:14
18 Iomraidhean Croise  

त्याच्या स्वाधीन जे काही होते त्याकडे बंदिशाळेचा अधिकारी पाहत नसे, कारण परमेश्वर योसेफाबरोबर होता आणि जे काही तो हाती घेई ते परमेश्वर यशस्वी करी.


दाविदाचा उत्तरोत्तर उत्कर्ष होत गेला, कारण सेनाधीश देव परमेश्वर त्याच्याबरोबर असे.


ह्यास्तव परमेश्वर त्याच्याबरोबर होता; जिकडेजिकडे तो जाई तिकडेतिकडे त्याला यशःप्राप्ती होई; त्याने अश्शूराच्या राजाविरुद्ध बंड केले; त्याचा तो अंकित राहिला नाही.


त्याने अदोमात शिपायांची ठाणी बसवली आणि सर्व अदोमी लोक दाविदाचे अंकित झाले. दावीद जेथे गेला तेथे परमेश्वराने त्याला यश दिले.


मग दाविदाने दिमिष्काच्या आसमंतातील अराम प्रांतात ठाणी बसवली; अरामी दाविदाचे अंकित होऊन त्याला करभार देऊ लागले. जिकडे-तिकडे दावीद जाई तिकडे-तिकडे परमेश्वर त्याला यश देई.


यहोशाफाट आपला पूर्वज दावीद प्रथमारंभी जसे वागला तसा वागला; तो बआलमूर्तीच्या नादी लागला नाही, म्हणून परमेश्वर त्याच्याबरोबर असे;


मी सुज्ञतेने, सरळ मार्गाने चालेन; तू माझ्याजवळ केव्हा येशील? मी आपल्या घरी सरळ अंतःकरणाने वागेन.


“पाहा, कुमारी गर्भवती होईल व तिला पुत्र होईल आणि त्याला इम्मानुएल हे नाव देतील.” ह्या नावाचा अर्थ, ‘आमच्याबरोबर देव.’


जे काही मी तुम्हांला आज्ञापिले ते सर्व त्यांना पाळण्यास शिकवा; आणि पाहा, युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्याबरोबर आहे.”


कारण मी तुझ्याबरोबर आहे, आणि तुझे वाईट करण्यास कोणी तुझ्यावर येणार नाही; कारण ह्या नगरात माझे पुष्कळ लोक आहेत.”


ह्याप्रमाणे परमेश्वर यहोशवाबरोबर राहिला, आणि त्याची कीर्ती सर्व देशभर पसरली.


यहूदाबरोबर परमेश्वर होता; त्याने डोंगराळ प्रदेश ताब्यात घेतला; पण तळवटीत राहणार्‍या लोकांजवळ लोखंडी रथ असल्याने त्यांना हाकून देणे त्याला जमेना.


ही चिन्हे तुला प्राप्त झाली म्हणजे तुला जे कर्तव्य करणे प्राप्त होईल ते तू करावेस; कारण देव तुझ्याबरोबर आहे.


तेव्हा एका तरुण सेवकाने उत्तर दिले, पाहा, मी बेथलेहेमकर इशाय ह्याचा एक पुत्र पाहिला आहे; तो वादनकलेत निपुण असून प्रबळ व युद्धकुशल वीर आहे, तसाच तो चांगला वक्ता असून रूपवान आहे; आणि परमेश्वर त्याच्याबरोबर आहे.”


दावीद मोठ्या चतुराईने कार्यसिद्धी करत असतो हे पाहून शौलाला त्याचा धाक वाटू लागला;


इकडे युद्ध पुन्हा सुरू झाले तेव्हा दाविदाने जाऊन पलिष्ट्यांशी युद्ध केले, त्यांचा मोठा संहार केला व ते त्याच्यापुढून पळून गेले.


शमुवेल वाढत गेला; परमेश्वर त्याच्यासह असे व त्याचे कोणतेही वचन त्याने वाया जाऊ दिले नाही.


Lean sinn:

Sanasan


Sanasan