Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ शमुवेल 17:52 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

52 मग इस्राएल व यहूदी उठले आणि रणशब्द करत गथ व एक्रोन ह्यांच्या वेशीपर्यंत पलिष्ट्यांचा पाठलाग करीत गेले, आणि पलिष्टी शाराईमाच्या वाटेत गथ व एक्रोन येथवर घायाळ होऊन पडले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

52 तेव्हा इस्राएल व यहूदीयांच्या मनुष्यांनी उठून आरोळी मारली, आणि खोऱ्यापर्यंत व एक्रोनाच्या वेशीपर्यंत ते पलिष्ट्यांच्या पाठीस लागले. पलिष्टी शाराईमाच्या वाटेत गथ व एक्रोनापर्यंत जखमी होऊन पडले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

52 तेव्हा इस्राएली व यहूदीयाच्या सैनिकांनी उठून आरोळी केली, त्यांनी गथ व एक्रोनच्या वेशींपर्यंत पलिष्ट्यांचा पाठलाग केला. मरण पावलेले पलिष्टी शाराईमाच्या वाटेवर गथ व एक्रोन येथवर पडलेले होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ शमुवेल 17:52
10 Iomraidhean Croise  

तेव्हा आपला हात थकून तलवारीस चिकटेपर्यंत एलाजार पलिष्ट्यांना मार देत राहिला. त्या दिवशी परमेश्वराने मोठा विजय घडवून आणला, त्याच्यामागून लोक गेले ते केवळ लुटालूट करायला.


इस्राएलांच्या राजाने बाहेर पडून घोडे व रथ ह्यांवर मारा करून अराम्यांची मोठी कत्तल उडवली.


तेथून ती सीमा एक्रोनच्या उत्तर भागावरून शिक्रोनपर्यंत गेली आहे आणि बाला पहाडावरून यबनेलास निघाली आहे; ह्या सीमेचा शेवट समुद्रतीरी होतो.


मग नफताली, आशेर व सर्व मनश्शे येथल्या इस्राएल लोकांना बोलावण्यात आले व त्यांनी मिद्यानाचा पाठलाग केला.


मग इस्राएल लोक पलिष्ट्यांचा पाठलाग करण्याचे सोडून परत आले; व त्यांनी त्यांची छावणी लुटली.


मग त्यांनी देवाचा कोश एक्रोन येथे पाठवला; तो एक्रोन येथे जाऊन पोचताच एक्रोनकरांनी ओरड केली की, “आमचा व आमच्या लोकांचा संहार करण्यासाठी इस्राएलाच्या देवाचा कोश त्यांनी आमच्याकडे आणला आहे.”


मग त्यांनी पलिष्ट्यांच्या सर्व सरदारांना बोलावणे पाठवून जमा केले आणि विचारले, “आम्ही इस्राएलाच्या देवाच्या कोशाचे काय करावे?” ते म्हणाले, “इस्राएलाच्या देवाचा कोश गथ येथे मिरवत पोचता करावा.” तेव्हा त्यांनी इस्राएलाच्या देवाचा कोश गथ येथे मिरवत पोचवला.


Lean sinn:

Sanasan


Sanasan