Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ शमुवेल 17:36 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

36 आपल्या दासाने त्या सिंहाला व अस्वलाला मारून टाकले. हा असुंती पलिष्टी त्या दोहोंपैकी एकासारखा ठरेल, कारण त्याने जिवंत देवाच्या सेनेला तुच्छ लेखले आहे.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

36 तुझ्या दासाने सिंह व अस्वल दोघांनाही जीवे मारिले. हा बेसुंती पलिष्टी त्यातील एकासारखा होईल कारण, त्यांने जिवंत परमेश्वराच्या सैन्याची निंदा केली आहे.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

36 आपल्या दासाने सिंह व अस्वल हे दोन्ही मारले; हा बेसुंती पलिष्टीही त्यापैकी एकासारखा असेल, कारण त्याने जिवंत परमेश्वराच्या सेनेचा उपहास केला आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ शमुवेल 17:36
25 Iomraidhean Croise  

इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याची निंदा करावी व त्याच्याविरुद्ध बोलावे ह्या हेतूने त्याने पत्रेही पाठवली; त्यात त्याने लिहिले की, “निरनिराळ्या देशांतील राष्ट्रांच्या देवांना आपले लोक माझ्या हातातून सोडवता आले नाहीत, त्याप्रमाणेच हिज्कीयाच्या देवाला आपले लोक माझ्या हातून सोडवता यायचे नाहीत.”


कुर्‍हाडीने तोडणार्‍यापुढे कुर्‍हाड घमेंड करील काय? करवत आपणास चालवणार्‍यापुढे आढ्यता मिरवील काय?सोट्याने आपणास हाती धरणार्‍यास गरगर फिरवावे, काष्ठाने काष्ठेतरास उचलावे तसे हे आहे.


‘परमेश्वर आमचा बचाव करीलच करील, हे शहर अश्शूरच्या राजाच्या हाती जाणार नाही,’ असे बोलून हिज्कीया तुम्हांला परमेश्वरावर भिस्त ठेवण्यास न लावो.”


‘परमेश्वर आमचा बचाव करील’ असे बोलून हिज्कीया तुमचे मन न फिरवो. राष्ट्रांच्या देवांपैकी कोणी आपला देश अश्शूरच्या राजाच्या हातून सोडवला आहे काय?


बेसुंती मरतात त्याप्रमाणे तू परदेशीयांच्या हस्ते मरशील; हे माझे म्हणणे आहे, असे प्रभू परमेश्वर म्हणतो.”


‘तू सौंदर्याने कोणापेक्षा वरचढ आहेस? चल, खाली उतर, आणि बेसुंत्यांबरोबर जाऊन पड.’


तर स्वर्गीच्या प्रभूबरोबर तू उद्दामपणा केलास; त्याच्या मंदिरातील पात्रे तुझ्यापुढे आणली आहेत; तू, तुझे सरदार, तुझ्या पत्नी व उपपत्नी ही त्यांतून द्राक्षारस प्याली आहेत आणि रुपे, सोने, पितळ, लोखंड, काष्ठ व पाषाण ह्यांची घडलेली दैवते, ज्यांना दिसत नाही, ऐकता येत नाही व समजत नाही, त्यांचे तू स्तवन केलेस; पण ज्याच्या हाती तुझा प्राण आहे व ज्याच्या स्वाधीन तुझे सर्व व्यवहार आहेत त्या देवाला मान दिला नाहीस;


त्या दिवशी असे होईल की सर्व राष्ट्रांना भारी होईल अशा पाषाणासारखे मी यरुशलेमेस करीन; जे कोणी तो उचलतील ते स्वतःला जखम करून घेतील; पृथ्वीवरील सर्व राष्ट्रे तिच्याविरुद्ध जमतील.


ज्या राष्ट्रांनी तुम्हांला लुटले त्यांच्याकडे प्रताप मिळवण्यासाठी,1 त्याने मला पाठवले आहे; जो कोणी तुम्हांला स्पर्श करील तो त्याच्या डोळ्याच्या बुबुळालाच स्पर्श करील; कारण सेनाधीश परमेश्वर म्हणतो :


तेव्हा योनाथानाने आपल्या शस्त्रवाहक तरुण सेवकाला म्हटले, “चल, आपण त्या बेसुनत लोकांच्या ठाण्याकडे जाऊ; कदाचित परमेश्वर आपले कार्य करील; परमेश्वराला बहुत लोकांच्या द्वारे किंवा थोडक्यांच्या द्वारे सुटका करण्यास अडचण नाही.”


तो पलिष्टी म्हणाला, “इस्राएलाच्या सर्व सैन्याला मी कस्पटासमान लेखत आहे. कोणाही पुरुषाला माझ्यापुढे येऊ द्या, म्हणजे आम्ही दोघे युद्ध करू.”


आसपास उभे असणार्‍या लोकांना दाविदाने विचारले, “ह्या पलिष्ट्याला मारून इस्राएलाची अप्रतिष्ठा दूर करणार्‍या मनुष्याला काय मिळेल? ह्या असुंती पलिष्ट्याने जिवंत देवाच्या सेना तुच्छ लेखाव्यात काय?”


तेव्हा मी त्याच्या पाठीस लागून त्याला मारले आणि कोकराला त्याच्या जबड्यातून सोडवले; माझ्यावर त्याने झडप घातली, तेव्हा मी त्याची आयाळ धरून त्याला हाणून ठार केले.


दावीद आणखी म्हणाला, “ज्या परमेश्वराने मला सिंहाच्या व अस्वलाच्या पंजातून सोडवले तोच मला ह्या पलिष्ट्याच्या हातून सोडवील.” तेव्हा शौल दाविदाला म्हणाला, “जा, परमेश्वर तुझ्याबरोबर असो.”


शौल दाविदाला म्हणाला, “पाहा, माझी वडील कन्या मेरब हिच्याशी तुझे लग्न करून देतो; मात्र तुझा पराक्रम माझ्यासाठी होऊ दे, आणि परमेश्वराच्या वतीने लढाया कर.” आपला हात त्याच्यावर पडू नये तर पलिष्ट्यांचा हात त्याच्यावर पडावा असे त्याला वाटत होते.


तेव्हा शौल आपल्या शस्त्रवाहकाला म्हणाला, “आपली तलवार उपसून मला भोसक, तसे न केल्यास हे असुंती लोक येऊन मला भोसकतील व माझी विटंबना करतील.” पण त्याचा शस्त्रवाहक तसे करीना; तो फार घाबरला होता. तेव्हा शौल आपली तलवार काढून तिच्यावर पडला.


Lean sinn:

Sanasan


Sanasan